मुंबई - विशेष - वार्ता - प्रतिनिधि -
मुंबई महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असे नेतृत्व असेल की जे देशांच्या सीमा तोडून पसरत गेले, गांधीजींचे तत्त्वज्ञान व्यापक होते. त्यांच्यासारखा दुसरा कोणी होणे नाही, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गौरव शनिवारी मनसेतर्फे पुनः प्रसारित करण्यात आला. गांधीजींविषयी संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्यात वादळ उठले असून, त्या विधानाचा राज ठाकरे यांनी या टिपण्णीद्वारे अप्रत्यक्ष समाचार घेतला.
राज ठाकरे यांनी गतवर्षीच्या गांधी
जयंतीनिमित्ताने ट्विटरवरून ही अभिवादनपर पोस्ट केली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, 'महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असे नेतृत्व असेल की, जे देशांच्या सीमा तोडून पसरत गेले. तेही इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल नसताना. गांधीजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की, फक्त भारतच नव्हे तर जवळपास तीन खंडातील देशांमध्ये स्वातंत्र्याची आस जागृत झाली आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला.
जे गांधीजींना जमले ते जवळ जवळ कोणालाच जमले नाही, असे मत व्यक्त
करून राज ठाकरे यांनी पुढे म्हटले की, "विशिष्ट राजकीय-सामाजिक परिस्थितीत प्रबळ वाटणारे नेते आले, कमालीचे लोकप्रिय झाले आणि पुढे काही वर्षांतच मागे पडलेले दिसले आहेत. गांधीजींचे तत्त्वज्ञान व्यापक होते, हे त्याचे कारण असल्याचे राज यांनी स्पष्ट केले आहे. गांधीजींच्या तत्त्वज्ञानाविषयी ते म्हणाले की, 'शृंखला मग त्या अज्ञानाच्या असोत, की गुलामगिरीच्या वसाहतवादाच्या की जातींच्या, त्या शृंखलांनी कुठल्याही माणसाला बांधून ठेवण्याचा अधिकार कोणालाच नाही, कारण सगळी माणसे ही मुळात समान आहेत, इतके सोपे तत्त्व त्यांनी स्वीकारले आणि त्यासाठी त्यांनी संघर्ष केला. हे खूप कठीण आणि दुर्मिळ आहे, म्हणूनच गांधीजींसारखा बहुदा दुसरे कोणी होणे नाही.
=================================
------------------------------------------------
: - सुयोग प्रजापती - मुबंई - शब्द...✍️✅️🇮🇳... रचना संकलन वार्ता...
=================================
------------------------------------------------
No comments:
Post a Comment