(बेलापूर) - प्रतिनिधि - वार्ता -
आंतरविद्याशाखीय विचार प्रवाह" हे पुस्तक संशोधन संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त ठरेल असे उद्गार बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव ॲड. शरद सोमाणी यांनी काढले. ते "आंतरविद्याशाखीय विचार प्रवाह"या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. ते पुढे असेही म्हणाले की,हे पुस्तक पुणे येथिल ज्ञानसूर्य प्रकाशनच्या संचालिका डॉ.उमा काळे यांनी प्रकाशित केले असून या पुस्तकांमध्ये एकूण ५५ शोधनिबंध लेखकांनी शोधनिबंध लिहिलेले आहेत. लेखक, संपादक ,सहसंपादक,प्रकाशक यांचे मी अभिनंदन करतो .या पुस्तकात अनेक वेगवेगळ्या विषयांवर लेखन झालेले आहे ते संशोधनाला अतिशय उपयोगी पडेल याची खात्री आहे " बेलापूर महाविद्यालयाचे "भाषा सामाजिक शास्त्रे आणि वाणिज्य विद्या व्यवस्थापन"या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्र नुकतेच संपन्न झाले होते. या चर्चासत्रात एकूण ५५ शोधनिबंध लेखकांनी सहभाग नोंदविला होता.याच शोधनिबंधाचे पुस्तकरुपात संपादन प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी केले, कार्यकारी संपादक म्हणून डॉ. मनोज तेलोरे यांनी काम पाहिले तर सहसंपादक म्हणून विभाग प्रमुखांनी कामकाज पाहिले आहे. या पुस्तकात अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर शोधनिबंध समाविष्ट आहेत.४६२ पृष्ठांच्या या पुस्तकातून अनेक संदर्भ अभ्यासक व संशोधकांना मिळू शकतील.या पुस्तकाचे प्रकाशन बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणपतलाल मुथ्था, सचिव ॲड. शरद सोमाणी, बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त श्रीवल्लभ राठी ,जेटीएस शिक्षण संकुलाचे प्रमुख बापूसाहेब पुजारी,प्राचार्य डॉ गुंफा कोकाटे,परीक्षा अधिकारी प्रा. प्रकाश देशपांडे ,प्रा.चंद्रकांत कोतकर प्रा.बाबासाहेब पवार, कार्यालयीन अधीक्षक संदेश शाहिर, भेर्डापूर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तांबे सर आदिंच्या शुभहस्ते हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))
No comments:
Post a Comment