राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, June 10, 2023

जरी असे कर्तव्याने कठोर मात्र प्रेमाचा झिरा शिवाजीराव साळवे समाजकार्यातील हिरा ?


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सर्व समाजाला बरोबर घेऊन चालणारे,सामाजिक बांधिलकी जपणारे, निर्पेक्ष, निस्वार्थी मोठ्या मनाचे धनी असलेले आदर्श व्यक्तीमत्व शिवाजीराव साळवे

(शौकत भाई शेख)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष, मा. शिवाजीराव साळवे यांच्या वाढदिवसानिमित्त हा विशेष
आलेख...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
 जीवन जितके खडतर तितकेच ते सुंदरही असते.प्रयत्न न करता मिळालेली कोणतीही गोष्ट कायम स्वरुपी टिकून राहत नाही,आणि कष्टाने, प्रामाणिकपणे,कुणावरही अन्याय न करता, स्वतःच्या हिंमतीने केलेली यशस्वी वाटचाल हिच आपल्या जीवनाची खरी ओळख.आणि ही ओळख निर्माण करणारे एक आगळे - वेगळे आदर्शवत असे व्यक्तिमत्त्व म्हणजेच मा.शिवाजीराव साळवे साहेब.मा.शिवाजीराव साळवे साहेब होय,
त्यांचे बालपण अतिशय हलाखीच्या परिस्थितीत व गरिबीत गेले. घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल असताना आई-वडिलांनी त्यांना चांगले संस्कार दिले.खरे खोटे याचे उत्तम धडे तथा ज्ञान त्यांना आपल्या आईवडीलांकडून मिळाले. तथा मित्र परिवार व आई-वडील यांच्या चांगल्या संस्कारामुळे बालपणापासूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड होऊ लागली. साधे राहणीमान,उच्च विचार, निस्वार्थी मन यामुळे त्यांनी समाजात आपले एक आगळे वेगळे स्थान प्राप्त केले. सर्वांसाठी अडचणीच्या वेळेस खंबीरपणे साथ देणारे व्यक्तिमत्व. आपले काम व कुटुंबाची जबाबदारी सांभाळून, समाजाला पूर्ण वेळ देणारे निरपेक्ष व्यक्तिमत्व खरेतर असे व्यक्तिमत्व समाजाला मिळणे म्हणजे समाजासाठी भाग्याच असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, श्री.साळवे साहेबांनी जवळपास तीस वर्षाहून अधिक काळ राजकारण आणि समाजकारण यांची सांगड घालत त्यांनी सामाजिक कार्यातून उत्कृष्ट असा जनमानसात आपल्या उत्कृष्ट कार्याचा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्यात आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदात भावनेने समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. समाजाचा आपण देणं लागतो. छत्रपती शिवाजी महाराज,राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले , कर्मवीर भाऊराव पाटील , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, शिक्षणाची गंगोत्री क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले,फातेमाबी शेख, राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम अशा महापुरुषांच्या विचाराचा पगडा, त्यांचा अभ्यास, त्यांचे कार्य याचा मोठा प्रभाव श्री.साळवे साहेबांच्या जीवनावर झाला.या महापुरुषांच्या विचाराने त्यांनी स्वतःच्या जीवनात अमुलाग्र बदल करत फक्त समाज आणि समाज यांच्या साठीच आपले जीवन अर्पण करायचे असे त्यांनी निश्चयच केला.त्यांच्या या कार्यालाही कुटूंबातील सर्वांनी साथ दिली. त्यांना समाजात वावरताना असे आढळून आले की आपला देश स्वतंत्र होऊनही, समाजातील लोकांना अनेक अडचणी ,अनेक समस्या ,या जन्मापासूनच भेडसावत आहे. आणि त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे .शिक्षण ,व्यवसाय, नोकरी ,रोजगार ,दोन वेळेचे जेवण ,अंगभर कपडे ,अन्न ,वस्त्र, निवारा या सर्व गोष्टींसाठी आज समाज दररोज संकटाचा सामना करत आहे.हे पाहुन त्यांचे मन विचलित होऊन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्यांनी सर्वत्र हिंडून फिरून समाजातील तळागाळापर्यंत जाऊन खुप अभ्यास केला.आणि मग त्या उपेक्षित आणि दुर्लक्षितांच्या व्याथा ऐकून सामाजिक कार्यात स्वतःला पुर्णपणे झोकुन दिले. आज या समाजसेवेच्या कामात साहेबांना जवळपास ३० ते ३५ वर्ष झालेली आहेत ते सदैव निर्पेक्षतेने समाजाच्या सेवेत आहेत.चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या रुपाने त्यांनी राज्यभर समाजासाठी कोणत्याही अडचणी, समस्या याकरिता पूर्ण वेळ देत आहेत.त्यांनी अनेक ठिकाणी शाळेमध्ये गोरगरिबांच्या मुलांना शूज वाटप केले . निराधार गरीब मुलांना शालेय साहित्याचे वाटप केले,त्यांनी सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक भागात अभ्यास दौरे आयोजित करून त्या भागातील सखोल अभ्यास केला .समाजात येणाऱ्या अनेक प्रश्न/आडचणीची त्यांनी नेहमीच अग्रक्रमाने सोडवणूक करण्याचा कसोसीने प्रयत्न करत ते सोडविले, आज समाजाला चर्मकार संघर्ष समिती च्या रुपाने एक आदर्शवत निर्पेक्ष तथा निस्वार्थी नेता मिळालेला आहे. त्यांनी केवळ चर्मकार समाजच बरोबर न घेता त्यापलिकडे जाऊन त्यांनी मातंग,बौद्ध, धनगर, नाभिक, कटई , कहार, मुस्लिम,मराठा तसेच इतर सर्व समाजाला बरोबर घेऊन चर्मकार संघर्ष समितीच्या रूपाने राज्यभर काम करत आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी शैक्षणिक, व्यावसायिक, आर्थिक याबाबत वेळोवेळी मेळावे घेऊन मार्गदर्शन केले. महिलांना उद्योजक बनवण्यासाठी त्यांनी आपल्या मेळाव्यातून उत्कृष्ट अशी प्रबोधन करून व्यवसाय प्रवृत्त केले. सर्व समाज बांधवांना आपल्या कृतीतून निस्वार्थी जीवन कसे जगावे, एकमेकाला सहकार्य कसे करावे, आपण सर्व एकाच आईचे लेकरे आहोत. आपण सर्व भारतीय आहोत,आपण सर्वांनी एकमेकांना मदत करावी. अडचणी काळात आपण एकमेकांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे. अशा पद्धतीने सामाजिक बांधिलकीतून त्यांनी उत्कृष्ट असा समाज घडवण्याचा प्रयत्न केला. आज महाराष्ट्रामध्ये चर्मकार संघर्ष समितीच्या रूपाने एक समाजाला दिशादर्शक, विद्वान, निस्वार्थी ,समाजासाठी अहोरात्र झटणारा ,एक हिरा या रूपाने नेता मिळालेला आहे . शिवाजीराव साळवे यांनी जीवनात स्वतः चटके सोसलेले आहेत.त्यामुळे समाजाला, समाजाच्या सुखासाठी, समाजाच्या न्यायासाठी, समाजासाठी लढताना दिसत आहेत. राज्यात त्यांनी आपल्या कार्याच्या रूपाने अनेक मित्र बनवले. राजकीय, व्यावसायिक, शैक्षणिक अनेक ठिकाणी त्यांनी आपला आपले वर्चस्व कामाच्या रूपाने निर्माण केले .आजही आपले कुटुंब सांभाळून कोठेही समाजावर अन्याय झाल्यास त्या ठिकाणी सर्वांना बरोबर घेऊन समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. आज समाजामध्ये समस्यांचा पूर्ण अभ्यास माननीय साहेबांनी करून त्या सोडवून, समाज योग्य दिशेने ,योग्य वाटेने, संस्कारक्षमरित्या कसा चालेल, त्याचा प्रयत्न आजही ते आपल्या कार्यक्रमातून समाजाला सांगतात.स्वतःला किती त्रास झाला तरीही आपल्या चेहऱ्यावर ते जाणून न देता आनंदाने सामाजिक कार्यात समाजाबरोबर सहभागी होतात .ज्या समाजात आपण लहान चे मोठे झालो .ज्या समाजाने आपल्याला काहीतरी दिलंय त्या समाजाचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत आणि त्या उपकाराची जाणीव म्हणून मी माझे आयुष्य सामाजिक कामासाठीच खर्च करणार, अशी शपथच त्यांनी घेतली. आज राज्यभर साहेबांचा मोठा बोलबाला आहे .कामाच्या रूपाने साहेबांचा स्वभाव स्पष्ट ,बोलका आणि निर्भीड आहे .त्यामुळे जीवनात खोटं ,लबाड ,ढोंगीपणा याला कधीच त्यांनी साथ दिली नाही. आज ते एक प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून समाजामध्ये प्रसिद्ध आहेत .समाजासाठी झगडणारा ,समाजासाठी लढणारा, समाजासाठी वेळ देणारा आणि समाजासाठी सर्व काही निस्वार्थी भावनेने कार्य करणारा एकमेव नेता म्हणजेच शिवाजीराव साळवे साहेब होय,
आज त्यांच्या या वाढदिवसादिनी त्यांना वाढदिवसाच्या सर्व समाज बांधवांच्या वतीने खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

🌹🥀🌺🌷🌸🙏♥️ 🇮🇳...

शब्दांकन: - श्री.दिलीप कारभारी शेंडे
जिल्हा संघटक : चर्मकार संघर्ष समिती,अहमदनगर जिल्हा *

*समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर*

No comments:

Post a Comment