घारगाव - प्रतिनिधि - वार्ता -
पुणे जिल्ह्यातील नळावणे खंडोबा मंदिर व अहमदनगर जिल्ह्यातील अकलापूर येथील दत्त मंदिरात चोरी करणारे सराईत चोरट्यांना आळेफाटा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचेकडून 10 लाख रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे."
सचिन गंगाधर जाधव (रा. औरंगाबाद), किरण सुनिल दुधवडे (रा.अकलापूर, ता. संगमनेर जि. अहमदनगर), सुरेश पंढरीनाथ पथवे व सुनिल उमा पथवे (दोघेही रा. धामणगाव आवारी, ता. अकोले जि. अहमदनगर) व नवनाथ विजय पवार (रा. मांडवे, साकुर, ता. संगमनेर) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांच्यावर आळेफाटा, जुन्नर व घारगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये 9 गुन्हे दाखल आहेत.
जुन्नर तालुक्यातील नळावणे येथील खंडोबा मंदिर, रामेश्वर व जेजुरी लिंग मंदिरांत 19 जुलै रात्री साडे आठ ते 20 जुलै सकाळी साडे बारा वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दानपेटीसह अन्य साहित्य चोरून नेले होते. याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्या पथकाने तांत्रिकदृष्ट्या तपास करत औरंगाबाद येथील सचिन जाधव यास ताब्यात घेतले
त्यास विचारपूस केली असता वरील चार साथीदारांच्या सहाय्याने नळावणे व अकलापूर मंदिरांत चोरी केल्याचे कबुली त्यांनी दिली. त्यांचेकडून मंदिर चोरीतील घंटा, स्पिकर सेट, समई, आरतीचे ताट, पिंपळवंडी येथील अंगणवाडी चोरीतील टिव्ही युनिट, गॅस टाकी, शेगडी, गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी, एक चारचाकी असा एकूण 10 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अधिक तपास आळेफाटा पोलीस करतआहे
=================================
------------------------------------------------
: - संकलन - गझनफर पठाण - ✍️✅️🇮🇳...
------------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment