राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, June 13, 2023

बॅटरी व मोटारसायकल चोरांचा सुळसुळाट नाऊर परिसरात ?

नाऊर - वार्ताहर - वार्ता -

श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील शेतकऱ्यांच्या बॅटऱ्या चोरीच्या घटनेनंतर आता मोटारसायकल चोऱ्या वाढल्या आहेत. या परिसरातून दोन मोटारसायकलींची चोरी झाली आहे.नाऊर येथून राहत्या घरापासुन परवा दि. 11 रोजी पहाटे 3 ते 5 च्या सुमारास नवाज पटेल यांचे स्नेही समिर पठाण (रा.माणिक दौंडी ता पाथर्डी) यांची होंडा कंपनीची शाईन (क्र. एमएच 20 इएक्स 8751) ही गाडी तर काल दि. 12 रोजी पहाटेच्या सुमारास शिक्षक अरुण शिंदे यांची बजाज डिस्कव्हर (नं. एमएच 17 एयु 4060) ही गाडी चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.मागील आठवड्यातच खैरीचे अॅड. दिनेश पुंड व पत्रकार संदीप जगताप यांची नव्या ट्रॅक्टरच्या बॅटरीची चोरी झाली होती. या चोरांचा थैमान वाढला असून त्वरीत बंदोबस्त करावा,अशी मागणी ग्रामस्थांतून
करण्यात येत आहे.श्रीरामपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून जुगार सोरट, दारू, रात्रीची बिनधास्तपणे चालणारी अवैध वाळू वाहतूक यांना तालुका पोलिसांचा समरी पावर धाक उरला नसल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी पोलिस उपाधिक्षक संदीप मिटके यांचेसह तत्कालिन सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांनी गुन्हेगारीवर पूर्ण पणे थरकाप वचक ठेवला  होता. मात्र सध्या तालुका पोलिस ठाणे बघ्याची भूमिका घेत आहे. अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांनीच यात स्वःत लक्ष घालण्याची गरज आहे.




No comments:

Post a Comment