💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल ग्रामपंचायत स्तरिय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार २०२३ सौ. वाकडे, सौ.तागड व सौ.न्हावले यांना देण्यात आला.
भोकर येथील राजमाता मित्र मंडळ व भोकर मित्र मंडळाने जि.प. शाळेच्या प्रांगणात राजमाता पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त ह.भ.प. बाल किर्तनकार अनिष्ठाताई गुंड यांचे किर्तनाचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रथम मान्यनराच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करणेत आले. सदर कार्यक्रमा प्रसंगी अशोक कारखान्याचे व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, सोसायटीचे अध्यक्ष किशोर छल्लारे, उपाध्यक्ष पंढरीनाथ मते, ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक महेश पटारे, कामगार तलाठी अशोक चितळकर, ग्रामविकास अधिकारी प्रदिप ढुमणे, सोसायटीचे माजी चेअरमन सागर शिंदे, धनगर समाज संघर्ष समितीचे राजु तागड, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष भाऊराव सुडके, अशोक कामगार पतपेढीचे संचालक अण्णासाहेब वाकडे, संजीवनी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत झुरंगे, प्रहारचे नानासाहेब तागड, पोलिस पाटील बाबासाहेब साळवे, पत्रकार हरीभाऊ बिडवे, राजेंद्र चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कारार्थीं यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती ग्रामपंचायत हद्दीतील गरजवंत महिलांना देवून त्याबाबत जागृती घडवून शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. परिसरातील महिलांना शिवणकाम, भरत काम याबाबत मार्गदर्शन करुन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करुन महिलांचा सक्षमीकरण केले आहे. परिसरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने भोकर येथील आशांकूर केंद्रांतर्गत महिला बचत गटाची स्थापणा करुन स्वतः अध्यक्ष म्हणून महिलांना बचतीची सवय निर्माण केलेली आहे. या माध्यमातून अनेक महिलांना कर्ज वाटप करुन त्यांची आर्थिक गरज भागवून त्यांना त्यांच्या जिवनात आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले आहे. स्वामी समर्थ केंद्र, भोकर अंतर्गत बाल संस्कार केंद्र चालवून बालकांना ज्ञानार्जन केले. पुरस्कारार्थीचे अशोक कारखान्याचे चेअरमन भानुदास मुरकुटे, व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, माजी व्हा.चेअरमन माणिकराव शिंदे, उपसरपंच महेश पटारे आदींनी अभिनंदन केले.
यावेळी येथील सुरेश बहीरु वाकडे, सुरेश कारभारी वाकडे, जालिंदर पंडीत, रावसाहेब खंडागळे, सुधाकर खंडागळे यांनी शाबुदाना खिचडीच्या स्वरुपात अन्नदान केले. यावेळी ठकसेन खंडागळे, मच्छिंद्र खंडागळे, मच्छिंद्र काळे, सुकदेव वाकडे, ज्ञानेश्वर काळे, सुदाम मते, सोमनाथ पंडीत, राजेंद्र वाकडे, सुनिल वाकडे, राजेंद्र राहिंज, राहुल अभंग, अशोक काळे, रमेश भालके, सतिश वाकडे, योगेश वाकडे, शिवा खंडागळे, रावसाहेब लोखंडे, सखाराम आबुज, भाऊसाहेब खंडागळे आदींसह राजमाता मित्र मंडळ व भोकर मित्र मंडळाचे सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))
No comments:
Post a Comment