भोकर - प्रतिनिधि - वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील शेतकरी कु.अश्वीनी पोपट काळे हिने बारावी नंतर नुकत्याच संपन्न झालेल्या सीईटी (एम एच टी) परीक्षेत ९९.६७ टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाली आहे. तीचे या सुयशाबद्दल सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.
भोकर येथील प्रगतशिल शेतकरी पोपट बबनराव काळे यांची कन्या कु.अश्वीनी पोपट काळे हिने बारावीचे परीक्षेत श्रीरामपूर येथील रावबहादुर नारायणराव बोरावके महाविद्यालयात विज्ञान शाखेत ८९.६७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला होता. तसेच येथील दिव्य दयाचंद इंग्लीश स्कुलमध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला होता.
त्यानंतर नुकत्याच संपन्न झालेल्या एमएचटी सिईटी परीक्षेत पी सी बी ग्रुप मध्ये ९९.६७ टक्के गुण मिळविले आहेत. तीचे या यशाबद्दल सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे. तीच या यशाबद्दल अशोक कारखाण्याचे उपाध्यक्ष पुंजाहरी शिंदे, सोसायटीचे अध्यक्ष किशोर छल्लारे, उपाध्यक्षा सुमन मते, ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक महेश पटारे, संजीवनी पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश माळवदे, उपाध्यक्ष भाऊराव आबुज, पोलीस पाटील बाबासाहेब साळवे आदिंनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))
No comments:
Post a Comment