( शिर्डी ) - प्रतिनिधि - वार्ता - नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० वाहनांवर शिडीं पोलिसांनी कारवाई केली आहे. या वाहनांवर हजारो रुपयांचा दंड करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी सांगितले, की शिर्डी शहरात चारचाकी वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक करणे, वाहनाची कागदपत्रे जवळ न बाळगणे, विमा न उतरवणे, रस्त्यावर वाहने उभी करणे, भरधाव वेगात वाहने चालवणे अशा पद्धतीने नियमाकडे दुर्लक्ष करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनावर श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. १६ जून रोजी सकाळपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. या कारवाईत मोटार वाहन
निरीक्षक विकास सूर्यवंशी, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अतुल गावडे, धनंजय गावित, चालक संदीप पलांडे यांनी भाग घेतला होता. आरटीओची कारवाई सुरू होताच नगर मनमाड रोडवरून अनेक वाहने परागंदा झाल्याचे दिसून आले. शिर्डी परिसरात नगर मनमाड रोडवर मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम लावण्यासाठी प्रादेशिक परिवहन
विभागाने मोहीम सुरू केलेली असून जे वाहनधारक, चालक, मालक शासकीय नियमांकडे दुर्लक्ष करतील, अशा वाहनधारकावर यापुढील काळातदेखील कारवाई अशीच सुरू राहणार असल्याची माहिती मोटार वाहन निरीक्षक विकास सूर्यवंशी यांनी दिली. या कारवाईत जवळपास प्रतिवाहन १० हजार रुपयांच्या आसपास दंड करण्यात आला.
---------------------------------------------------===================================
सह,संपादक रंजीत बतरा - शब्द... ✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
---------------------------------------------------===================================
No comments:
Post a Comment