राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, May 13, 2023

संभ्रमात टाकणारा सर्वोच्च न्यायलायचा निर्णय राज ?

(मुंबई) - उत्त - सेवा - मीरा रोड : महाराष्ट्र सरकारबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, तो निर्णय संभ्रमात टाकणारा आहे, असे स्पष्ट मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. माझ्यावर अनेक केसेस चालू आहेत. त्या केसेसबाबत न्यायालय किंवा पोलिसांकडून ज्यावेळी नोटिसा येतात, त्यातील जी भाषा असते, ती वाचल्यानंतर आपल्याला समजत नाही की, आपल्याला सोडले आहे की, अटक केली आहे. त्याचप्रकारे गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय समजत नाही. तो संभ्रमात टाकणारा आहे, असे ठाकरे म्हणाले.राज ठाकरे यांचा शुक्रवारपासून ठाणे जिल्हा दौरा सुरू झाला आहे. या दौऱ्याची सुरुवात मीरा भाईंदरपासून करण्यात आली आहे. ते पुढे म्हणाले की, न्यायालयाने दिलेल्या निर्णयात विधिमंडळातील जो गट आहे,
तो पक्ष म्हणून समजता येणार नाही. बाहेरचा जो पक्ष आहे तोच पक्ष म्हणून समजला जाईल. त्यामुळे निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे, त्यातील पक्षाचे नाव आणि चिन्ह याचे काय होणार? निवडणूक आयोग एक स्वतंत्र यंत्रणा आहे. न्यायालय एक स्वतंत्र यंत्रणा आहे. त्यामुळे निवडणूकआयोग काय करणार ? हा निर्णय संभ्रम निर्माण करणारा आहे. आता यावर बोलणे योग्य नाही.थोड्या दिवसात माहीत पडेल, असे ठाकरे म्हणाले. तसेच कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी जपून राहिले पाहिजे, आधीचे मुख्यमंत्री हे जपून राहिले नाही, म्हणून हा सर्व पेच उभा राहिला आहे.
मुख्यमंत्र्यांनी जपून राहायला पाहिजे, आपण कुठल्या पदावर आहोत याचा विचार करणे आवश्यक आहे, असे या वेळी राज ठाकरे म्हणाले. गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे जिल्हा दौरा करावा, अशी पदाधिकाऱ्यांची मागणी होती. त्यानुसार या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची सुरुवात मीरा भाईंदरपासून केली आहे. हा दौरा वसई, भिवंडी, शहापूर, ठाणे अशा विविध भागांत केला जाणार आहे. २०२४ मध्ये निवडणुका आहेत. त्या निवडणुकीसंदर्भातदेखील हा दौरा महत्त्वाचा आहे. मनसैनिक व पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी मी आलो आहे, असे ठाकरे या वेळी म्हणाले. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी दौऱ्याचे आयोजन केले असल्याचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले.


÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
सा : राज प्रसारित...कार्यकरी...संपादक...भगवंत सिंग प्रितम सिंग बतरा... शब्द...✍️✅️🇮🇳...रचना... संकलन... वार्ता...
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷


No comments:

Post a Comment