राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, August 13, 2023

मुंबई – गोवा महामार्गाची अवस्था चंद्रावर पडलेल्या खड्यांसारखी

महाड - प्रतिनिधि - वार्ता 

गणेशोत्सव जवळ आला आहे. कोकणचा मुंबईतील चाकरमानी या उत्सवासाठी कोकणात जायला निघणार आहे. मात्र, मुंबई – गोवा महामार्ग रस्त्यांची अवस्था चंद्रावर पडलेल्या खड्ड्यांसारखी आहे.

यामुळे कोकणाचा प्रवास सुखकर होणे अशक्य असल्याचे म्हणत शिवसेना (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. रस्त्याच्या कामाबाबत उदासीन असलेल्या राज्य सरकारला कोकणी माणूस चांगलाच इंगा दाखवेल, अशी टीकाही त्यांनी केली.

कोकणामध्ये दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. गणेश उत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणात दाखल होतात. मात्र, गणेशोत्सव जवळ आला तरीदेखील मुंबई-गोवा महामार्गाची दयनीय अवस्था कायम आहे.
रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने प्रवास करताना चाकरमान्यांना कसरत करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर ट्विट करून अदित्य यांनी शिंदे गट आणि राज्य सरकारवर ही टीका केली आहे.

पालकमंत्री पदासाठी आपापसात भांडणाऱ्या आणि अहंकाराने फुगलेल्या खोके सरकारमधल्या आमदारांना स्वतःच्या मतदारसंघातून जाणाऱ्या महामार्गाचा प्रश्न सोडवता येत नाही ? पाठीशी असलेली महाशक्ती ही मदतीला येत नाही? अशांना कोकणी माणूस इंगा दाखवणारच. असे त्यांनी म्हटले आहे.

=================================------------------------------------------------
: - अमोल पालिकर - लेख - शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
------------------------------------------------
=================================



No comments:

Post a Comment