राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, July 2, 2023

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा प्रसार माध्येमाशी दावा महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळणार ?


   मुंबई - प्रतिनिधि - वार्ता -
राज्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे  शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर झाले आहे. एकनाथ शिंदे हे फार काळ मुख्यमंत्री राहणार नाहीत. आजच्या शपथविधीने शिंदे यांचे मुख्यमंत्री पद जाणार हे सिद्ध झाले असून राज्याला लवकरच नवा मुख्यमंत्री मिळेल. त्यामुळेच भाजपने अजित पवार यांचा नवा टेकू घेतला आहे, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी येथे केला
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी आज अनपेक्षितपणे मंत्रिपदाची शपथ घेतली. या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात आज जे काही घडले तो राजकीय भूकंप वगैरे नाही. पडद्याआड ही सगळी प्रक्रिया सुरू होती. आम्हालाहीकुणकुण नव्हे तर याची माहिती होती.एकनाथ शिंदे यांच्यासह आधी १६ आमदार अपात्र होतील, त्यानंतर उरलेले २४ असे ४० आमदार अपात्र होणार असल्यानेच भाजपला आता अजित पवार यांची मदत घ्यावी लागली आहे. अजित पवार यांच्यासोबत काही लोकांनी शपथ घेतली याचा अर्थ सध्याचे सरकार अस्थिर आहे. शिंदे-फडणवीस सरकारला १६५ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जातो. असे असतानाही भाजपला अजित पवार आणि ३०-३५ आमदारांची गरज का लागते, असा सवाल राऊत यांनी केला.
शिंदे-फडणवीस सरकारच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिलेला आहे. त्यानुसार एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार अपात्र ठरणार आहेत. शिंदेंचे मुख्यमंत्रिपद जाण्याची चिन्हे आहेत. आमचे सरकार डबल इंजिन सरकार असल्याचा दावा ते करतात. मात्र, त्यांचे एक इंजिन बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे भाजपने हे दुसरे इंजिन जोडले आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.लोकांचा या सर्व गोष्टींना पाठिंबा नाही. जे आधी शिवसेनेसोबत घडले ते आता राष्ट्रवादी काँग्रेससोबत घडत आहे. या सगळ्याला लोकांचा पाठिंबा नाही, असेही संजय राऊत म्हणाले.
आजच्या सर्व घडामोडींवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचीही चर्चा झाली आहे. शरद पवार यांनी आपण खंबीर आहोत. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू, असे म्हंटले आहे.भविष्यात आम्ही सगळे एकत्र राहू. निवडणुका लढवू आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी पुन्हा उभी करू, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

===================================
---------------------------------------------------
उप संपादक,एन एम प्रणय - शब्द ... ✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
---------------------------------------------------
===================================


No comments:

Post a Comment