श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता
राहुरी येथील ज्येष्ठ पत्रकार साप्ताहिक भडकत्या ज्वालाचे संपादक व ग्रामपंचायत सदस्य सय्यद निसार मकबूल यांच्या राहुरी स्टेशन येथील राहत्या घरावर दि. १२/०८/२०२३ रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दहा ते बारा अज्ञात गुंडाच्या टोळीने तोंडाला रुमाल बांधत, दुचाक्यावरुन येऊन तोंडावर पेट्रोल बॉम्ब फेकून घरासह त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला,तसेच घराबाहेर उभ्या असलेल्या चारचाकी अल्टो कार व दुचाक्यांवर पेट्रोल टाकून जाळण्यात आल्या.
सुदैवाने निसार सय्यद यांच्या घराचे दार लोखंडी असल्यामुळे या गुंडांना घरात प्रवेश मिळवता आला नाही व पेट्रोल बॉम्ब ने पेट घेतला परंतु घराच्या आत आग न लागल्याने ते व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य या हल्ल्यातून बचावले हा हल्ला एका प्रकारे आतंकी हल्लाच होता, निसार सय्यद यांच्या नात्यातील एका मुलाने एका अल्पवयीन मुलीचे फोटो वायरल केल्यामुळे त्याला आदल्या दिवशीच पोलिसांनी अटक करून त्याच्यावर कारवाई केली.या रोशात्मक भूमिकेतून गुंडांच्या टोळीने निसार सय्यद यांच्या घरावर हल्ला केला असावा असा अंदाज काही जणांकडून वर्तविला जात आहे.
या हल्लेखोरांनी कायदा हातात घेऊन दहशत निर्माण करत पत्रकार निसार सय्यद व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून सदरील गुंड पुन्हा अशा प्रकारे निसार सय्यद किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा घात करतील,तत्पूर्वी पोलीस प्रशासनाने या हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर भा द वि कलम ३०७,४३५,४३६ व पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कठोर कारवाई करून निसार सय्यद व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना संरक्षण द्यावे या आशयाचे निवेदन महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय (प्रांत) अधिकारी,अप्पर पोलीस अधीक्षक, उप विभागीय पोलिस अधीक्षक यांच्या कार्यालयात जाऊन दिनांक १४/०८/२०२३ रोजी देण्यात आले.
यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकतअली यांच्या समवेत पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर महंमद, इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, पत्रकार संघाचे जिल्हा सचिव सलाउद्दीन शेख, उत्तर जिल्हा उपाध्यक्ष एजाज सय्यद, श्रीरामपूर शहराध्यक्ष रियाज पठाण, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती अकीलभाई शेख, बेलापूर शाखा उपाध्यक्ष मोहम्मद असलम सय्यद,पत्रकार सलीम पठाण,मुरलीधर किंगर, राजेंद्र सूर्यवंशी,रोहिदास थोरात, मोहसीन शेख,कदम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
===================================
---------------------------------------------------
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
------------------------------------------------------------------------
=====================================
No comments:
Post a Comment