( नाशिक ) - प्रतिनिधि - वार्ता - उपनिरीक्षक अश्विनी टिळे यांच्या फिर्यादीवरुन त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक रामकृष्ण जगताप करत आहेत. तसेच गेल्या पंधरा दिवसांत ८८ गुन्हे दाखल करून ९० संशयितांवर कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल १ कोटी ३२ लाख ५४ हजार ४८३ रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
दरम्यान, गुटखा, पान मसाला व इतर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाविषयी नागरिकांना काही माहिती असल्यास नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांक ६२६२२५६३६३ या क्रमांकावर संपर्क साधून नाशिक ग्रामीण पोलीसांनी सुरू केलेल्या अभियानास हातभार लावावा असे आवाहन पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment