राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, July 31, 2023

गुन्हे शाखा युनिट १ ची कामगिरी बंदुकीचा धाक दाखवून व्यावसायिकाला लुटणाऱ्याला अटक

नाशिकरोड - प्रतिनिधि - वार्ता

 महात्मा गांधी रोडवर 01असलेल्या दुर्गा उद्यान समोरील चोरडिया सदन येथे एका दुकानात शिवाजी बापूराव पवार यांचा ऑनलाईन पैसे पाठविण्याचा व्यवसाय असून ते दुकान बंद करून घरी जात असताना अचानक एक अनोळखी इसम दुकानात शिरला व दवाखान्यात अर्जंट पैसे पाठवायचे आहे असे सांगितले.

यावेळी पवार यांनी रोख पैसे नसल्याने ऑनलाईन पैसे पाठविण्याचे बंद केले आहे असे सांगितले. तेव्हा संबंधित अनोळखी इसम म्हणाला की, माझ्याकडे रोख पैसे आहे तुम्ही कारमध्ये बसा व तुम्ही तुमच्या गाडीचा दरवाजा उघडा व आतमध्ये बसा मी तुम्हाला रोख पैसे मोजून देतो असे सांगून दोघे कारमध्ये बसल्यानंतर संबंधित अनोळखी इसमाने अचानक खिशातून पिस्तुल काढली व मी सांगेल त्याप्रमाणे गाडी चालवा नाहीतर तुम्हाला ठार मारेल अशी धमकी दिली.
त्यानंतर सदर गाडी हॉटेल दारणाकडे नेली व पवार यांच्या खिशातील रोख पैसे व गळ्यातील सोन्याची चैन, एटीएम कार्ड, मोबाईल फोन असा सुमारे ९७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेनंतर पवार यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ कडे तपास गेल्यानंतर संबंधित पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित आरोपीला अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर व त्यांचे सहकारी संदीप भांड, महेश साळुंखे, राजेश राठोड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट आदींनी आरोपीबाबत शोध मोहीम करुन माहिती घेतली. यानंतर ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे जाऊन संशयित आरोपीचा शोध घेत सदर संशयित आरोपीस खरीवली निमनपाडा तालुका शहापूर येथे जाऊन ताब्यात घेतले.

त्यानंतर सदर गाडी हॉटेल दारणाकडे नेली व पवार यांच्या खिशातील रोख पैसे व गळ्यातील सोन्याची चैन, एटीएम कार्ड, मोबाईल फोन असा सुमारे ९७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेनंतर पवार यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ कडे तपास गेल्यानंतर संबंधित पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित आरोपीला अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर व त्यांचे सहकारी संदीप भांड, महेश साळुंखे, राजेश राठोड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट आदींनी आरोपीबाबत गुप्त माहिती घेतली. यानंतर ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे जाऊन संशयित आरोपीचा शोध घेत सदर संशयित आरोपीस खरीवली निमनपाडा तालुका शहापूर येथे जाऊन ताब्यात घेतले.

तसेच यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याचे नाव किरण परशुराम गोरे (वय २४) राहणार बामणे तालुका शहापूर असे असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यासाठी वापरलेली पिस्तुल तसेच दोन डेबिट कार्ड, दोन मोबाईल व इतर ऐवज जप्त करण्यात आला आहे.

===================================
--------------------------------------------------
: - उप - संपादक - एस व्ही वाघ - शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
---------------------------------------------------
===================================









































Sunday, July 30, 2023

अनेक गुन्हे होणार उघड मोटारसायकल चोरनारा श्रीरामपुर येथून जेरबंदसुपा पोलीसांची कामगिरी,

श्रीरामपूर - प्रतिनिधि-वार्ता-

श्रीरामपुर येथुन पकडून आणले सुपा पोलिसांना चोरीच्या अनेक गुन्हात हवा आसलेल्या आरोपीला  असुन त्याचाकडून चोरीच्या दोन मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.
संदीप जगन साठे (रा. वार्ड क्रमांक1, गोंदनी रोड,श्रीरामपुर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.साठे हा सुपा पोलिसांना चोरीच्या अनेक गुन्ह्यात हवा होता. संदीप साठेवर वहान चोरीचे अनेक गुन्हे आहे. खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून सुपा पोलिसांनी त्यास श्रीरामपुर येथील रहात्या घरी अचानक छापा टाकत त्याच्या मुस्क्या आवळल्या.
संदीप साठे यास पडकले तेव्हा त्याच्या कडून दोन मोटारसायकली ताब्यात घेतल्या आहेत. यापैकी एक मोटारसायकल आश्वी पोलिस स्टेशन हद्दीतुन व एक घुलेवाडी रोड संगमनेर येथुन चोरी केल्या

आसल्याचे सांगितले. संदीप साठे याच्यावर सुपा पोलिस स्टेशन हद्दीत दुचाकी व चार चाकी वहाने चोरीचा आरोप आहेत. तसेच त्यावर अनेक पोलिस स्टेशनल विविध गुन्हे दाखल आहे. सुपा पोलिसांनी संदीप साठेला ताब्यात घेतल्याने अनेक गुन्हाची उकल होणार असल्याची शक्यता सुपा पोलिसांनी व्यक्त केली आहे. सुपा पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक कानगुडे तपास करत आहेत.

=================================
------------------------------------------------
: - उप,संपादक - ऐन - टी - श्रीवास्तव. शब्द... ✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
------------------------------------------------
=================================






Saturday, July 29, 2023

इंडिया पोष्ट पेमेंट बँक श्रीरामपूर ब्रँच मॅनेजरने साफसफाई कामगाराला कामावून काढल्याने : कामगार महिलेचा उपोषण


 श्रीरामपूर-प्रतिनिधि-वार्ता-

इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक, शाखा- श्रीरामपूर, ता. श्रीरामपूर, जि. अ.नगर - सिंद संजय वैरागळे ही महिला येथे गेल्या अनेक वर्षापासून सफाई कामगार तसेच झाडू व साफ-सफाई कामगार म्हणून वरील कार्यालयास त्यांच्याकडे काम करीत आहे.सदरील महिले कडून तुटपुंज्या पगारावर कामे करून राबूवुन घेत आहे. सदर महिला सिंद बाईने त्यांच्याकडे यापूर्वी अनेक वेळेस तोंडी बोलून विनंती व अर्ज केलेले आहेत.त्या अनुसार आड अडचणी पाहता त्या समस्या चे अनुरूप पुर्ण पणे मांडल्या असून मागणितील बाबी लक्ष केंद्रीत करुन मे.साहेबांनी समजून घ्यावेत ते असे की 

महागाई खूप वाढलेली असून  पगार वाढ करण्यात यावी अशी  सदर 'अर्जामध्ये लेखी स्वरूपात मागणी करुन उल्लेख केले आहे. सदर महिलेचे पती हे मयत झालेले असून  विधवा आहे. त्यामुळे  बँकेकडे काम करुन उदारनिर्वाह करण्यासाठी दुसरा पर्यायनसल्याने.त्यांच्याकडे पगार वाढ करण्याची मागणी लेखी अर्ज दिले असता बँकेच्या मॅनेजर समोर बँकेतील कर्मचारी हे माझ्या अंगावर धावून आले.त्यांनी महिलेशी शाब्दिक चकमक केली.व उद्धट भाषा वापरून अपमानित केले त्या अनुषंगाने महिलेने तात्काळ कायदेशिर फिर्याद श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेली आहे तसेज विधवा स्वरूपातील महिलना सर्वप्रथम अगोदर तातडीने त्यांचे अडी आढचनी शासनाचे सुद्धा विचारात घेऊन आदेश परित केल्याले आहेतच त्या संदर्भात ध्रेया अमल बजावणी होते परंतु सम्मधित अधिकाऱ्यांना बहुतेक या गोष्टीचा विसर भुल झाले असावे किंवा भान नसावे 
पोष्ट ब्रँच म्यानेजर ने राग मनात धरून  ब्रँच मॅनेजर यांनी तु कामावर येऊ नकोस असे म्हणून कामावरन घेण्याचे बंद केले आहे, सिंध बाई सदर महिले ने पुन्हा कामावर घेण्यात यावे म्हणून  दि २५/०७/२०२३ पासून सिठी पोष्ट कार्यालय दालना समोर उपोषण सुरु केले होते तिन दिवस लाग्होपाट उलटून गेल्याने . 28/07/2023 दिनांक रोजी पोष्ट बँक ब्रँच म्यानेजर यांनी दखल घेऊन सर्व अटी शर्ती मंजूर करण्याचे आश्वासन देऊन मान्य केल्यानंतर उपोषण सोडविण्यासाठी सिंध संजय वैराळे यांना अग्रेसीत विनंती केली व उपोषण सोडविले चे भाग पाडले उपोषनाचे शेवटी  - उपस्तित पत्रकार नागेश भाई सावंत राजु मिर्जा अप्पाजी जाधव निखिल शिंदे. इतर सामाजिक कार्य करते.समक्ष निदर्शनिय आल्याचे हे प्रकरण दिसलें आहे.

===================================
---------------------------------------------------
: - उप,संपादक-प्रवीण-पाटील.शब्द ✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
--------------------------------------------------
===================================












*!!! सत्य- मुल्यं- रक्षणासाठी ६ महीन्याच्या बाळासह ७२ वीर करबाल्यात हौतात्मा ( शहीद ) झालेत.....!!!.*



  " करबला युद्ध " जगातं -गावां- गावांत शहरातं युद्धाच्या आठवणी आपो-/आपच मोहररम च्या दहा तारखेला " यौम- ए - आशुरा " दिवशी कठोरमनाच्या माणसाला जाग्या होतात.
          प्रेषित मुहम्मद स्व. सल्लमांनी अल्लाहच्या सत्यधर्म- ईस्लामचा प्रसार करण्यासाठी अत्यंत हाल- अपेष्टा - छळछावणीत- उपाशीपोटी- कष्ट व सहनशीलतेचे अंत बघून अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आशिया- युरोप-अफ्रीका खंडातील बहुतेक देशात सुव्यवस्थित पणे परिवर्तन घडवून आणले, जगातील प्रत्येक मानवाच्या कल्याणासाठी,जीव -जंतू च्याही रक्षणासाठी जगात ठिकठिकाणच्या राजेशाही, हुकूमशही, बादशही,परीवार वाद, जुलमी राजव्यवस्था संपूर्ण लोकशाही पद्धतीने, आपल्या स्वतःच्या व आपल्या परिवाराच्या- आपल्याला मानणाऱ्या असंख्य अनुयायांच्या आचरणाने संपुष्टात आणुन. " लोकशाही " व्यवस्था कशाला म्हणतात हे समस्त जगाला दाखवून देउंन , अल्लाहच्या पवित्र कुरआन मधील प्रत्येक शब्द न शब्दांच्या शिकवणी व हादीस च्या शिकवणी नुसार ". स्वतः ". पवित्र मदीना शहरात याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जगप्रसिध्द मदीना शहरात करून समस्त जगाला दाखवून दिली. आपल्या अनुयायांना- मित्रगण - सहाबा यांना आपल्या हयातीतच माझ्या महानिर्वाणा नंतर समस्त जगात शासन ( राजकीय सत्ता -हुकूमत)व्यवस्था कशा पद्धतीने करावयास हवेत याचे प्रत्यक्षात शिक्षण दिले . 
 त्यासाठी आपल्या खास विश्वासू मित्र( सहाबा) यांना "खलिफा " अल्लाहच्या नायब ( डेप्युटी) म्हणतात, त्यांना" खलिफा ' म्हणून उल्लेख केला जातो, अशी व्यक्ती ईस्लामी व्यवस्थेची प्रशासकीय प्रमुख असते .त्याला पवित्र कुराण,हादीस व " मजलिस - ए - शुरा" च्या अनुसरून निर्णय घेण्याचा अधिकार असतो. ("मजलिस - ए - शुरा" अर्थात" तज्ञ,जाणकार सल्लागार मंडळ) आशा सल्लागार समिती (" शुराई - निजाम") च्या माध्यमातून लोकप्रशासन करणे यालाच " निजाम - ए -खिलाफत " म्हटले जाते . उदाहरण म्हणून द्यायचे झाल्यास प्रेषित मुहम्मद पैगंबर स्वतः प्रमुख असून सुध्दा आपले कोणतेही निर्णय आपल्या साथीदार मित्रांशी सल्ला मसलत करुनच घेत होते, विशेष गोष्ट त्या मध्ये किती ही गरिब मित्राला ही सल्ला देण्याचा आधिकार होता , प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार होता . यालाच लोकशाही पद्धती म्हटले जाते असो.
प्रेषित मुहम्मद सल्लमांनी आपल्या हयातीतच पुढील पिढीला नेतृत्व म्हणून पुण्यवान ( राशिदीन) व अनुभवी 
(१) ह. अबु-बकर सिद्दीक रजि. (२) ह.उमर फारुख रजि. (३) ह. उस्मान गनी रजि. (४) ह. आली बिन आबु तालीब रजि.
 या वेगवेगळ्या घराण्यातील कर्तव्यदक्ष साथीदारांची क्रमाक्रमाने पुढील चार खलीफांची निवड करून त्याच्यावर सर्व जगभरातील लोकांना" एकनिष्ठता" ची शपथ ( बैत) दिली गेली. प्रेषित मुहम्मद सल्लमांच्यां महापरिनिर्वाणानंतर चारही खलिफांनी खूप चांगल्याप्रकारे ईस्लामी राज व्यवस्था मध्य आशिया, युरोप, अफ्रीका खंडातील खूप देशात आपल्या प्रतिनिधी मार्फत चालवली..चार खलिफांच्या राजकीय सामाजिक आर्थिक व्यवस्थापनास " खुलफा - ए - राशिदीन " चे युग " म्हणतात, अर्थात या पुण्यंवान लोकांनी अल्लाह च्या पवित्र कुराण-हादिस च्या शिकवणुकीनुसार राज्य व्यवस्था चालवली. जगात आज ही जगात आजरामर केलीत . महात्मा गांधी यांच्या बहुतांश ठिकाणच्या भाषणात व पुस्तकांत यांच्या शाषण पध्दतींचा उल्लेख केला जात असे व आहे.
महात्मा गांधी जी व विविध महामानवांच्या भाषणात व पुस्तकांत वेळोवेळी त्यांच्या कार्याची दखल घेऊन आपल्या देशात तशी राजकीय व्यवस्था करण्याची गरज ही व्यक्त केली आहे ,असो.
चौथ्ये खलिफा हज. अली ( रजि.) यांच्या महानिर्वाणानंतर त्यावेळच्या 'सल्लागार(मजलिस ए शुरा) मंडळांने काही काळ ह. अलि. रजिंचे जेष्ठ पुत्र ह. हसन रजि. यांना खलिफा म्हणून घोषित करण्यात आले. मात्र त्याकाळातील राजकीय सामाजिक परिस्थिती नुसार तीव्र स्वरूपाच्या विरोध- मतभेदांमुळे व निष्पाप निरागस नागरिकांचे जीव धोक्यात घालून, निष्पाप नागरिकांना त्रास व रक्त सांडले जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने ह. हसन बिन अली रजि. यांनी स्वतः हुन पदत्याग केला.
  या प्रसंगानंतर प्रेषित मुहम्मद सल्लमांच्या शिकवलेल्या तत्त्वाला हारताळ फासून त्या काळातील मजलिस ए शुराला ( कायदे मंडळा) डावलून मनमानी करून प्रेषित मुहम्मद सल्लमांचेच एक सहकारी आमीर मुआविया रजि. यांनी स्वत:ला स्वयंघोषित खलिफा म्हणून घोषित केले , त्यांनी ईस्लामच्या तत्त्वप्रणालीला तिलांजली देऊन हुकूमशाही- राजेशाही पध्दतीनुसार राहणे, वागणूक व मोठ्या भव्य राजप्रासाद ची बांधणी करून राज्य कारभार करण्यात आला.
 हे सर्व इस्लामी संस्कृती व परंपरे च्या राज्य व्यवस्थेच्या बिलकुल विरोधात चालले होते ,हे कदापिही मान्य नव्हते. त्यानंतर ह. आमीर मुआविया येथे न थांबता त्यांनी आपल्या हयातीत स्वतः च्या आपात्र मुलगा यजिद यांस आपला उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती करून , वीस वर्षे राजेशाही सारखा राज्य कारभार करुन राजधानी मदीना वरुन कुफा ( इराक) वरुन सिरिया येथे हलविण्यात आल्यानंर आपल्या मृत्यू पश्चयात आपल्या आपात्र मुलगा यजिद यांस राजा करण्यात आले. यजिदच्या राजेपदास व क्रुर शासन पध्दतीस लोक जागोजागी तीव्र विरोध होत होता.
नागरिकांना प्रेषित मुहम्मद सल्लमांचे नातू हजरत हुसैन रजि. यांनाच खलिफा म्हणून निवड व्हावी म्हणून संपूर्ण जनमत होते व नागरिक वारंवार पत्र व्यवहार करुन मागणी याचना करून बारा हजारापेक्षा ही जास्त पत्रे लिहिली जाउन सर्वतोपरी मदत सहकार्य करण्याची ग्वाही देत होते . सर्वांच्याच मागणीची दखल घेऊन ह. इमाम हुसैन रजि. आपल्या खानदानातील मुलांबाळांसह, वडील बंधू ह. हसन यांच्या व लहान सर्व बंधू च्या सर्व परीवारासह मदीना वरुन कुफा येथे जाण्यासाठी निघाले. ही बातमी ऐकून राजा यजिद घाबरून आदेश दिला गेला सर्व कुफा वासीयांना जो ह. इमाम हुसैन ला साथ-थारा देईल त्या सर्वांना मृत्यू दंड देण्याची धमकी दिली. राजा यजिदने कुफाशहरातील मुख्य गव्हर्नर ईबने जियाद यांस आदेश देण्यात आले की कोणत्याही परिस्थितीत ह. इमाम हुसैन यांना यजिदला राजा करण्यास राजी करावेत. नाहीतर सरळसरळ कैद करून दरबारात हजर करण्यात यावे. 
प्रवासा दरम्यान" फुरात" नदीच्या काठावर करबला येथील मैदानावर गव्हर्नर ईबने यजिद ने चार हजार सैनिकांसह ह. इमाम हुसैन यांचा घेराव करून यजिदला राजा बादशहा करण्याच्या सर्व अटी- शर्ती मान्य करण्यास हुकूम दिला. परंतु जालीम, अत्याचारी, कपटी यजिदला संमर्थन देण्यास ह.इमाम हुसैन यांनी स्पष्ट नकार दिला.. 
                         या नकारानंतर क्रुर बादशहा यजिद च्या कमांडर व गव्हर्नर ईबने जियाद ने युद्धाचे स्पष्ट अव्हान केले . ह. ईमान हुसैनांनी रक्त, जीवितहानी टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलेत. तीन प्रस्ताव मांडले परंतु क्रुर गव्हर्नर जियाद याने मागेपुढे न पाहता सरळसरळ ह. हुसैन यांच्या वर क्रुर पणे अत्याचार करण्यास सुरुवात करून कुरातनदीच्या तीरावर असुन हुसैन च्या परीवारांस पाणी बंदी केली गेली, तीन दिवस म्हणजे ७२ तास रखरखत्या अरबस्थातील उन्हाळ्यात बिना पाण्याची कुंटूंबावर वेळ आली, हालहाल करून , सहा महिन्याच्या बाळ अली असगर हे पाण्यावीना व्याकुळ होऊन पाणी न देता यांच्या वर त्रिकोणी बाण मारुन हत्या केली, सात वर्षांच्या कासिम या ह. हसन यांच्या मुलाला घोडयाच्या टाचेखाली चिरडून ठार मारले. बहात्तर ७२ लहान मोठ्यांना गळे चिरुन ठार करण्यात आले. युध्दात सर्व पुरुष शहीद( हौतात्म्य )झाले. हा दिवस १० मुहररम हिजरी ६१ ( 10 अॉक्टोबर 680) या दिवशी ७२ हुतात्म्यांनी फक्त अल्लाहच्या व प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांच्या लोक कल्याणकारी राज्य व्यवस्थेसाठी सहा महिन्यांच्या बाळासह ७२ शहीद( हौतात्म्य ) झालेत.....
   करबला च्या या युद्धातुन जगाला संदेश मिळाला की कोणत्याही अत्याचारी व्यवस्थेपुढे गुडघे टाकायचे नसतात तर बलिदान देण्यास तयार राहिले पाहिजे... 
      क्रुर,जुलमी,अत्याचारी ,दमनकारी सत्ता विरूद्ध गुडघे टेकले असते तर स्वतः व संपूर्ण परिवार वाचला असता परंतु प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या शिकवणी नुसार अल्लाह च्या सत्य- मुल्यं- रक्षणासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबांचे बलीदान दिले.. 
म्हणुनच शायर म्हणतो की.. " करबला के बाद ईस्लाम जिंदा होता है.... "
===================================
---------------------------------------------------
लेखक: डॉ.सलीम सिकंदर शेख.✍️✅️🇮🇳...
बैतुशशिफा हॉस्पिटल 
श्रीरामपूर - 9271640014

---------------------------------------------------
===================================
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -9561174111
---------------------------------------------------
===================================






Thursday, July 27, 2023

त्या आश्वासनाचं काय झाल टोलंटोलमुक्त महाराष्ट्र करण्याचं राज ठाकरे यांचा भाजपला प्रश्न

मराठी केंद्रीय मंत्री असतानाही आपलं दुर्दैव

राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील रस्त्यांच्या स्थितीवरुन नाराजी जाहीर केली आहे. राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना लक्ष्य करत केंद्रात मराठी मंत्री असतानाही, महाराष्ट्राचं दुर्देव आहे अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. १७ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचं काम सुरु आहे. केंद्रीय मंत्री मराठी आणि महाराष्ट्रातील असूनही राज्यातील रस्ते खराब आहेत हे दुर्दैव आहे. नितीन गडकरी नेहमी मोठमोठे आकडे सांगत असतात. मग इतक्या अभ्यासू नेत्याचं हे अपयश आहे का? असं विचारण्यात आलं असता राज ठाकरे म्हणाले की, हे त्यांचं महाराष्ट्रातील अपयश आहे. मुंबई गोवा रस्त्याला १७ वर्षं लागतात, हे मोठं अपयश आहे. अमेरिकेतील एम्पायर स्टेट बिल्डिंग १४ महिन्यात बांधली गेली होती. रामायणात तर वनवासाच्या १२ वर्षांच्या संपूर्ण कालावधीत सेतू बांधला होता. आपल्या वांद्रे वरळी सी लिंकला १० वर्षं लागली आहेत. बहुधा तेच पुढारलेले होते. इरसालवाडीसारख्या दुर्घटना थांबवल्या जाऊ शकतात. व्यवस्था असतानाही असे अपघात घडत असतील तर काय बोलायचं? अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली. आमचा एकच पक्ष विरोधी पक्ष दिसत आहे असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.. तसंच समृद्धी महामार्गावर तुम्ही रस्ता बनवताना दोन्ही बाजूंनी फेन्सिंग टाकलेलं नाही. समृद्धी महामार्गावर आतापर्यंत अपघातात 400 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. याची जबाबदारी भाजपा किंवा महाराष्ट्र सरकार घेणार का? फेन्सिंग न लावता तुम्ही सगळा महामार्ग लोकांसाठी सुरु केलात. तिथे कुत्रे, हरिणी, गाई रस्त्यावर येत आहेत. स्पीडमध्ये जाणार आणि अपघातत मरणार ही काही सरकारची जबाबदारी नाही का? पूर्वकाळजी घेण्याआधी टोल बसवत आहात. म्हणजे लोकांच्या जगण्या, मरण्याची काही काळजी नाही. असं ते म्हणाले. दरम्यान अमित ठाकरे आता राजकारणात येत आहेत म्हणून त्यांना लक्ष्य केलं जात आहे असं सूचक विधान राज ठाकरेंनी केलं.

मराठी केंद्रीय मंत्री असतानाही आपलं दुर्दैव

राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील रस्त्यांच्या स्थितीवरुन नाराजी जाहीर केली आहे. राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना लक्ष्य करत केंद्रात मराठी मंत्री असतानाही, महाराष्ट्राचं दुर्देव आहे अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. १७ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचं काम सुरु आहे. केंद्रीय मंत्री मराठी आणि महाराष्ट्रातील असूनही राज्यातील रस्ते खराब आहेत हे दुर्दैव आहे. नितीन गडकरी नेहमी मोठमोठे आकडे सांगत असतात. मग इतक्या अभ्यासू नेत्याचं हे अपयश आहे का? असं विचारण्यात आलं असता राज ठाकरे म्हणाले की, हे त्यांचं महाराष्ट्रातील अपयश आहे. मुंबई गोवा रस्त्याला १७ वर्षं लागतात, हे मोठं अपयश आहे. अमेरिकेतील एम्पायर स्टेट बिल्डिंग १४ महिन्यात बांधली गेली होती. रामायणात तर वनवासाच्या १२ वर्षांच्या संपूर्ण कालावधीत सेतू बांधला होता. आपल्या वांद्रे वरळी सी लिंकला १० वर्षं लागली आहेत. बहुधा तेच पुढारलेले होते. इरसालवाडीसारख्या दुर्घटना थांबवल्या जाऊ शकतात. व्यवस्था असतानाही असे अपघात घडत असतील तर काय बोलायचं? अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली. आमचा एकच पक्ष विरोधी पक्ष दिसत आहे असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.

===================================
---------------------------------------------------
: - उप,संपादक-अवकाश-म्हेत्रे. मुंबई...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
---------------------------------------------------
===================================




प्रतिबंधित अन्नपदार्थ साठा नाशिकात एक लाख 52 हजारांचा माल जप्त

नाशिक-प्रतिनिधि-वार्ता 

 प्रतिबंधित अन्न पदार्थ अन्न व औषध प्रशासनाने           विक्री बाबत कठोर धोरण स्वीकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आडगाव परिसरातील मे. महालक्ष्मी ट्रेडर्स येथे छापा टाकला असता मे. महालक्ष्मी ट्रेडर्स येथे एक लाख 52 हजार 744 रुपयांचा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा हस्तगत झाला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) उ. सि. लोहकरे यांनी दिली...
आडगांव परिसरातील मे. महालक्ष्मी ट्रेडर्स, देवी खंडेराव मंदिरासमोर, आडगांव, पंचवटी, नाशिक चे मालक प्रशांत कचरू सावळकर यांच्या पेढीवर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकुन पेढीची झडती घेतली असता दोन हजार 675 किंमतीचा, पेढीच्या गाडी क्रमांक MH-15-HG-1699 मध्ये 45 हजार 789 किंमतीचा तर प्रशांत सावळकर यांच्या राहत्या घरी एक लाख चार हजार 280 किंमतीचा असा एकूण एक लाख 52 हजार 744 रूपयांचा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
यामध्ये गुटखा, सुगंधीत तंबाखु, पानमसाला व तत्सम पदार्थांची साठवणूक केल्याने आडगाव पोलिस स्टेशन येथे फिर्याद नोंदविण्यात आली आहे.तसेच वाहनात प्रतिबंधित अन्न पदार्थ सापडले असल्याने वाहन जप्ति करून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून दुकान देखील सील करण्यात आले आहे.
नाशिक विभागाचे सह आयुक्त (अन्न) सं.भा.नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) मनिष सानप, अन्न सुरक्षा अधिकारी सर्वश्री गो. वि. कासार, अमित रासकर, प्रमोद पाटील, अविनाश दाभाडे व श्रीमती सु. दे. महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे,असे ही सहाय्यक आयुक्त उ.सि. लोहकरे यांनी सांगितले आहे.
नागरिकांना प्रतिबंधित अन्न पदार्थ साठा, वाहतुक व विक्री केल्याचे आढळून आल्यास 01800222365 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन ही सहाय्यक आयुक्त लोहकरे यांनी केले आहे.


=================================
------------------------------------------------
: - उप,संपादक -प्रमोद कुमार निकम-शब्द...✍️✅️🇮🇳... रचना संकलन वार्ता...
------------------------------------------------
=================================














इतर बँकेतील थकबाकी नगर अर्बनच्या माथी सेटींग करणाऱ्या कर्जदारांना लाखो नव्हे कोटींची लॉटरी...


                        श्रीरामपूर-विषेश-उत्त-सेवा
कर्ज घेताना स्टील कारखान्याची मशीनरी घ्यायची म्हणून कर्ज.. 
या कर्जदाराला वेगवेगळे 3 नावाने प्रत्येकी 9 कोटी म्हणजे एकूण 27 कोटी दिले 
हा कर्जदार कॉसमॉस बँकेचा अनेक वर्षापासून थकलेला कर्जदार. 
नगर अर्बन बँकेत *सेटींग* जमविली 
नवीन मशिनरी घ्यायची म्हणून वेड्यात काढायचे नाटक केले ते पण संगनमताने
सेटींग मुळे कर्ज मंजूर होणारच होते, ( इतर बँकेत थकबाकीत असणारांना कर्ज द्यायचे नाही हे बँकींग कायदा सांगतो)
 व
 *सेटींग* झाले प्रमाणेमंजूर झाले  
मंजूर झाले नंतर कसली मशिनरी आणी कसले काय.. 
नगर अर्बन बँकेतून पैसे थेट कॉसमॉस बँकेत वर्ग झाले व तेथे कर्जदाराला एकरक्कमी परतफेडीचा लाखो रूपयांचा फायदा झाला ( आता हा नियोजन पुर्वक फायदा एकट्या कर्जदाराचा तर निश्चित नसेल झाला सर्वाना हिस्सा मिळालाच असणार) 
व नगर अर्बन बँकेला जाणीवपुर्वक गुंतविणेत आले.
 नगर अर्बन बँकेची किती मोठी आणि अशी फसवणुक संगनमताने करण्यात आली याचे गांभिर्य लक्षात घ्या. हे रिजर्व बँकेचे तपासणी अहवालात लिहलेले आहे. असे हे एक प्रकरण नाही अशी अनेक प्रकरणे आहेत. 

2014 पासून म्हणजेच बँकेला खोटा मल्टीस्टेट दर्जा घेतले पासून अशी प्रकरणे सातत्याने करण्यात आली आहेत व यामुळेच बँकेचा एनपीए 45 कोटी पासून 300 कोटी पर्यत गेला आहे. 

 रिजर्व बैंक ऑफ इंडिया च्या तपासणी अहवाला तून है सत्य बाहेर आले आहे. आपणास एकच उदाहरण दिले आहे अशी अनेक नियमबाह्य व संशयास्पद कर्ज खातेंचा उल्लेख या अहवालात आहे व या सर्वांची गोळा बेरीज पाहून डोळे पांढरे होतात. 
इतर बँकाची वसूली करून देण्याचा ठेकाच नगर अर्बन बँकेचे तत्कालीन चेअरमन व संचालक मंडळाने घेतलेला स्पष्ट दिसून येत आहे. *कुठला ही ठेका हा फुकट घेतला जात नाही*

===================================
---------------------------------------------------
: - ( वरिष्ठ )-पत्रकार-शफी-बागवान...
---------------------------------------------------
===================================

Wednesday, July 26, 2023

बांधकाम साहित्य साडेपाच लाखाचे चोरणारे टोळके गजाआड

कर्जत - प्रतिनिधि - वार्ता -
पुलाच्या बांधकामाचे साडेपाच लाख रुपये किमतीचेसाहित्य चोरी करणारे टोळके कर्जत पोलिसांनीगजाआड केले महामार्गावरील अहमदनगर सोलापूर 19 जुलै या दिवशी  कर्जत  तालुक्यातील माही जळगाव बायपास पुलाची व थेरगाव फाटा पूलाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावरून मध्यरात्री पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान 5 लाख 41 हजार रूपये किंमतीच्या 219 चौकोनी लोखंडी प्लेटा  चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मनीष भगवान पाटील यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल  करण्यात आला होता.
या घटनेनंतर तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार दिवटे यांनी अवघ्या काही तासातच या चोरीतील प्रमुख संशयित ऋषिकेश शिवाजी शिंदे यास ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्यासमवेत दोन अल्पवयीन इतर साथीदार असल्याचे त्याने सांगितले. या चोरीतील मुद्देमाल व टाटा एस टेम्पो क्रमांक (एमएच 12, जेएफ 6434) हा देखील हस्तगत केला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय कासार, पोलीस हवालदार सुनील माळशखरे, बबन दहिफळे, विकास चंदन, सुभाष पंडागळे व सुरेश खैरे यांनी केली. अवघ्या काही तासात आरोपींना  पकडल्याबद्दल पोलीस विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
===================================
---------------------------------------------------
: - उप,संपादक देविदास - साळुंके - शब्द... ✍️✅️🇮🇳... रचना संकलन वार्ता...
---------------------------------------------------
===================================


Tuesday, July 25, 2023

शस्त्रविरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई तीन गावठी पिस्तुलासह ५ काडतुसे जप्त आरोपी शिताफिने पकडून गजाआड

नाशिक-प्रतिनिधि-वार्ता 

आयुक्तालयातील नाशिक शहर पोलीस दरोडा व शस्त्रविरोधी पथकाने धडाकेबाज कामगिरी करून शहरातील विविध भागातून एकाच दिवशी ३ ठिकाणी सापळे रचून तीन संशयित आरोपींसह ३ देशी बनावटीचे पिस्तूल व ५ जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. ही कारवाई गंगापूर, सरकारवाडा, अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली आहे..."
"याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक शहर पोलिसांच्या दरोडा व शस्त्रविरोधी पथकाने माहितीच्या आधारे सोमवारी (दि.२४ जुलै) रोजी दिवसभरात वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळे रचून ३ गावठी पिस्तुल आणि ५ जिवंत काडतुसे जप्त केली. यात सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील शरणपुर रोड येथून प्रविण विजय त्रिभुवन (२६, रा. त्रिमुर्ती चौक, कांकरीया सुपरमार्केट शेजारी, नवीन नाशिक) याला ताब्यात घेवून त्याच्याकडून १ गावठी पिस्तुल व १ जिवंत काडतुस हस्तगत केले
"तर गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील विद्याविकास सर्कलजवळ, प्रसाद सर्कल नाना-नानी पार्क, गंगापूररोड, नाशिक येथून जयपाल संजय गायकवाड (२४, रा. केबीटी. सर्कल, मधुबंधन सोसायटी, गंगापूर रोड) याला ताब्यात घेवून त्याच्याकडून १ गावठी पिस्तुल व २ जिवंत काडतुसे हस्तगत केली. तसेच तिसरी कारवाई अंबड पोलीस ठाणे हद्दीतील औदुंबर कॉर्नर, शाहूनगर, दत्त मंदीराच्या भिंतीलगत, नवीन नाशिक अंबड येथून अक्षय आनंदा सैंदाणे (२६, रा. दत्त चौक, सरखती चौक, नवीन नाशिक) याला ताब्यात घेवून त्याच्याकडून १ गावठी पिस्तुल व २ जिवंत काडतुसे हस्तगत केली."
"दरम्यान, या तीनही आरोपींविरोधात गंगापूर, सरकारवाडा व अंबड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच सदर कारवाईत शस्त्रविरोधी पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक के.टी. रोंदळे व पोलीस अंमलदार पोलीस हवालदार वियजकुमार सुर्यवंशी, पोलीस नाईक मोहन देशमुख, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले, प्रविण चव्हाण, युवराज गायकवाड, सागर बोधले, तेजस मते, संदीप डावरे, भरत राऊत यांनी संयुक्तरित्या कामगिरी करत महत्त्वाची भूमिका बजावली."

===================================
---------------------------------------------------
: - उप,संपादक - एस व्ही वाघ - शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
---------------------------------------------------
===================================






तपोवन रस्त्यावर कारवाई || गावठी कट्ट्यासह हत्यारे जप्त दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी शितफिने गजाआड गुणे अन्वेषन

अहमदनगर- प्रतिनिधि - वार्ता -

  पाच जणांची टोळी दरोड्याच्या तयारीत असलेली  स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेने (LCB)जेरबंद केली. मंगळवारी (दि. 25) तपोवन रस्त्यावर भिस्तबाग महालाजवळ ही कारवाई केली. त्यांच्याकडून गावठी कट्टा तीन जिवंत काडतुस  कोयता, दोन चाकु, सात मोबाईल, लाकडी दांडके व एक कार असा एकुण चार लाख 94 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त  करण्यात आला आहे.
नयन राजेंद्र तांदळे (वय 29, रा. पवननगर, पाईपलाईन रस्ता), लियाकत जाफर शेख (वय 36, रा. जेऊर बायजाबाई, ता. नगर), अमोल लक्ष्मण रणसिंग (वय 35, रा. केडगाव), धुराजी नामदेव महानुर (वय 25, रा. आष्टी, जि. बीड) व बजरंग नारायण मिश्रा (वय 35, रा. भिस्तबाग चौक, सावेडी) अशी जेरबंद  केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने व पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, मनोहर गोसावी, रवींद्र पांडे, देवेंद्र शेलार, सुरेश माळी, विशाल दळवी, संतोष लोढे, सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, विजय धनेधर व अरूण मोरे यांचे पथक नगर शहरात पसार व पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना निरीक्षक आहेर यांनी पथकास कळविले की, राखाडी रंगाचे कारमधील काही इसम नगर शहर परिसरात कोठेतरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा  करण्याचे उद्देशाने घातक हत्यारे घेवुन कॉटेज कॉर्नर ते भिस्तबाग महाल रस्त्याने येत आहेत, अशी माहिती मिळाली असून खात्री करून कारवाई करा.

पथकाने तपोवन रस्त्यावर  भिस्तबाग महालाजवळ जावुन सापळा लावला. संशयित राखाडी रंगाची कार कॉटेज कॉर्नर कडून महालाकडे येताना दिसली. पथकाची खात्री होताच चालकास गाडी थांबवण्याचा इशारा करताच त्याने गाडी थांबविली. वाहनातील नयन राजेंद्र तांदळे, लियाकत जाफर शेख, अमोल लक्ष्मण रणसिंग, धुराजी नामदेव महानुर, बजरंग नारायण मिश्रा मिळून आले. त्यांच्याकडील कट्टा, जिवंत काडतुसे, कोयता, चाकू, मोबाईल व कार जप्त  करण्यात आली आहे. त्यांच्या विरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
===================================
या टोळीत तिघे सराईत गुन्हेगार
===================================
नयन तांदळे हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्या विरूध्द ठाणे व नगर जिल्ह्यात दरोडा तयारी, जबरी चोरी व चोरी असे गंभीर स्वरूपाचे एकुण 11 गुन्हे दाखल आहेत. तसेच अमोल लक्ष्मण रणसिंग याच्याविरूध्द खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा व इतर कलमान्वये गंभीर स्वरूपाचे एकुण पाच गुन्हे दाखल आहेत. बजरंग नारायण मिश्रा विरूध्द दोन गुन्हे दाखल आहेत.

===================================
---------------------------------------------------
: - उप,संपादक-अमोल दिक्षित-शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
---------------------------------------------------
===================================








Sunday, July 23, 2023

अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर नेमकं काय घडलं ?

नासिक - प्रतिनिधि - वार्ता -

सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा  येथे असलेल्या समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर मनसे नेते अमित ठाकरे यांच्या वाहनांचा ताफा टोल कर्मचाऱ्यांनी अडवून त्यांना अर्धा तास थांबविले होते. यावेळी अमित ठाकरेंनी ओळख देऊनही टोल कर्मचाऱ्यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.
त्यानंतर काही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हातात लाठ्या-काठ्या घेऊन मध्यरात्रीच्या सुमारास टोल नाक्यावर जात टोलनाक्याची तोडफोड केली. यावेळी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला. या प्रकारामुळे टोल नाक्यावर बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर वावी पोलिसांनी  घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेज व व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून पुढील तपास सुरु केला आहे.
अशातच आता या सर्व घडलेल्या प्रकाराबाबत मनसे नेते अमित ठाकरे  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, शिर्डीत साईबाबांच्या दर्शनानंतर वैयक्तिक कामासाठी समृद्धी महामार्गाने नाशिकला  निघालो होतो. महासंपर्क अभियानाच्या दौऱ्यात पोलीस बांधव थकल्याने मी त्यांना शिर्डीच्या शासकीय विश्रामगृहात विश्रांती करण्यास सांगितले. यावेळी टोलनाक्यावर फास्टटॅगमधून टोल कट न झाल्याने दहा ते पंधरा मिनिटे टोल कर्मचाऱ्यांनी गाडी थांबवली. त्यावेळी आम्ही त्यांना टेक्निकल इशू बाबत सांगितले मात्र, कर्मचारी उद्धट भाषा वापरत होते, असे ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, "त्यानंतर माझ्या सहकाऱ्यांनी टोल कर्मचाऱ्यांना सांगितले की हे अमित ठाकरे आहेत. यानंतर कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापकाला देखील फोन लावला. मात्र व्यवस्थापक देखील उद्धट भाषा वापरत होता. पंधरा ते वीस मिनिट गाडी थांबवून ठेवली आणि नंतर सोडली. त्यानंतर सिन्नर येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी टोल नाका फोडला. मला नाशिकला पोहोचल्यावर कळले की कार्यकर्त्यांनी टोल फोडला," असे ठाकरे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, "राज साहेबांमुळे ६५ टोल नाके बंद झाले आणि माझ्यामुळे त्यात आणखी एकाची भर पडली. टोल कर्मचाऱ्यांनी उद्धट भाषा वापरल्यामुळे कार्यकर्त्यांनी टोल फोडला, " असे स्पष्टीकरण अमित ठाकरेंनी यावेळी दिले. तसेच अमित ठाकरेंच्या या प्रतिक्रियेनंतर आता नाशिकमधील मनसेच्या नेत्यांनी देखील या घटनेवर भाष्य केले आहे.अमित ठाकरे यांच्या गाडीवरील फास्टटॅग स्कॅन होऊनही टोलनाक्यावरील इलेक्ट्रिक दांडा उघडला न गेल्याने पदाधिकाऱ्यांनी दांडा बाजूला करण्याची टोल प्रशासनाला विनंती केली. मात्र, संबधित टोल व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी अमित ठाकरे यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्यांनी टोल नाक्यावर आंदोलन केले.
===================================
अंकुश पवार, मनसे जिल्हाध्यक्ष, नाशिक
===================================
होय आम्ही राग व्यक्त करणारच. समृद्धी टोल नाका प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो. मनसेने धडा शिकवला.
===================================
दिलीप दातीर, मनसे शहराध्यक्ष, नाशिक
===================================

===================================
---------------------------------------------------
: - उप,संपादक - एस व्ही वाघ - शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
---------------------------------------------------
===================================

मनसेचा लढा - मराठी अस्मितेसाठी - अमित ठाकरे नगरमध्ये विद्यार्थ्यांशी साधला मनमोकळेपणे संवाद परिवर्तनासाठी संधी मिळावी...

अहमदनगर-प्रतिनिधि-वार्ता-

सध्याच्या राजकीय आरोप-प्रति आरोप जनता वैतागली आहे. जनतेला नवीन पर्यायाची गरज आहे. मराठी सर्व घटक सोबत माणसाच्या अस्मितेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सातत्याने महत्व दिले आहे. जनतेने परिवर्तनासाठी एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी द्यावी, अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी व्यक्त केली.
"महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष ठाकरे हे जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. शहरातील मध्यवर्ती बसस्थानका शेजारील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. हिंद सेवा मंडळाच्या पेमराज सारडा महाविद्यालयातील विद्यार्थी सेनेच्या शाखेचे उदघाटन केले. संस्थेचे पदाधिकारी सुमतीलाल कोठारी, अजित बोरा, मकरंद खेर, प्राचार्या डॉ. माहेश्वरी गावित यांनी त्यांचा सत्कार केला. त्यानंतर जिल्हा शासकीय विश्रामगृहामध्ये विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला.याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, सुमित वर्मा, गजेंद्र राशिनकर, चंद्रकांत ढवळे, प्रकाश गायकवाड, अनिकेत शियाळ, प्रमोद ठाकूर, स्वप्नील वाघ आदी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, सध्याचे राजकारणाचा दर्जा खालावला आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपास सुरू आहेत. ही जण घोटाळ्यांची चौकशी थांबविण्यासाठी पक्ष बदलत आहेत. सर्वसामान्य जनता या राजकीय चिखलफेकीला वैतागली आहे. जनता आता नवीन पर्यायाच्या शोधात आहे. मनसेने सतत मराठी माणसाच्या अस्मितेला प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून नवीन नेते तयार होतील, असा विश्वास ही व्यक्त केला.
ठाकरे यांच्याशी संवाद साधण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिल्हा शासकीय विश्रामगृहावर असंख्ये कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांची मोठी संख्या होती. राजकीय नेते जनतेशी कशा पद्धतीने संवाद साधतात, हे जाणून घेण्यासाठी कुतूहलापोटी आलेल्यांची संख्या मोठी होती. हजारो विद्यार्थ्यांनी भेटण्यासाठी गर्दी केली होती. विश्रामगृहातील हॉलमध्ये एकावेळेस सुमारे शंभर विद्यार्थ्यांना सोडले जात होते. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी खुर्च्या होत्या. ठाकरे हे खर्चीवर न बसता त्यांच्याशी बोलणार्‍या प्रत्येकाच्या खांद्यावर हात ठेवून त्यांचे म्हणणे ऐकून घेत होते.

===================================
विद्यार्थ्यांनी मांडली मते प्रखड
===================================

विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर प्रखडपणे मते मांडली. करोनामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पालक गमावले आहेत. त्यांना शैक्षणिक शुल्क शासनाने माफ करावे. उच्च शिक्षणाचे शुल्क भरमसाठ वाढलेले आहे, पोलिस, लष्कर भरती नियमित व्हाव्यात, एमपीएससी परीक्षेचा नवीन पॅटर्न लागू करू नये, परीक्षा नियमित व्हाव्यात, शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही अशा अनेक विषयांवर मते व्यक्त केली.

===================================
---------------------------------------------------
: - उप,संपादक सुयोग कर्णिक -शब्द...✍️✅️🇮🇳...
रचना संकलन वार्ता...
---------------------------------------------------
===================================





Saturday, July 22, 2023

बीआरएस पक्षात माजी आ.भानुदास मुरकुटे यांचा अखेर प्रवेश - तेलंगनाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या हस्ते 116 कार्यकर्त्यांचा सत्कार

श्रीरामपूर-प्रतिनिधि-वार्ता-

भानुदास मुरकुटे माजी आ.यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काल अखेर भारत राष्ट्र समितीचे प्रमुख व तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या हस्ते गळ्यात उपरणे घालत बीआरएसमध्ये अधिकृत प्रवेश केला.
भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) प्रमुख व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात राबविलेल्या शेतकरी योजनांची पाहणी करण्यासाठी तसेच माहिती घेण्यासाठी माजी आ. मुरकुटे 15 दिवसांपूर्वी तेलंगणाच्या दौर्‍यावर गेले होते. त्यांचे हैद्राबाद येथील मंत्रालयासमोरील तसेच भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासोबतची छायाचित्रे सोशल मिडियावर प्रसिद्ध झाल्याने ते बीआरएसच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधाण आले होते.
माजी आ. मुरकुटे यांनी गंगापूरचे माजी आ. अण्णासाहेब माने, श्रीगोंद्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व नुकतेच बीआरएसमध्ये प्रवेश केलेले घनश्याम शेलार यांच्यासोबत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. माजी आ. माने व घनश्याम शेलार यांच्या पुढाकाराने ही भेट घेण्यात आली होती.
त्यानंतर श्रीरामपूर येथील स्वयंवर मंगल कार्यालयात तेलंगणाचे खा. बी. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बीआरएस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. मेळाव्यापूर्वी खा. पाटील यांनी माजी आ. मुरकुटे यांच्या निवासस्थानी जाऊन स्नेहभोजन घेतले होते.
दोन दिवसांपूर्वी माजी आ. मुरकुटे अशोक कारखाना, अशोक बँकेचे संचालकासह 116 कार्यकर्त्यांना घेऊन तेलंगणाच्या अभ्यास दौर्‍यासाठी रवाना झाले. यात अशोक बँकेचे चेअरमन अ‍ॅड. सुभाष चौधरी, अशोक कारखान्याचे व्हा. चेअरमन पुंजाहरी शिंदे, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ, संचालक भाऊसाहेब उंडे, विरेश गलांडे, ज्ञानेश्वर काळे, रामभाऊ कसार, माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, दिगंबर शिंदे, आदिनाथ झुराळे, बाबासाहेब आदिक, अच्युत बडाख, अशोक बँकेचे संचालक जितेंद्र तोरणे, कार्यकारी संचालक संतोष देवकर आदींसह कार्यकर्त्यांचा समावेश
आहे.
काल माजी आ. मुरकुटे यांनी 116 कार्यकर्त्यांसह तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते सत्कार स्विकारत बीआरएसमध्ये प्रवेश करून राजकीय धक्का दिला. काल शनिवार दि. 22 रोजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या निवासस्थानी हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी बीआरएसचे नेते माजी आ. अण्णासाहेब माने पाटील, महाराष्ट्र किसान सेलचे अध्यक्ष माणिकराव कदम, पुणे विभाग समन्वयक बी. जे. देशमुख, ज्येष्ठ नेते दशरथ सावंत, घनश्याम शेलार, अब्दुल कादीर मौलाना, बंजारा समाजाचे नेते प्रल्हाद राठोड, आ. जीवन रेड्डी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव व माजी आ. मुरकुटे यांच्यात चर्चा झाली. यादरम्यान महाराष्ट्रासाठी तेलंगणाच्या धर्तीवर काय करता येईल तसेच गोदावरी नदीवरील कालेश्वरम उपसा सिंचन योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील गोदावरी खोर्‍यासाठी अशी योजना राबविता येईल का? यावरही सविस्तर चर्चा झाली.
माजी आ. मुरकुटे यांनी यापूर्वी वेगवेगळ्या पक्षातून उमेदवारी करत तिन वेळा आमदार म्हणून तालुक्याचे नेतृत्व केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे ते निकटवर्ती होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेप्रसंगी ते सर्वप्रथम श्री. पवार यांच्यासोबत होते. नंतरच्या काळात त्यांनी शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी केली. त्यानंतर कोणत्याच पक्षात न राहता निवडणुका लढविताना सर्वच राजकीय पक्षांची मदत मिळू शकते असा कयास बांधून त्यांनी लोकसेवा विकास आघाडीची स्थापना केली. त्या माध्यमातून तालुक्यातील विविध निवडणुका लढवित होते. आपली आघाडी म्हणजे रेल्वेचा डबा आहे, प्रसंगी तो कोणत्याही राजकीय पक्षाला जोडता येतो, असे त्यांनी अनेकदा सांगितले आहे.माजी आ.मुरकुटे हे दोनवेळा तेलंगणा दौर्‍यावर गेल्याने त्याच्या बीआरएस पक्ष प्रवेशाची चर्चा रंगली होती. अखेर ही चर्चा प्रत्यक्षात उतरवून माजी आ. मुरकुटे यांनी जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा उडवून दिली आहे.

===================================
---------------------------------------------------
: - मानद,संपादक.अकबर.शेख.शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
---------------------------------------------------===================================





सीमा हैदर प्रकरण देशातील नागरिकांच लक्ष केंद्रित करुन संभ्रमचा ग्रहण सुटून काय साध्ये होणार

देश - परदेश - वार्ता -

4 मुलांची आई, एक मुस्लिम महिला तिच्यापेक्षा कित्येक वर्षांनी लहान असलेल्या तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात जाते. माझ्या माहितीनुसार, २०२० मध्ये भारतात PUBG वर बंदी घालण्यात आली होती.
मीडिया आणि खास वर्ग त्याला नायक नायिका बनवतो, वीरझाराची कथा बनवतो!!
सर्वजण एकाच मेंढ्याच्या गतीने चालत आहेत. पत्रकार दिवसभर माईक लावून नायिकांच्या मुलाखती घेत आहेत. पोलीस, गुप्तचर यंत्रणा कच्ची, सीबीआय, सीमेवरील सुरक्षेचे लोक, मोठे अधिकारी, देशभक्त, नेते कुठे आहेत?
सीमा हैदर स्वतःला सांगते की ती ५वी पास आहे, पडद्यामागे राहणाऱ्या महिलेला एवढा आत्मविश्वास कसा आला की ती चार मुलांना सोबत घेऊन गेली? एका सामान्य महिलेने इतक्या देशांच्या सुरक्षा व्यवस्थेला चकमा दिला?
PUBG च्या शौकीन सीमा यांच्याकडे 3 मोबाईल आणि अनेक सिम असल्याचं सांगण्यात येत आहे. शेवटी 4 मुलांच्या आईला इतका वेळ आणि माहिती कशी मिळणार?
सीमाकडे 5 देशांचे पासपोर्ट आहेत का? शेवटी सीमा कोणत्या श्रीमंत कुटुंबाशी आणि व्यवसायाशी संबंधित होती, ती बेपत्ता झाल्यानंतरही तिचा शोध लागला नाही? अस्खलित इंग्रजीसह हिंदी बोलता बोलता, भाषेत उर्दू शब्दांचा वापर फारच कमी आहे.
एका मुलाखतीत सीमाला नमाजचे शब्दही ऐकू येत नाहीत आणि ती जास्त नमाजही अदा करत नाही, असे तिचे म्हणणे आहे. येताच एखाद्या टिपिकल भारतीय स्त्रीप्रमाणे साडी, नमस्ते, कॅमेऱ्यासमोर मस्त स्टाईल, दुसऱ्या देशात आल्यावरही कसलीही संकोच, भीती नाही, दुसरी एंट्री?? शेवटी कसं?
ज्या देशात भारत आणि हिंदू धर्माविरुद्ध प्रचंड संताप आहे
तिथून द्वेष पेरला जातो, नाव राधे राधे
नामजप करणे, तुळशीला पाणी देणे, सिंदूर, मंगळसूत्र धारण करणे
मिठी मारता येत नाही वारंवार भारतीय नागरिकत्वाची मागणी
जणू या ठिकाणचे नागरिकत्वच शेंगदाणे आहे.
आजच्या आधुनिक युगात जिथे दिसणं, पैसा आणि सामाजिक ओळख सगळ्यात महत्त्वाची आहे, तेव्हा सचिन नावाचा एक साधा मुलगा, ज्या मॅडमने हिऱ्या- दागिन्यांची खाण पाहिली आणि लाखो रुपये खर्च करून सर्व साधारण घर गाठले 
मीडियाच्या मुलाखतींमध्ये हा सचिन इतका हरवला आणि घाबरलेला का दिसतो, मुलाखतीच्या वेळी सीमा सचिनवर नजर का ठेवते? सीमाच्या कथित पतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे जो पूर्णपणे बनावट दिसत आहे.
मुस्लीम बाई हिंदू झाल्याचा आनंद अनेक महापुरुष साजरा करत आहेत, 5 हिंदू झाल्याचा आनंद साजरा करत आहेत!! भारताच्या नागरिकत्वाच्या मूर्खपणाची पराकाष्ठा पहा
त्यासाठी सोशल मीडियावर मोहीम सुरू करण्यात आली आहे.
सीमा हैदरचे स्वागत करणाऱ्यांना माझा प्रश्न, तुम्ही मानवी बॉम्बचे नाव कधी ऐकले आहे का? 2 वर्षाच्या मुलांचाही हेरगिरीसाठी वापर केला जाऊ शकतो, हा विचार तुमच्या मनात कधी आला आहे का?
जर सीमा खरच प्रेमात असेल तर ठीक आहे त्यांना स्वतःचे स्वातंत्र्य आहे पण नियम हे नियम आहेत आणि जर सीमाने कोणत्याही विशिष्ट कारणासाठी भारतात ढवळाढवळ केली तर तुम्ही फक्त एक सीमा पाहत आहात मला 5 हेर, 5 धमक्या दिसत आहेत!!

=================================
------------------------------------------------
: - पंकज सिंग - सामाजिक - कार्यकता - दिल्ली -शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
------------------------------------------------
=================================











Friday, July 21, 2023

हे तर कसले प्रशासन असा खणखणीत खोचक प्रश्न ? - राज ठाकरे...

 मुंबई - प्रतिनिधि - वार्ता -

भयाण घडलेला दुर्दैवी नेसर्गिक अप्पती प्रकार इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याची घटना अतिशय दुःखद आहे. युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे, असे सांगण्यात येत आहे. यातून लोक सुखरूप बाहेर पडावीत, इतकी इच्छा. जे जखमी आहेत, त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत ना, आणि त्यांच्या नातेवाईकांना आपल्याकडून काय मदत मिळेल, हे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जरूर पाहावे.खरे तर अशा घटना घडल्यावर लगेच हे बोलायची इच्छा नव्हती; पण आता इतकंच सांगतो
की, कुठे दरड कोसळू शकतात याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर हे कसले प्रशासन ? असो. पुढे यावर सविस्तर बोलेन, पण आता तरी सगळे सुखरूप राहावेत, ही इच्छा!' अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटद्वारे दिली.
=================================------------------------------------------------
: - नवकेश कुडाळकर - शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
------------------------------------------------
=================================




२४X७ लोखंडी कठडेही बसवलेआता 'समृद्धी'वर आरटीओचा पहारा

नाशिक - प्रतिनिधि - वार्ता -

समृद्धी महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी आता आरटीओने २४ तास पहारा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आता आरटीओची दोन पथके तैनात करण्यात आल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी दिली. शिवाय वाढत्या अपघाताचा धोका लक्षात घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने या मार्गावरील अनेक टर्निंग पॉईंट बंद करण्यात येत आहेत
समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदाराने आरटीओ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सूचनेनंतर रस्त्याच्या डिव्हायडरच्या बाजूला अनेक ठिकाणी लोखंडी कठडे लावले आहेत. यामुळे वेगात आलेले वाहन हे डिव्हायडरवर आदळू नये. यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. या मार्गावर ठिकठिकाणी टर्निंग पॉईंट देण्यात आले होते. पूर्वी हे टर्निंग पॉईंट खुले होते. अनेक वाहने या टर्निंग पॉईंटला वळण घेऊन येत होते. यामुळे अपघाताचा धोका वाढलेला होता. हे टर्निंग पॉईंटही बंद करण्यात आले आहे.
समृद्धी महामार्ग वाहतुकीला खुला झाल्यापासून आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ११२ किलोमीटरच्या हद्दीत आतापर्यंत नऊ अपघातांत १६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर १२ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हे अपघात कमी करण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वाहनचालकांसाठी माळीवाडा येथील पॉईंटवर समुपदेशन केंद्र सुरू केले आहे. लेन कटिंग, ओव्हर स्पीड वाहनचालकांना या केंद्रावर अपघाताचा व्हिडिओ दाखविला जातो. तसेच चालकाकडून शपथपत्र भरून घेतले जाते आणि शपथ म्हणवून घेतली जाते. तर वेरुळ पॉईंटवर वाहनांची टायर तपासणी केली जात आहे. आतापर्यंत तब्बल ५ हजार २८० वाहनांची तपासणी करण्यात आली असून टायर खराब असलेल्या ३२१ वाहनांना परत पाठवले आहे.
दरम्यान, ऑन रोड वाहन तपासणीही सुरू आहे. हायस्पीड असलेली हाती न लागलेली वाहने किंवा लेन कटिंग करून धावणाऱ्या वाहनांचे क्रमांक संगणकीय लिंकवर टाकले जातात, अशी वाहने टोलनाक्यावर आल्यावर मोठा सायरन वाजतो, त्यामुळे त्यांना थांबवून कारवाई केली जाते. आरटीओ पथकांनी वाहनांना दोषी ठरवून संगणकीय लिंकवर क्रमांक नोंद केलेल्या २१६ व वाहनचालकांचे कौन्सिलिंग करण्यात आले.
आरटीओ विभागाकडून ही कारवाई होत असतानाही काही अपघात झालेले आहेत. या अपघाताची दखल घेऊन समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदाराने आरटीओ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सूचनेनंतर रस्त्याच्या डिव्हायडरच्या बाजूला अनेक ठिकाणी लोखंडी कठडे लावले आहेत. यामुळे वेगात आलेले वाहन हे डिव्हायडरवर आदळू नये. यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. या मार्गावर ठिकठिकाणी टर्निंग पॉईंट देण्यात आले होते. पूर्वी हे टर्निंग पॉईंट खुले होते. अनेक वाहने या टर्निंग पॉईंटला वळण घेऊन येत होते. यामुळे अपघाताचा धोका वाढलेला होता. हे टर्निंग पॉईंटही बंद करण्यात आले आहे.
आणखी दोन पथके
समृद्धी महामार्गावर हेात असलेले अपघात रोखण्यासाठी दोन पथके नेमण्यात आले आहे. ही पथके दिवसा आणि रात्रीच्या वेळी वाहनांची तपासणी करीत आहेत. यात वेरूळ पॉईंट आणि माळीवाडा पॉईंट अशा दोन पॉईंटचा समावेश आहे. वेरूळ येथे टायर तपासणी, तर माळीवाडा पॉईंट येथे समुपदेशन केंद्र आहे. याशिवाय या ठिकाणी वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत आहेत, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी दिली.

===================================
---------------------------------------------------
: - उप,संपादक.एस.व्ही.वाघ - नाशिक - शब्द...✍️✅️🇮🇳... रचना संकलन वार्ता...
---------------------------------------------------
===================================