श्रीरामपूर - भोकर - प्रतिनिधि - वार्ता
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील एका महानुभव आश्रमात नव्याने आलेल्या विवाहीत दाम्पत्याकडून येथील पुजार्यास लोखंडाची पट्टी व दगडाने जबरी मारहाण केल्याची घटना घडली असून जखमी पुजारी मोहनदादा अंकुळनेरकर यांचेवर श्रीरामपूर येथील साखर कामगार हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या प्रकरणी तालुका पोलीसांत दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
भोकर गावात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री चक्रधर मंदिर येथे गेल्या अनेक वर्षापासून अंतर्गत वाद सुरू आहेत. येथील महंत साधेराजबाबा अंकुळनेरकर व ग्रामस्थ या ठिकाणच्या नियमीतच्या वादाला कंटाळलेले आहेत. त्यातच अध्यात्मीक ठिकाण म्हणून कुठली कारवाई करायची असा प्रश्न अनेक वर्षापासून आहे. या प्रकरणी अनेकदा ग्रामसभेतही या ठिकाणच्या वादाचा विषय गाजलेला आहे. परंतू येथील महीलाराज मुळे या वादाकडे सर्वांनाच दुर्लक्ष करण्याशिवाय पर्याय दिसत नसल्याने सर्वजण अनेक वर्षापासून हे सहन करत आले आहेत. या वादावर पर्याय काढण्यासाठी येथील महंत सारंगधरबाबा यांनी ही अनेकदा प्रयत्न केले परंतू त्यांनाही अपयश आलेले आहे. परंतू ते वाद गावातच राहीले.
त्यातच येथे आता दुसर्या पिढीचे पुजारी म्हणून आलेले मोहनदादा द्वारकाबाई अंकुळनेरकर हे हजर झाले त्यानंतर येथील ऋतुजा नामक युवती बरोबर पती आकाश पिंगळे यांचे आगमण झाले अन् काही काळ थंडावलेले वाद पुन्हा सुरू झाले व त्याचे रूपांतर चक्क हाणामारीत झाले. अध्यात्मीक ठिकाणी टोकाचे पाऊल उचलले गेले. समाज प्रबोधनाचे कार्य सुरू असलेल्या या अध्यात्मीक व धार्मीक ठिकाणी अर्वाच्च शब्द सुरू झाले. समाज नेहमीच बघ्याच्या भुमिकेत राहीला कारण कुणाच्या धार्मीक भावना दुखायला नको. अध्यात्माला गालबोट लागायला नको म्हणून अनेकांना कळवळा असतानाही पुढे जाता येत नव्हते.
त्यातच या पिंगळे दाम्पत्याने येथील दुषीत वातावरणात भर टाकत येथे अर्वाच्य शिवीगाळ व नित्याच्या भांडणात दि.२० जून रोजी या भांडणाचे रूपांतर हाणामार्यात झाले. रात्री उशीराने झालेल्या हाणामार्यात येथील पुजारी मोहनदादा यांना दगडाने व लोखंडी पट्टीने मारहाण झाली. मध्यस्थासाठी गेलेल्या शेजारच्या काही प्रतिष्ठीतांना व मदतीसाठी आलेल्या पोलीसांनाही या भांडणात अर्वाच्या शब्दांना सामोरे जावे लागल्याची जोरदार चर्चा गावात सुरू आहे.
येथील पुजारी मोहनदादा यांनी मध्यरात्री पोलीसांना पाचारण करत अध्यात्मीक ठिकाणी पोलीसांची मदत घ्यावी लागली. पोलीसांच्या साक्षीने व मदतीने जखमी मोहनदादा यांना साखर कामगार हॉस्पीटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथील जखमी पुजारी मोहनदादा अंकुळनेरकर जबाबानुसार तालुका पोलीसांत फिर्याद दाखल करण्यात आली असून त्यात येथील आकाश पिंगळे व ऋतुजा पिंगळे यांनी फिर्यादीकडे त्यांचे पाहुणे आल्याचा राग येवून लोखंडाच्या पट्टीने डोक्यास मारून व पाठीवर दगडाने मारून जखमी केले व लाथा बुक्याने मारहाण करून घाणघाण शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद दाखल केली असून तालुका पोलीसात गु र नं.१३१२/२०२३ भादंविसं कलम ३२४,३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ. मोहन शिंदे हे पुढील तपास करत आहेत.
पावित्र्य, धार्मीकता व शांतता टिकविण्यासाठी विश्वस्त, ग्रामपंचायत व वरीष्ठानी लक्ष घालण्याची गरज*
दरम्यान येथील धार्मीक वातावरण निरंतर राहुन या तिर्थ क्षेत्राचे पावित्र्य टिकविण्यासाठी व गावची शांतता कायम करण्यासाठी येथील विश्वस्त मंडळाने, या पंथातील वरीष्ठ व ग्रामपंचायत यांनी तातडीने लक्ष घालत योग्य पावले उचलण्याची गरज असल्याची अपेक्षा ग्रामस्थ व येथील भाविक भक्ताकडून व्यक्त होताना दिसत आहे.
No comments:
Post a Comment