राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, June 7, 2023

जिल्हा न्यायालयात लोकअभिरक्षक कार्यालय कार्यान्वित गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन ?

अहमदनगर जिमाका - वृत्तसेवा - समाचार -

 जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अंतर्गत जिल्हा न्यायालय,अहमदनगर येथे नव्याने लोकअभिरक्षक कार्यालय कार्यान्वित करण्यात आले असून याद्वारे जिल्हयातील गरजु पक्षकारांना फौजदारी प्रकरणात बचावासाठी प्रतिनीधीत्व करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने अनुभवी व सक्षम विधीज्ञांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या सेवेच्या लाभासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अथवा ०२४१-२३५१११०, ८५९१९०३६१६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगरचे अध्यक्ष सुधाकर वें.यार्लगड्डा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
जिल्हा न्यायालयाच्या तळ मजल्यावर सुरू करण्यात आलेल्या लोकअभिरक्षक कार्यालयाच्या माध्यमातून अनुसुचित जाती व जमातीचे व्यक्ती, महिला व विधीसंघर्षीत बालक, ज्यांचे वार्षिक उत्पन्न ३ लाखांपेक्षा कमी आहे असे व्यक्ती सेवेचा लाभ घेऊ शकतात. तसेच न्यायाधीन व शिक्षाधीन बंदी यांनादेखील लोकअभिरक्षक कार्यालयामार्फत मोफत विधी सेवा दिली जाते.
सर्व जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयातील प्रकरणासाठी मुख्य बचाव पक्ष विधी सेवा सल्लागार म्हणून ॲड. अनिल दि.सरोदे यांची तर उपमुख्य बचाव पक्ष विधी सेवा सल्लागार म्हणून ॲड. कश्यप धो.तरकसे व ॲड. जरजरी बक्ष ग.शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी वरिष्ठ व कनिष्ठ स्तर यांच्या न्यायालयातील प्रकरणासाठी सहायक विधी बचाव पक्ष विधी सेवा सल्लागार म्हणून ॲड. मच्छिंद्र ज.देठे, ॲड. रुपाली शि.पठारे, ॲड. रत्ना शि.दळवी-विंचुरकर व ॲड. वैभव दि.बागुल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या या सेवेचा गरजूंनी लाभ घ्यावा, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))

No comments:

Post a Comment