श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -
शहरातील तन्वीर शहा या तरुणाचा खून करणारा आरोपी व त्याचा साथीदार या दोघांना अखेर 24 तासाच्या दक्ष जलद तपासा नंतर पोलिसांनी अटक केली.अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
प्रभाग एक मधील तन्वीर शहा याने सुनिल देवकर याचे निराळ्या करणावरून अप शब्द वापरल्याचा राग मनात धरुन देवकर व त्याच्या साथीदाराने तन्वीर याच्यावर चॉपरसारख्या धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले.
याप्रकरणी साजीद छोटु शहा (वय 26, रा. गोंधवणी रोड, दत्त मंदीराजवळ, वॉर्ड नं. 1, ता. श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुना रजिस्टर नंबर553/2023 भादंवि कलम 302, 34 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन पसार आरोपींचा शोध घेवून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी, पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, सहाय्यक फौजदार भाऊसाहेब काळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक रविंद्र कर्डीले, संतोष लोढे, बाळासाहेब गुंजाळ, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, पोलीस कॉन्स्टेबल रणजीत जाधव, किशोर शिरसाठ, गणेश भिंगारदे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व चालक बबन बेरड व अंमलदार यांची दोन पथके नेमुन कारवाईच्या सूचना दिल्या.
पोलीस पथक आरोपीची माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक आहेर यांना सूत्रनुसार मार्फत माहिती मिळाली की, खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सुनिल देवकर त्याचे साथीदारासह राहुरी रेल्वे स्टेशन परिसरात असुन कोठेतरी पळुन जाण्याच्या तयारीत आहेत. माहिती मिळताच श्री. आहेर यांनी पथकास राहुरी रेल्वे स्टेशन परिसरात जावुन कारवाईचे आदेश दिले. पथकाने प्रवासी म्हणून वेशांतर करुन, शिताफिने सापळा लावुन थांबलेले असताना एक इसम साथीदारासोबत राहुरी रेल्वे स्टेशन परिसरात बसलेला
दिसला. पथकाने त्यास जागीच पकडुन ओळख सांगुन त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने सुनिल सिताराम देवकर (वय 22, रा. महादेवनगर, गोंधवणी, वॉर्ड नं.1. ता.श्रीरामपूर) व सोबत साथीदार एक विधीसंघर्षीत बालक मिळुन आला. त्यांचेकडे सदरच्या गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्या दोघांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. पथकाने त्यांना ताब्यात घेवुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे करीत पत्रकात नमूद केले आहे.
No comments:
Post a Comment