मुंबई - प्रतिनिधि - समाचार -
आठवडाभराच्या प्रतिक्षेनंतर अखेर मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून देशासह अनेक राज्यांमधील हवामानात बदल होत आहेत. यात काही राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत. तर काही ठिकाणी उन्हाचा चटका जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे
तर दुसरीकडे बिपरजॉय चक्रीवादळ (Biporjoy Cyclone) अधिकाधिक प्रभावी होताना दिसत असून ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे (Wind) वाहत आहे. त्यामुळे हे चक्रीवादळ पुढील २४ तासांत अत्यंत तीव्र होणार आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर चार राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून महाराष्ट्रातील मुंबई, पालघर, कोकण किनारपट्टीला अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या बिपरजॉय चक्रीवादळ मुंबईपासून ६३० किलोमीटर अंतरावर आहे.
याबाबत हवामान विभागाने (Meteorological
Department) दिलेल्या माहितीनुसार, बिपरजॉय
चक्रीवादळाचा फटका चार जिल्ह्यांना बसणार आहे. तसेच या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि केरळच्या समुद्रकिनारी भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून हवामान विभागाकडून मच्छिमारांना (Fisherman) इशारा देण्यात आला आहे.
तर बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्यातील काही भागात तापमान वाढण्याचा अंदाज देखील वर्तविण्यात आला आहे. यामधील मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
----------------------------------------------------
===================================
: - राजु मिर्जा... शब्द.🖊️✅️🇮🇳...रचना.संकलन. वार्ता...+919730595775
===================================
----------------------------------------------------
No comments:
Post a Comment