शेवगाव - प्रतिनिधि - वार्ता -
तहसिल कार्यालयात चॅप्टर केसमध्ये मदत करण्यासाठी तसेच दोन मुलांना सबजेलमधून सोडण्यासाठी मदत करण्याचे सांगत चार हजार रूपयांची लाच स्विकारताना शेवगाव तहसिल कार्यालयातील महसुल सहाय्यकास नाशिक लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली.संतोष महादेव गर्जे (38) असे पकडण्यात आलेल्या महसुल सहायकाचे नाव आहे. बुधवारी दुपारी शेवगाव तहसिल कार्याल्यात हा सापळा रचनण्यात आला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या दोन मुले व एक भाचा यांना सबजेलमधून सोडवण्यासाठी मदत करण्याचे अश्वासन तसेच तहसिल कार्यालयात चॅप्टर केस दाखल झाल्यानंतर त्यामध्ये मदत करण्याच्या बदल्यात प्रत्येकी 2 हजार रूपये या प्रमाणे गर्जे याने तक्रारदाराकडे मागणी केली होती. तडजोडी अंती ही रक्कम 4 हजार रूपये ठरली होती.तक्रारदार यांनी याबाबात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील विभागीय कार्यालयात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार नाशिक येथील पथकाने शेवगावच्या तहसिल कार्यालयात आज सापळा रचला होता. पैसे स्विकारताना पथकाने गर्जे यास ताब्यात घेतले. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------------------------------------------===================================::- कार्य.संपादक.भगवंत.सिंग प्रितम सिंग बतरा...शब्द ✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
===================================----------------------------------------------------
No comments:
Post a Comment