राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, June 10, 2023

श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामी स्थळांना श्रीरामपूर तहसीलदार वाकचौरे यांची भेट ?

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -

श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज पालखी तालुक्यातील बेलापुर गावी मुक्कामी येत असुन वारकऱ्यांची गैरसोय होवु नये या करीता माननीय जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या सुचनेनुसार श्रीरामपूर विभागाचे प्रांताधिकारी किरण सावंत - पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांनी पालखी तसेच वारकरी मुक्कामी रहात असलेल्या ठिकाणाला भेटी देवुन तसेच पदाधिकारी, अधिकारी,वैद्यकीय अधिकारी, पोलीस, ग्रामस्थ यांची बेलापूरात संयुक्तीक बैठक घेवुन योग्य त्या सुचना दिल्या.
बेलापूरात पालखी मुक्कामी असणाऱ्या विठ्ठल मंदीरास त्यांनी भेट दिली या वेळी मंदीरांचे प्रमुख ह.भ.प. सोपान महाराज हिरवे यांनी सर्वांचे स्वागत करुन पालखीचा महीमा परंपरा, मंदिराची स्थापना असा सर्व इतिहास अधिकारी पदाधिकारी यांना सांगीतला, पूर्वीच्याकाळी या पालखी सोहळ्याचा मार्ग एका घोड्याने दाखवीला असुन अजुनही त्याच मार्गाने हा पालखी सोहळा मार्गस्थ होत असल्याचे हिरवे यांनी सांगून त्या घोड्याची मंदिराशेजारीच समाधी असल्याचेही सांगीतले. 
यावेळी गावातील पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पोलीस यांना महसुल विभागाच्या वतीने योग्य त्या सुचना देण्यात आल्या असुन आरोग्य, पिण्याचे पाणी स्वच्छतागृह याबाबत वारकऱ्यांना कसलीही उणीव भासु नये याची खबरदारी घेण्याच्या सुचना तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांनी दिल्या. यावेळी माजी जि. प. सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, बाजार समितीचे उपसभापती व बेलापुरचे उपसरपंच अभिषेक खंडागळे, मंडलाधिकारी भिमराज मंडलीक, कामगार तलाठी प्रविण सुर्यवंशी, विकास शिंदे, बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी डॉक्टर देविदास चोखर,बेलापुर खूर्दचे ग्रामविकास अधिकारी तुकाराम जाधव, एकनाथ नागले, दादा कुताळ, पत्रकार देविदास देसाई, बाजार समितीचे सचिव साहेबराव वाबळे, बेलापुर पोलीस स्टेशनचे हरिष पानसंबळ, बाजार समितीचे सर्व व्यापारी उपस्थित होते.

(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))

No comments:

Post a Comment