श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -
श्रीरामपूरच्या शहराच्या जडण घडणीमध्ये श्रीरामपूरच्या व्यापारी बांधवांचे मोठे योगदान आहे. श्रीरामपूर शहर हे व्यापाऱ्यांनी नावारूपास आणले असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ.वंदनाताई मुरकुटे यांनी केले.
श्रीरामपूर मर्चन्ट असोसिएशनच्या नवनिर्वाचित
संचालकांचा सत्कार श्रीरामपूर येथे मुरकुटे यांच्या निवासस्थानी करण्यात आला. त्याप्रसंगी त्या
बोलत होत्या.
यावेळी बोलताना डॉ .मुरकुटे म्हणाल्या की,आपल्या व्यापाराबरोबरच सामाजिक, धार्मिक तसेच करोना काळात काम करून आपले सामाजिक दायित्वत जोपासण्याचे काम इथे व्यापारी बांधव करत असतात.येथील व्यापाऱ्यांनी
श्रीरामपूर शहराचे वैभव जपले असून श्रीरामपूरच्या प्रगती व विकासामध्ये व्यापारी बंधूंचा मोठा वाटा असल्याचे डॉ..मुरकुटे म्हणाल्या.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे म्हणाले, शहर व ग्रामीण भागाची नाळ व्यापारी बांधवांबरोबर जोडली गेली असून व्यापारी बांधव हे तालुक्याच्या व शहराच्या भरभराटीसाठी मोठे योगदान देत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी प्रा .किसनराव वमने म्हणाले की, व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार मुरकुटे कुटुंबाच्या वतीने करण्यात आला असून ही व्यापाराच्या दृष्टीने भूषणावह गोष्ट आहे
या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनचे नवनिर्वाचित संचालक गौतम उपाध्ये, अनिल लुल्ला, निलेश नागले, संजय कासलीवाल, धर्मेश शहा यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. यावेळी किसनराव वमने,भागवतराव मुठे, बाळूशेठ खाबिया, नंदू कोठारी, जगन्नाथ नागले , कैलास शिंदे, नितीन नागले आदी उपास्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी तर आभार भागवतराव मुठे यांनी मानले.
===================================
---------------------------------------------------
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment