(मुंबई) - प्रतिनिधि - उत्तसेवा -
मुंबई : - वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येताना कोणीही पुष्पगुच्छ किंवा मिठाई न आणता येताना एखाद्या झाडाचे रोप किंवा शैक्षणिक साहित्य घेऊन यावे, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिक तसेच हितचिंतकांना केले आहे. वाढदिवसानिमित्त जमणारे साहित्य हे गरजू विद्यार्थ्यांमध्ये वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.राज ठाकरे यांचा १४ जूनला वाढदिवस आहे. या दिवशी भेटायला येताना काय
करावे, याबाबत त्यांनीच पदाधिकाऱ्यांना पत्र लिहिले असून त्यांनी हे आवाहन केले आहे. राज यांना वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून मनसैनिक मुंबईत 'शिवतीर्थ' बंगल्यावर दाखल होत असतात. अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते हे पुष्पगुच्छ आणि मिठाई घेऊन येतात. यंदा मात्र हे नको असे आवाहन करणाऱ्या पत्रात राज यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून
महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते. पण तरीही महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात. पण यावर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की, कृपया पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका.
तुम्हाला अगदीच काही आणावेसे वाटत असेल तर येताना झाडाचे रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या असतील किंवा तसेच एखादे छोटेसे शैक्षणिक साहित्य आणा. तुम्ही दिलेली झाडांची रोपे आपण विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ. आणि जे काही शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून आणाल ते गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ. तुम्ही माझ्या या विनंतीचा नक्की मान ठेवाल, याची मला खात्री आहे.
----------------------------------------------------===================================
: - राजु मिर्जा शब्द...🖊️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता ...+919730595775
===================================
----------------------------------------------------
No comments:
Post a Comment