राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, June 9, 2023

श्रीरामपूर शहरातील धक्कादायक घटना सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने विष घेतले ?

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -

श्रीरामपूर शहरातील एका तरुणाने सावकाराच्या जाचाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या तरुणाने विष घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यामुळे श्रीरामपुरात सावकारी करणारांचे धाबे दणाणले आहेत.या तरुणाने घेतलेल्या रकमेच्या दुप्पटहून अधिक रक्कम व्याजाच्या नावाखाली या सावकाराने वसूल
केलेली असताना तेजसला नाहक त्रास दिला जात होता. या सावकाराच्या जाचाला कंटाळून त्याने विष प्राशन करूनस्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र ही बाब कुटुंबियांच्या वेळीच लक्षात आल्याने त्यास बुधवारी सायंकाळी येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.त्याला रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्यांच्या खिशात एक चिठ्ठी मिळून आली. यात त्रास देणारा सावकाराचे नाव व त्याच्या साथीदारांचा उल्लेख करण्यात आला असून सविस्तर कथन असलेली सदरची चिठ्ठी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या नावे लिहिली आहे. त्यात मला न्याय मिळावा अशी विनंती करण्यात आली आहे.
सदरचा सावकार मागील एका सावकारकीच्या (व्यापारी आत्महत्या प्रयत्न) प्रकरणात अडकलेला असून त्या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू आहे.
या तरूणावर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. तो शुद्धीवर आल्यानंतर याप्रकरणी जबाब नोंदवून त्यात सावकारीचा संदर्भ आला तर सदरच्या सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.दरम्यान हा गुन्हा दाखल होवून नये म्हणून या तरुणावर दबावआणला जाण्याची शक्यता असल्याने वरिष्ठ पोलिस
अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून त्याचा जबाब होईपर्यंत त्याला
पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी होत आहे.


----------------------------------------------------
===================================
सह.संपादक.रंजित बतरा.शब्द✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता
----------------------------------------------------===================================

No comments:

Post a Comment