राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट तयार झाले आहेत. एक गट भाजपसोबत तर दुसरा महाविकास आघाडीसोबत आहे. मात्र पक्षातील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त भेट सध्या चर्चेत आहे. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरेंनी आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याची माहिती राज ठाकरेंनी दिली. त्यानंतर सध्या सत्ताधारी व विरोधकांमध्ये संभ्रम असल्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता राज ठाकरेंनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनाच उलटा प्रश्न केला
यावर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया देत म्हणाले की, “सरकार काय, पत्रकारितेतही कन्फ्युजनच आहे. कोण कुणाचा आहे हेच कळत नाही हल्ली. उलटा फिरला की लेबल कळते मग लागलेले. कोणत्या पक्षाचा आहे ते. त्यामुळे सगळीकडेच कन्फ्युजन आहे. बघू.. दूर होईल लवकरात लवकर”, असे राज ठाकरे म्हणाले.
तुम्हाला पहाटेचा शपथविधी आणि त्यानंतर घडलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला आठवत नाही का? शरद पवार आणि अजित पवार जिथे भेटले ती जागाही कमाल आहे. याचाही विचार करायला हवा, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
तुम्हाला पहाटेचा शपथविधी आणि त्यानंतर घडलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला आठवत नाही का? शरद पवार आणि अजित पवार जिथे भेटले ती जागाही कमाल आहे. याचाही विचार करायला हवा, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
माझे ऐकत नाही तुम्ही. मी मागेच सांगितलेय की राष्ट्रवादीची ती पहिली टीम आहे, उर्वरित टीमही तिकडे जाणार आहे. हे सर्व आतूनच चालू आहे. हे काही आजचे नाहीय, २०१४ पासून हे लोक एकत्र आलेले आहेत.
तुम्हाला पहाटेचा शपथविधी आठवत नाही का, त्यांनतर झालेल्या गोष्टी. शरद पवार आणि अजित पवार यांना भेटायची जागा 'चोरडिया' या नावाच्या ठिकाणी मिळावी हे पण कमाल आहे, असा खोचक टोला राज ठाकरेंनी अजित-शरद पवार गुप्त भेटीवर लगावला.
=================================
------------------------------------------------
: - उप, संपादक - प्रविण पाटील - शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
------------------------------------------------=================================
No comments:
Post a Comment