💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
श्रीरामपूर प्रतिनिधी:
समाज हा अनेकांच्या योगदानातून नावारूपाला येतो.माझे सासरे स्व.अड, रावसाहेब शिंदे यांनी जीवनभर 'देतो तो देव 'या भावनेतून समाजसेवा केली. तो आदर्श आमच्यासमोर आहे.मला पुरस्कार लाभला तो सेवाकार्यातील सहभागातून,अशा पुरस्कारामुळे सत्कार्याला अधिक गती मिळते, असे विचार प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रेरणा शिंदे यांनी व्यक्त केले.
येथील महादेव मळ्यात आयोजित 'सत्कार्याचा सत्कार 'या कार्यक्रमात डॉ. प्रेरणा शिंदे बोलत होत्या.त्यांना नुकताच महाराष्ट्र राज्य स्त्रीरोगतज्ज्ञ संघटना, मुबंई संस्थेचा सन्मान पुरस्कार देण्यात आला, त्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. माजी प्राचार्य टी. ई शेळके, प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे, साहित्यिक डॉ बाबुराव उपाध्ये, प्रा. शिवाजीराव बारगळ, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे,डॉ. राजीव शिंदे आदी उपस्थित होते.त्यांनी शाल,पुस्तके, भेटवस्तू देऊन डॉ. प्रेरणा शिंदे यांचा सर्वांनी सत्कार केला, अभिनंदनपूर्वक मनोगते व्यक्त केली. डॉ. प्रेरणाताई शिंदे ह्या एक अनुभवी, सेवाभावी स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत, त्यांनी समाजात आदर्श वैद्यकीय सेवेने नावलौकिक प्राप्त केला आहे, त्याचबरोबर शिक्षण, समाज,संस्कार अशा विविध उप्रक्रमातून,माध्यमातून योगदान दिले, देत आहेत.विद्यानिकेतन शालेय उपक्रम, ऊसतोडीवाल्या मुलांना मदत, गरीब,गरजू मुलींचे पालकत्व आदी उपक्रम हॆ त्यांच्या कार्याचे मोठेपण उपस्थितांनी मनोगतातून सांगितले.डॉ. प्रेरणा शिंदे यांनी अशा आपुलकीच्या सन्मानामुळे आणखी जीवनऊर्जा मिळते, असे सांगत आभार मानले.
*वृत्तसंकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
No comments:
Post a Comment