श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -
तालुक्यातील हरेगाव येथील चोरीच्या संशयातून चार मुलांना अमानुषपणे झाडाला उलटे टांगून मारहाण केल्याची घटना धक्कादायक व निंदनीय आहे. या घटनेचा भारत राष्ट्र समितीच्या वतीने निषेध करण्यात येत असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना श्री. मुरकुटे म्हणाले की, हरेगाव येथे किरकोळ चोरीच्या संशयावरुन चार अनुसुचित जातीच्या मुलांना सहा व्यक्तींनी मारहाण केल्याचे समजले. सदरची घटना ही मानवतेला काळिमा फासणारी आहे. अशा तऱ्हेने मुलांना झाडाला उलटे टांगून मारहाण करणे निंदनीय आहे. आजच्या काळात अशी घटना घडणे हे संतापजनक आहे. तसेच सामाजिक असंतोष निर्माण करणारी आहे.
या घटनेचा भारत राष्ट्र समिती निषेध करीत आहे. या प्रकरणी जे दोषी असतील त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी श्री.मुरकुटे यांनी केली आहे.
===================================
---------------------------------------------------
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -
*9561174111*
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment