जिल्ह्यातील एक लोकप्रिय ग्रामीण विनोदी लेखक नामदेवराव देसाई म्हणजे आपल्या लेखनाद्वारे,भाषणाद्वारे सर्वांना खळखळून हसविणारे व्यक्तिमत्व होते.
(अहमदनगर) - प्रतिनिधि - उत्तसेवा ---
04 डिसेंबर 1939 रोजी जन्म झालेले नामदेवराव दामोदर देसाई यांचे 12 जून 2023 रोजी निधन झाले.84 वर्ष आयुष्य लाभलेले नामदेवराव देसाई यांचे गाव नाऊर ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर असून ते सध्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कोळगांव वास्तव्य करीत होते. 12 जून 2023 रोजी नामदेवराव देसाई यांचे निधन झाले नि ही वार्ता समजताच जनसमुदाय गोळा झाला.त्यांच्या जाण्याने जणू एकाकीपण उरले आहे.कोळगाव येथे त्यांचा मुलगा नितीन नामदेवराव देसाई शेती व्यवसाय करतात.शेतशिवारी श्रमसाधना करीत नामदेवरावांनी बी.एस्सी.केले. बेलापूर येथील जे. टी.एस. हायस्कुलमध्ये शिक्षकाची नोकरी केली.1978-79 पासून 'साहित्यशिल्प'च्या माध्यमातून साहित्यिक उपक्रमातून श्रीरामपूरला साहित्य वलय लाभले. खासदार गोविंदराव आदिक साहेब हॆ साहित्यिकप्रेमी असल्यामुळे 'साहित्यशिल्प' ला गती आली.प्रा.विजयराव कसबेकर,सुमतीताई लांडे, मेघाताई किराणे,रामचंद्र राऊत, शिवाजी काळे, म. कृ. आगाशे, स. कृ. गायकवाड आदिंनी अनेक साहित्यिक उपक्रम घेतले.27 जानेवारी 1983 रोजी श्रीरामपूरला महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा सुरु झाली. नामदेवराव देसाई यांनी 'श्रीरामपूर टाइम्स'मधून लेखनाला सुरुवात केली. त्यांचे 'पंचनामा ', ' भ्रष्ट्राचार कसा करावा 'हॆ त्यांचे ग्रामीण विनोदी कथासंग्रह प्रभावी ठरले. 'लगीन जन्क्शन झालंच पाहिजे ', 'नाथा घरची उलटी खूण 'असे नाट्यलेखन केले.'आस्था' चित्रपटातील त्यांची सरपंचाची भूमिका ठसठसीत झाली. 1997 ला अहमदनगर येथील 70 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्यांच्या सहकार्यवाह नेतृत्वाखाली संपन्न झाले. श्रीरामपूर मसाप शाखा स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला.शब्दालय प्रकाशन, साहित्य प्रबोधन मंच, वाचन संस्कृती प्रतिष्ठान, प्रवाशी संघटना, ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा, स्नेहप्रकाश प्रकाशन अशा अनेक साहित्यिक व्यासपीठावर त्यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले. शब्दगन्ध साहित्यिक परिषद आणि सामाजिक चळवळीत ते सहभागीं होत असत.शब्दगन्धच्या हिवरे बाजार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी 2020 ला 'नामनिराळा 'गौरवग्रन्थ पत्रकार प्रकाश कुलथे यांच्या स्नेहप्रकाश प्रकाशनतर्फे प्रकाशित केला. ते महत्वाचे पुस्तक आहे.त्यात अनेकांचे लेख म्हणजे आठवणींचा दस्तऐवज आहे. नामदेवराव देसाई हॆ
'साहित्यातील एक देवमाणूस 'हरवल्याची दुःखवेदना मनाशी आहे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे.
(((डॉ. बाबुराव उपाध्ये,श्रीरामपूर))) 9270087640
No comments:
Post a Comment