श्रीरामपूर - प्रतिनिधि - विषेश - समाचार
शासनस्तरावर सध्या जिल्हा विभाजनाचा कोणताही विषय नसून जिल्हा विभाजनाचा निर्णय घेताना सर्व बाबी तपासून निर्णय होईल. सध्या राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जनतेच्या भावनांशी खेळण्याचा कुटील डाव काही राजकारणी करत असल्याचे मत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे ही गेली 43 वर्षांची मागणी आहे. जिल्ह्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रमुख कार्यालये येथे आहेत. त्यात आणखी भर पडून श्रीरामपूर जिल्ह्यासाठी आवश्यक असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उत्तर विभाग कार्यालय संगमनेर येथून श्रीरामपूर येथे स्थलांतरित करावे, संगमनेरचे प्रस्तावित उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रद्द करावे, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय श्रीरामपूर येथे मंजूर करावे, या मागण्यांसह श्रीरामपूर जिल्हा व्हावा, या मागणीचे निवेदन महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांना जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, शहराध्यक्ष मारूती बिंगले, मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिले.
तालुकाध्यक्ष पटारे व मारूती बिंगले यांनी, महसूल खात्याचा कारभार आपल्याकडे आला असल्याने श्रीरामपूर जिल्हा होण्याच्या आशा पल्लवित झाल्या असून आपण श्रीरामपूर जिल्ह्याचे सर्वांचे स्वप्न साकार करावे, अशी आग्रही मागणी केली. केतन खोरे यांनी, जिल्ह्याच्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालय, शहरालगत उपलब्ध शेती महामंडळाची जागा, अतिरिक्त नगर रचना कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय, अतिरिक्त पोलीस अधिक्षक कार्यालय, रेल्वे स्थानक, एमआयडीसी, जिल्हा सत्र न्यायालयामुळे पायाभरणी श्रीरामपूर येथे झालेली असल्याचे सविस्तर सांगितले.
यावेळी माजी जि.प. सदस्य शरद नवले, नानासाहेब पवार, नानासाहेब शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, सुनील वाणी, माजी नगरसेवक दीपक चव्हाण, रवी पाटील, विठ्ठल राऊत, मंजुषा ढोकचौळे, सुनील साठे, मनोज नवले, अभिषेक खंडागळे, बंडूकुमार शिंदे, पूजा चव्हाण, पुष्पलता हरदास, दत्ता जाधव, रुपेश हरकल, गौतम उपाध्ये, मिलींदकुमार साळवे, अजित बाबेल, बाबासाहेब साळवे, विजय आखाडे, विशाल यादव, अक्षय वर्पे, नितीन ललवाणी, महेंद्र पटारे, विशाल अंभोरे, बाळासाहेब हरदास, योगेश ओझा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------------------------------------------
===================================
सह,संपादक रंजित बतरा - शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
===================================
---------------------------------------------------
No comments:
Post a Comment