राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, June 7, 2023

शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने गझल, काव्य लेखन कार्यशाळा व काव्य संमेलन ?

अहमदनगर - प्रतिनिधि - वार्ता -

नवोदितांसाठी गझल व काव्य लेखन कार्यशाळा तसेच काव्य संमेलन अहमदनगर येथे आयोजित करण्यात येतं असून यामध्ये सहभागी होण्यासाठी नवोदितांनी आपली नावें नोंदवावित,असे आवाहन शब्दगंध चे संस्थापक सचिव सुनील गोसावी व अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी केले आहे.
     शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने नवोदितांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्याचे काम गेल्या काही वर्षापासून सुरू असून लवकरच शब्दगंध चे साहित्य संमेलन होणार आहे, त्या दृष्टीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. शब्दगंध च्या वतीने परिसंवाद, चर्चासत्र, पुस्तक प्रकाशन, साहित्य संवाद व कार्यशाळा अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने सुरू असतात.
रविवारी होणाऱ्या या गझल लेखन व काव्य लेखन कार्यशाळेत मान्यवर लेखक,कवी मार्गदर्शन करणार असून सहभागी होणाऱ्यानां काव्यवाचनाची संधी द्यावी मिळणार आहे, यासाठी मोबाईल क्रमांक ९९२१००९७५० (9921009750) वर संपर्क साधावा, असे आवाहन शब्दगंध चे किशोर डोंगरे,अजयकुमार पवार, स्वाती ठूबे, सुभाष सोनवणे, शर्मिला गोसावी, शाहिर भारत गाडेकर, रामकिसन माने, राजेंद्र चोभे यांनी केले आहे.

[[[[ समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर ]]]

No comments:

Post a Comment