वजीर शेख - पाथर्डी
कोपरगाव तालुक्यातील कोळगांव थडी येथे गत काही दिवसांपूर्वी इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र ग्रंथ असलेल्या "कुरान शरीफ"ची विटंबना व अनादर केल्याप्रकरणी मुस्लिम धर्मियांच्या प्रचंड प्रमाणात भावना दुखावल्या गेल्या आहेत, सदरील घटनेचा पाथर्डी तालुका मुस्लिम बांधवांच्या वतीने तिव्र शब्दात निषेध करण्यात येवून संबंधित दोषी आरोपींना त्वरित शोधून काढत त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन पाथर्डी पोलिसांना देण्यात आले.
या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,कोपरगांव तालुक्यातील कोळगांव थडी येथील मुस्लिम धर्मियांचे पवित्र ग्रंथ विटांबना प्रकरणी संबंधित गुन्हेगार असलेल्या समाजकंटकावर तातडीने कठोर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी शांततेच्या मार्गाने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पाथर्डी तालुका पोलीस उपनिरीक्षक श्री.कायंदे साहेब व ठाणे अंमलदार श्री. भिंगारदिवे साहेब यांच्याकडे निवेदन देण्यात येवून सदरील गंभीर प्रकरणी कारवाई ची मागणी करण्यात आली. यावेळी पाथर्डी तालुका काँग्रेस अध्यक्ष अली,नासीर शाहनवाज़ शेख,भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष शन्नोभाई पठाण
सामाजिक कार्यकर्ते मुन्ना शेख,अहमदनगर जिल्हा युवा काँग्रेस सरचिटणीस जुनेद पठाण,
समीर पापली शेख,नगरसेवक
चांद मणियार, वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष इरफान शेख,मौलाना आमीन,नवाब पठाण,आमिर शेख,जावेद पिंजारी,जावेद बागवान,जुबेर आतार, उबेद आतार अमजद आतार,शाहिद बागवान,
इरफान सय्यद,मौलाना जावेद आदिंसह अनेक समाज बांधव आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment