(अहमदनगर) - प्रतिनिधि - वार्ता -
शहरात मोठया प्रमाणात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असल्याने कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी विशेष पथक स्थापन करुन शोध मोहिम राबवली असून दुचाकी चोरणारा एक सराईत आरोपी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
शहरातील माळीवाडा बस स्टॅन्ड परीसरात मोटारसायकल व रिक्षा चोरी करणारा सुरज ऊर्फ सोनु शिवाजी शिंदे हा
अॅटो रिक्षासह मिळून आला. त्याने रिक्षाविषयी चुकीची माहिती दिल्याचे निदर्शनास आल्याने त्यास विश्वासात घेवून अधिक विचारपुस केली असता त्याने ती रिक्षा चिखली पोलीस स्टेशन हद्दीतून चोरून आणल्याची कबुली दिली. तसेच त्याने शहरात व परीसरात दुचाकी चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. या आरोपीकडून पोलिसांनी एक रिक्षा व ४ दुचाकी जप्त केल्या आहेत. या आरोपीवर यापूर्वी मोटरसायकल
व इतर चोरीचे कोतवाली तसेच तोफखाना पोलीस स्टेशन येथे सात गुन्हे दाखल आहेत.सदरची कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई मनोज कचरे, पोना शाहीद शेख, पोका प्रमोद लहारे, सुमित गवळी, दिपक रोहकले, सोमनाथ केकान, अशोक कांबळे तसेच सायबर सेलचे पोकॉ नितीन शिंदे यांनी सदरची कारवाई केली असून सदर गुन्हयाचा तपास पोलिस हेड काँस्टेबल इखे हे करत असल्याच समजते आहेत.
---------------------------------------------------===================================
कार्य,संपादक भगवंत सिंग प्रितम सिंग बतरा...शब्द
✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
------------------------------------------------------------------------
=====================================
No comments:
Post a Comment