श्रीरामपूर (मोहसीन शेख)
श्रीरामपूर शहरातील लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते अजहरभाई शेख यांच्या वतीने प्रभाग क्रमांक १ मधील जॉगिंग ट्रॅक सुशोभीकरण, नवीन अंगणवाडी स्थापना तसेच विविध मुद्द्यांसाठी श्रीरामपूर नगरपालिकेतील मुख्याधिकार श्री गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
फातेमा हौसिंग सोसायटी व मिल्लतनगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत कॅनाल असून त्यालगत लाखो रुपयांचे खर्च करून स्थानिक रहिवासी यांच्या आरोग्याची काळजी म्हणून श्रीरामपूर नगरपालिकेने सुमारे १ किलोमीटर अंतराचे जॉगिंग ट्रॅक बनवलेले होते आणि त्यानंतर त्याची रखराखाव करण्याची जबाबदारी देखील नगरपालिकेची होती.
मात्र मागील काही काळात सदर कॅनॉल मधील कचरा, माती, निरुपयोगी वस्तू, तसेच कॅनॉल खोदकामाची माती देखील सादर जॉगिंग ट्रॅक वर टाकण्यात आली आणि लाखो रुपये खर्च करून जनतेचा आरोग्य जपण्यासाठी बनवलेल्या सादर जॉगिंग ट्रॅकला जनतेच्या आरोग्यासाठी धोका बनवण्यात आलं. त्यामुळे नाईलाजास्तव स्थानिक नागरिकांना आपला आरोग्य जपण्यासाठी व जॉगिंग करण्यासाठी लांब लांब अश्या ठिकाणी जावं लागत आहे.
तसेच फातेमा हौसिंग सोसायटी मध्ये मदरसा व मॅरेज हॉल असल्यामुळे बाहेरील नागरिक लग्न सोहळ्यासाठी येत असतांना व जॉगिंग ट्रॅकची अवस्था पाहून श्रीरामपूर सारख्या स्वच्छ व सुंदर शहराची प्रतिमा मलीन होते.
तसेच सोनावणे वस्ती, झिरंगे वस्ती आणि मिल्लत नगर येथे अंगणवाडी नसल्यामुळे स्थानिक रहिवासिंना मोठा त्रास सहन करत लहान मुलांना लांब लांब असलेल्या खाजगी आंगणवाड्यांमध्ये पैशे भरून पाठवावं लागत असून सदर बाबी मुळे घरामधील महिला भगिनींना लहान मुलांना घेऊन लांब लांब जावे लागत आहे आणि हि लहान मुलांसाठी खूप धोकादायक आहे तसेच दुसऱ्या प्रभागात असणाऱ्या अंगणवाडीमध्ये सदर भागाच्या रहिवासी यांच्या मुलांना प्रवेश दिला जात नाही त्यामुळे सदर परिसरात नवीन अंगणवाडीची स्थापना करण्यात यावी. अश्या विविध मागण्यांसाठी अजहरभाई शेख यांनी श्रीरामपूर नगरपालिकेतील मुख्याधिकारी श्री गणेश शिंदे यांना निवेदन दिले. या वेळी ऍड. मोहसीन शेख, फैजान तांबोळी, अरबाज शाह, दानिश तांबोळी, फैझान बागवान, मोईज पठाण, मजहर शाह, सागर देहरे, समीर शेख आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment