श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता
येथील संगमनेर रोडवरील व्ही.आय.पी.रेस्ट हाऊसच्या सभागृहात नव स्वराज्य सेना या राष्ट्रव्यापी सामाजिक संघटनेची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात येवून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांसह त्याना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सेवनिवृत्त पोलीस उपअधिक्षक अर्जुन भांड हे प्रामुख्याने उपस्थित होते.त्यांच्या शुभहस्ते नव स्वराज्य सेना या सामाजिक संघटनेच्या फलकाचे रिबीन कापून अनावरण करण्यात आले. श्री.भांड यांनी यावेळी संघटनेच्या पुढील कार्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या व आनंद व्यक्त केला.
सदर प्रसंगी ॲड. विजयराव खाजेकर यांना सर्व कार्यकर्त्यांनी नव स्वराज्य सेना या सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मोठ्या जल्लोषात घोषीत केले व त्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. विजयराव खाजेकर म्हणाले की, ही संघटना केवळ राज्यभरातच कामे करणारी नसुन राष्ट्रव्यापी सामाजिक संघटना असल्याने संपूर्ण देशभर या संघटनेचे कार्य असणार आहे.तसेच सदरील संघटना सर्व जाती-धर्मातील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबध्द राहील व ही संघटना तळागाळातील उपेक्षित आणि दुर्लक्षित जनतेसाठी,गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, कामगार, दलीत, शोषीत, पिडीत आदि लोकांच्या न्याय हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करील असे बोलताना त्यांनी संघटनेचे धैय्य धोरणे स्पष्ट केले.
सदर सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.विजयराव खाजेकर यांच्या हस्ते अहमदनगर जिल्हा तसेच छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या जबाबदाऱ्या सोपवत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी ॲड. आण्णासाहेब मोहन, डी.एल. भोंगळे सर, विलासराव खाजेकर, कवी आनंदा साळवे, रमाताई भालेराव, अमरप्रितसिंग सेठी आदींची मार्गदर्शनपर भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सुयोग्य सुत्रसंचलन आण्णासाहेब मोहन व भाऊसाहेब खरात यांनी केले.
यावेळी सर्वश्री संजय बाहुळ, भाऊसाहेब खरात, मुस्ताकभाई शेख, इब्राहीमभाई शेख, जस्पालसिंग सहानी,भोंगळे सर, आनंदा साळवे, रंगनाथ पितळे, हमीदभाई चौधरी, रमाताई भालेराव, मो. रमजानभाई पटेल,परविन शहा, राजुभाई जहागीरदार, संदीप दोडकर, उषाताई पवार, सविताताई रणदिवे, तय्यब पठाण, राजुभाई शेख, मास्टर सरवरअली सय्यद, डॉ.अशोक शेळके, प्रभाकर ब्राम्हणे, अमोल दिवे, बाळासाहेब उबाळे, नवनाथ गडकर, ॲड. दिपक उबाळे, नवनाथ उबाळे, विठ्ठल विघावे, अमरप्रितसिंग सेठी, गुलाब दिवे आदी मान्यवर तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी संजयभाऊ वाहळ यांनी सर्वांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment