अहमदनगर - वृत्तसेवा - वार्ता -
तालुक्यातील तामसवाडी ते वाटापूर या रस्त्याच्या निकृष्ट कामाची राज्य गुणवत्ता व नियंत्रण विभागाकडून चौकशी करण्यात यावी. त्याचे अपूर्ण काम तातडीने सुरू करण्यात यावे यासाठी नेवासा तालुका काँग्रेस कमिटी, तसेच तामसवाडी व वाटापूर ग्रामस्थांनी सार्वजानिक बांधकाम उप विभाग नेवासा श्री दुबाळे उप अभियंत्यांना घेराव आंदोलन केले.तामसवाडी (जगताप वस्ती) ते वाटापूर या रस्त्याच्या कामास सुरुवात होऊन चार ते पाच वर्षाचा कालावधी उलटूनही काम अपूर्णच आहे. सत्याच्या कामाचा पूर्णत्वाचा कालावधी उलटून गेला आहे. ठेकेदाराने केलेले कामही निकृष्ट दर्जाचे आहे. यामध्ये मुरूम, खडी, तारकोल, डांबर अशा निकृष्ट मालाचा वापर केला असून, रस्त्याची लांबी, रुंदी, खोली त्याची अनियमित मापे, साईडपट्ट्यांचा अभाव, तसेच रस्त्यामध्ये केलेल्या पुलाचेकामही निकृष्ट दर्जाचे झाले आहे.
याशिवाय अपूर्ण अवस्थेतील नुसतेच खोदून ठेवलेल्या कामामुळे पसरलेल्या खडीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अपघात वाढले आहेत.अनेकांना जीव गमावावा लागला आहे ठेकेदाराकडून नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत, तामसवाडी व रस्तापूर येथील ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल मेत काँग्रेस कमिटी अध्यक्ष व
पदाधिकायांनी स्वत रस्ता कामाची पाहनी केली.
तसेच महिनाभरात सार्वजनिक बांधकाम विभाग नेवासा श्री दुबाळे उप अभियंता यांची अनेकदा भेट घेवून तातडीने रस्ता कामास सुरुवात करावी काम पूर्ण करण्यात यावे तसेज निकृष्ट कामाची राज्य गुणवत्ता व नियंत्रण विभागाकडून चौकशी करण्यात बावी, अशा मागण्या करण्यात आल्या.मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग नेवासा श्री दुबाळे उप अभियंता यांच्या कडे मागणी केली अस्थांना तेही डोळेझाक करीत ठेकेदारासअभय दिले. दोन आठवडे उलटूनही
ठेकेदारावर कारवाई न झाल्याने व
रस्ता कामास सुरुवात न केल्याने आक्रमकभूमिकाघे
शुक्रवारी नेवासा तालुका कॉंग्रेस
कार्यकर्ते व तामसवाडी व वाटापूर ग्रामस्थानी सार्वजानिक बांधकाम उप विभाग नेवासा श्री दुबाळे उप अभियंता यांना घेराव घालू आंदोलन केले.यावेळी काँग्रेस कमिटी अध्यक्ष संभाजी माळवंदे तामस वाडीचे सरपंच चंद्रकांत जगताप यांनी लवकर काम सुरू न झाल्यास ग्रामस्थांसह आत्मदहन करण्याचा इशारा दिला. यावेळी जिल्हाचेराजेंद्र वाघ अल्फसंख्यकविभागाचे आलम पिंजारी, विद्यार्थी काँग्रेसचे इलियास शेख, शहर काँग्रेसचे अंजुम पटेल, मुसा बागवान, रंजन जाधव, सोशल संदीप मोटे, संजय होडगर, गोरक्षनाथ का, किरण साठे, द्वारक जाधव, दत्तात्रय फोफ ज्ञानेश्वर कर्मुले, संदीप जगताप, उपसरपंच अशोक आयनार, हरिभाऊ कर्जुले लहान जगताप, शोभा पाठारे, ज्योती भोसले आदी उपस्थित होते.
----------------------------------------------------===================================
सह.संपादक.रंजित बतरा शब्द...✍️✅️🇮🇳...रचना .संकलन.वार्ता...
===================================
----------------------------------------------------
No comments:
Post a Comment