राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, July 3, 2023

शैला वाघ यांचे सेट परीक्षेत यश राजापूर ता. संगमनेर

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

लियाकतखान पठाण - संगमनेर - वार्ता -
 संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील प्रागतिक शिक्षण संस्थेच्या नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत असलेल्या सहशिक्षिका शैला दगडू वाघ ह्या इंग्लिश या विषयात सेट परीक्षा पात्र झाल्या आहेत.
 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी आवश्यक राज्यस्तरीय पात्रता चाचणी (सेट) परीक्षेत शैला दगडू वाघ ह्या इंग्लिश या विषयात पात्र झाल्या आहेत. त्यांना नाशिक येथील प्रा. देविदास गिरी व प्रा. छाया लोखंडे तसेच विद्यालयाचे माजी प्राचार्य श्री.घोडेकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.
  याआगोदर त्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने घेतली जाणारी नेट (डिसेंबर २०१०) तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित सेट (डिसेंबर २०२०) या परीक्षा मराठी विषयात पात्र झाल्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल प्रागतिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, सेक्रेटरी, सर्व सदस्य तसेच विद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षक व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन हो

((( समता )))
 न्यूज नेटवर्क,
श्रीरामपूर - 9561174111
                                
A

No comments:

Post a Comment