समीर - शेख - सोनई
मुस्लीम धर्मियांचे पवित्र धार्मिक ग्रंथाची कोपरगांव तालुक्यातील कोळगाव थडी येथील काही अज्ञात समाजकंटकांनी प्रार्थनास्थळात (मशीद) घुसून
धार्मिक ग्रंथ चोरले आणी त्यास फाडून रस्त्याच्या कडेला फेकुन देत दोन समाज्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे समस्त मुस्लीम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. अशा राक्षसी वृत्तीचा व कृतीचा समस्त मुस्लिम समाजाच्यावतीने निषेध जाहिर निषेध करण्यात येवून संबंधित दोषी अज्ञास समाजकंटक आरोपींना त्वरित शोधून त्यांवर कठोर कारवाई करावी अशा अशयाचे निवेदन समस्त मुस्लिम समाज सोनई यांच्या वतीने सोनई पोलिसांना देण्यात आले.
या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, सदरील अज्ञात समाजकंटकांचा त्वरीत शोध घेण्यात यावा तथा सदरचा तपास हा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत करण्यात यावा आणी सदरील आरोपी समाजकंटकांना त्वरित शोधून काढत त्यांच्यावर कडक आणी कठोर कारवाई करावी, तसेच सदरील प्रकरणी समाजकंटक आरोपींना येत्या सात दिवसाच्याआत शोध घेवून गजाआड करावे,अन्यथा समस्त मुस्लीम समाज रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करील. तथा यापासून निर्माण होणाऱ्या बऱ्या व वाईट परिणामास शासनच जबाबदार राहील तरी याची नोंद घेवून आपण आमच्या तीव्र भावना शासन दरबारी आणी वरिष्ठांपर्यंत पोहचवून निवेदनातील मागण्या पूर्ण कराव्यात असे निवेदनात म्हटले आहे.
सदरील निवेदन हे सोनई पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी आणी राजेंद्र थोरात यांना देण्यात आले. यावेळीआझाद सामजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नजीरभाई सय्यद,ॲड.जमीर शेख, फिरोजभाई पठाण,शकीलभाई बागवान,कलीमभाई पठाण, फारुकभाई पठाण, मौलाना अय्युब,मौलाना,सलीम,हाफिज समीर,हाफिज निषात,हाफिज वसीम,खालीलभाई इनामदार, ॲड.इरफान सय्यद,आयाज शेख (लाला), इरफानभाई शेख, शाहरुख शेख,आरिफ शेख,असद कुरेशी, तय्यब सय्यद,अयुब पठाण, दादाभाई सय्यद,अमजद पठाण, अबुबकर सय्यद तथा सोनई परिसरातील समस्त मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment