राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, June 19, 2023

दोघा सराईत गुन्हेगारांना वेपाऱ्यास लुटणारे दोन तासात अटक तेंच्या कडून एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत : श्रीरामपूर...

( श्रीरामपूर ) - प्रतिनिधि - समाचार पोलिसांनी दोन तासात मुद्देमालासह अटक  केली. त्यांच्याकडून पोलिसांनी सोन्याची चेन रोख रक्कम व मोबाईल असा एकुण 1 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. श्रीरामपूर शहर पोलीसांची ही विषेश प्रयत्नशिल कामगिरी केली.याबाबतची अधिक माहिती अशी की, बेलापूर ( (ता.श्रीरामपूर) येथील गुरुकृपा स्टील अॅण्ड बिल्डिंग मटेरियल, बेलापुर, दुकानांचे मालक बाळकृष्ण गोविंद खोसे (राहाणार.खोसेवस्ती,बेलापूर चौक,कोल्हार रोड) यांनी रविवार दि. 18 जून रोजी सकाळी 11 वा. त्यांच्या दुकानात लागणारे मटेरियल घेण्यासाठी 20 हजार रुपये खिशात घेतले तसेच त्यांचे जुने ग्राहक प्रशांत डांगे (राहाणार राहाता) यांच्याकडून उधारीचे पैसे आणण्यासाठी मोटारसायकलवर राहाता येथे गेले होते. राहाता येथे डांगे भेटले नाही म्हणून ते पुन्हा गणेशनगर, बाकडी मार्गे दत्तनगर येथे आले व नेहमप्रमाणे टिळकनगर कारखान्याच्या पाठीमागुन एकलहरेमार्गे बेलापुरकडे जाण्यास निघाले.
टिळकनगर येथील रांजणखोल चौकातून थोड्या अंतरावर गेल्यावर दोन इसम त्याच्या मोटारसायकला आडवे होवुन त्यांना थांबवले. त्यातील एका इसमाने त्याच्या हातातील चाकू दाखवून त्यांना धमकावून म्हणाला की, शांत बस आणि आम्ही सांगतो तसे चल, असे म्हणून तो व त्याचा सोबतचा दुसरा इसम असे दोघे खोसे यांच्या मोटारसायकलवर मागे बसन त्यांना मोटारसायकल टिळकनगर कारखान्याकडे घेण्यास सांगितली.
खोसे यांना मोटारसायकल टिळकनगर कारखाना व पुढे एकलहरेकडे जाणाऱ्या रोडने रांजणखोल शिवारात सांळुखेवस्ती समोर मोटारसायकल बाजुला थांबायला सांगितली. मोटारसायकल थांबवताच त्यांनी चाकुचा धाक दाखवून खोसे यांच्या खिशातील 20 हजार रुपये, गळ्यातील सोन्याची चेन व एक मोबाईल काढून घेतला. त्यावेळी तिथे आणखी एक इसम मोटारसायकलवर आला व तिघे मिळून खोसे यांना आणखी पैसे पाहिजे म्हणून मारहाण करु लागले. त्यावेळी खोसे यांनी आराओरडा केल्याने आरोपी मोटारसायकलवर पळुन गेले. याबाबत खोसे यांच्या फिर्यादीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं. 583/2023 भादंवि कलम 394, 341.504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरिक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने झिरो पोलीस व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला असता संशयित रईस शेरखान पठाण (वय 28, रा. टिळकनगर, ता. श्रीरामपूर) व रोहित सोपान रामटेके (वय 31, रा. रांजणखोल ता. श्रीरामपूर) व त्याचा एक अनोळखी साथीदार यांनी हा गुन्हा केल्याची व सध्या ते टिळकनगर परिसरात लपले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या परिसरात सापळा लावून, शिताफीने पाठलाग करून यातील दोन आरोपींना पकडले. पोलिसांना त्यांनी गुन्हाची कबुली दिली. त्याच्याकडुन चोरीस गेलेला 70 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन (अंदाजे 12 ग्रॅम वजनाची), 20 हजार रु. रोख (500 दराच्या 40 चलनी नोटा) व 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल अ एकूण 1 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
पोलीस अधीक्षक राकेश ओला  अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचेकडील तपास पथकातील सहायक पोलीस निरिक्षक़ विठ्ठल पाटील, जिवन बोरसे, पोलीस नाईक रघुनाथ कारखेले, रामेश्वर ढोकणे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, गौतम लगड, रमिझराजा अत्तार, गणेश गावडे, मच्छिद्र कातखडे, संभाजी खरात तसेच अपर पोलीस अधिक्षक कार्यालयाकडील पोलीस नाईक सचिन धनाड, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद जाधव व आकाश भैरट यांनी ही कारवाई केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक श्री. गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक श्रीमती देवरे या करीत असल्याचे माहिती नमूद केली आहेत.

---------------------------------------------------
===================================
कार्य, संपादक भगवंत सिंग प्रितम सिंग बतरा शब्द...✍️✅️🇮🇳... रचना संकलन वार्ता...
---------------------------------------------------
===================================

..






.

No comments:

Post a Comment