💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*!! सचिव चे षटकारे अन् शब्दांचे फटकारे !!*
मित्रहो मागे कोरोना संकट काळात आपण चांगलं पाहिलं आणि अनुभवलं देखील असेल की,कोण कोणाच्या कामी येतो अन् कोण कोणाला साथ देतो ?, अशा अटीतटीच्या संकट समयी जेव्हा मदतीची नितांत आवश्यकता असते त्यावेळी कोणीच पुढे येत नाही,आणि कोणीच साथ देत नाही,अशावेळी कामी येतो तो केवळ शेजार धर्म, मग तो कोणत्याही जाती- धर्माचा का असेना तोच वेळप्रसंगी पुढाकार घेऊन वेळ प्रसंगी साथ देतो. मात्र ज्यांनी निवडणूक काळात मोठमोठी आश्वासने देवून मतं पदरात पाडून घेतली ते कधी ढुंकूनही पहायला तयार नसतात, परंतू निवडणूक लागली रे लागली की झोपी गेलेले हे संधी साधू भस्मासुर क्षणात जागे होतात, लगेच भेटीगाठी आणी आश्वासनांच्या खैरातींचा यांच्याकरवी अक्षरशः पाऊसच पडायला सुरुवात होते, मात्र ज्या पावसात ज्यांची घरं गळतात हे त्यांनाच माहीत असते की पावसाळा म्हणजे नेमका काय असतो ?, अशा भरपावसात जेव्हा एखाद्या झोपडपट्टीतील ग्रहस्थाचे घर गळते तो पानगागद/पुष्ठे/ प्लास्टिक लावून घरात येणाऱ्या पावसाच्या पाण्यास थांबविण्याचा प्रयत्न करत पावसाच्या पाण्यापासून आपला आणि परिवाराचा बचाव कसा करता येईल या प्रयत्नात असतो,पावसाळ्यातील रात्र ही त्यास अक्षरशः जागुनच काढावी लागते ही सत्य परिस्थिती आणि व्याथा आजही झोपडपट्टीतील अनेक घर/ कुटुंबांची आहे, आर्थिक परिस्थिती अभावी त्यांना पुरेसा आडोसा देखील उपलब्ध होवू शकत नाही ही वास्तविकता आहे,त्यावर आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडे कोणतीही नागरी समस्यां घेऊन गेल्यास त्या समस्यांचे निराकरण करणे तर सोडाच त्याऐवजी तो समस्या ऐकून घेण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करत पुढे पुढे पळतो आणि एकदा निवडून गेलेले काही लोकप्रतिनिधी हे पुन्हा पाच वर्षांपर्यंत आपल्या कार्यक्षेत्रात आपले मुखदर्शन देखील देत नाही की फिरकून /ढुंकूनही बघत नाहीत,अशा लोकप्रतिनिधींना निवडून देण्यापेक्षा मतदान न करता मत नाकारण्याचा (नोटा) अधिकार वापरला गेला पाहिजे तरच हे संधीसाधू लोकप्रतिनिधी ध्यानावर येतील आणि आपल्या कार्यक्षेत्रातील नागरी समस्यांकडे लक्ष देतील. क्रमशः
- सचिन भालेराव - श्रीरामपूर
*समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर*
No comments:
Post a Comment