राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, June 23, 2023

*खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या १३ विविध विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा**बी.आर.चेडे शिरसगांव*

*बी.आर.चेडे शिरसगांव*
२१ जुन हा आंतरराष्ट्रीय योग दिन खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सर्व विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,संस्थेचे सहसचिव ॲड.जयंत चौधरी यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिक्षक, सौ.शेडगे सुजाता,सौ. रचना फासाटे, श्री.महेश पटारे, दिनेशभैय्या चव्हाण,स्वयंसेवक व साधक यांच्या समन्वयातून संस्थेच्या विविध विद्यालयात योग दिन कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.
निमगांवखैरी विद्यालयात आर्ट ऑफ लिव्हिंग च्या साधक सौ.नयना चौधरी व सौ.अंजली सिकची यांनी प्रार्थना प्राणायाम शांतीपाठ,योगासने,व सूर्यनमस्कार यांचे सादरीकरण विद्यार्थी, शिक्षकांसह केले. कारेगाव या विद्यालयात आर्ट ऑफ लिव्हिंग चे भरत जोंधळे व सुनीता डहाळे यांनी योग प्रात्यक्षिक घेतले.माळेवाडी विद्यालयात आर्ट ऑफ लिव्हिंग चे किशोर थोरात,अशोक औताडे, दिगंबर औताडे,सचिन वमने, सोनाली जानराव यांनी योगाचे धडे दिले.
उक्कलगाव विद्यालयात अर्चना दिदी, किर्ती दिदी,ज्योती दिदी यांनी योग ,प्राणायाम व सूर्यनमस्कार चे प्रात्यक्षिक घेतले.
मातापूर विद्यालयात अनिल औताडे यांनी योग प्रात्यक्षिक घेतले.
हरेगाव विद्यालयात बाळासाहेब वमने यांनी योग प्रात्यक्षिक घेतले.
खानापूर विद्यालयात चौधरी यांनी योग,प्राणायाम, सूर्य नमस्कार प्रात्यक्षिक केले.
अँग्लो उर्दू हायस्कूल मध्ये
निलेश सिकची व गणेश शिंदे यांनी विद्यार्थ्यी व शिक्षकांसह योग प्रात्यक्षिक घेतले,
अशोकनगर विद्यालयात संदिप कासार यांनी योग,प्राणायाम यांचे महत्त्व सांगुन प्रात्यक्षिके केली.
शिरसगांव विद्यालयात दिनेश भैय्या चव्हाण यांनी योग प्राणायाम घेऊन विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व सांगितले.
खोकर विद्यालयात रमेश लबडे,शिवम लबडे,व शिवानी मुथा यांनी योगाचे प्रात्यक्षिके सादर केली.
माळवाडगाव विद्यालयात महेश पटारे यांनी योग प्रात्यक्षिक घेतले.
अशा प्रकारे संस्थेच्या जवळपास 
६५०० विद्यार्थ्यांनी योगाचे धडे घेऊन दैनंदिन जीवनात दररोज योगा करण्याचा संकल्प केला.
या उपक्रमास संस्थेचे सचिव. अविनाश दादा आदिक व विश्वस्त अनुराधाताई आदिक यांनी मार्गदर्शन केले.
*वृत्तसंकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

No comments:

Post a Comment