राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, June 15, 2023

*येणारा काळ शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षासाठी उज्वल, शिवसैनिकांनी तन मन धनाने संघटना वाढीसाठी प्रयत्न करावेत; जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे ?

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -
येणारा काळ हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षासाठी अतिशय उज्वल असून शिवसैनिकांनी तन मन धनाने संघटना वाढीसाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी केले.
नगर जिल्हयातील शिवसेनेच्या प्रथम शाखेचा ४० वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने भव्य कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ४० वर्ष हा काळ खूप मोठा आहे तरी आजही शिवसैनिकांचा उत्साह तसाच आहे याचे मोठे कौतुक वाटले.
या प्रसंगी दक्षिण शिवसेना जिल्हा प्रमुख श्री राजेंद्र दळवी, 
प्रथम शाखेचे शाखा प्रमुख सदा कराड,संघटक सुधा तावडे, विजयभाऊ तिवारी, ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा प्रमुख अशोक थोरे, माजी उप जिल्हा प्रमु जिल्हा प्रमुख शेखर दुब्बैया, शिवसेना नेते अशोक नांगर नोबल हॉस्पिटलचे ॲडमिन डॉ.टेंगे, सिव्हील सर्जन डॉ.वसंतराव जमधडे,उप तालुका प्रमुख विजय बडाख,विजय नगर कर, गोर्डे महाराज, हरीश कुलकर्णी,अझीम पठाण आदीसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची पूजा करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
  या प्रसंगी बोलताना दक्षिण जिल्हा प्रमुख राजेन्द्र दळवी यांनी शाखेस शुभेच्छा देवून आम्ही नगर ला राहतो तरी आम्हाला कधी ही आवाज दिल्यास आम्ही हजर राहू असे आश्वासन देऊन त्यांनी कार्या बद्दल समाधान व्यक्त केले. शेवटी गणेश कराड यांनी आभार मानले.

(((संकलन : समता न्यूज नेटवर्क)))



No comments:

Post a Comment