पुणे - प्रतिनिधि - वार्ता -
लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देता ते तुमच्यासमोर खड्डे आणि इतर सगळे प्रश्न निर्माण करतात. तुम्ही प्रत्येकवेळी त्याच त्याच लोकांना निवडून देता. जातीच्या नावावर, कधी धर्माच्या नावावर कधी अजून काही. त्यामुळे हे प्रश्न खरपड पडले आहेत, सुटणारच नाहीत. जोपर्यंत लोकांमधील रोष मतपेटीत उतरत नाही, तोपर्यंत रस्त्यावरचे खड्डे बुजणार नाहीत, असे परखड मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ठाकरे म्हणाले, पुणे शहर वाढले; परंतु शहराचे टाऊन
प्लॅनिंगच झालेले नाही. यामुळे पुणे शहरात १५ ते २० मिनिटांच्या प्रवासासाठी तासभर लागतो. टाऊन प्लॅनिंग मुंबईत इंग्रजांनी केलेले आहे. त्यानंतर आपल्या राज्यकर्त्यांनी शहरांचा आराखडाच केला नाही. यामुळे हे प्रश्न निर्माण झाले आहेत. आज पुणे कुठून कुठे पसरत आहे, निवडणुका कधी होणार?
राज्यातील अनेक महापालिकांमध्ये प्रशासक राज्य आहे. याबाबत राज ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, आपल्याकडे कायदा नावाची काहीच गोष्ट राहिलेली नाही. निवडणुका कधी होणार तर आम्हाला वाटेल तेव्हा होणार, असे सध्या राज्यात चित्र आहे. इतकी वर्षे काय बाकीचे कारण नव्हते का, असा प्रश्न यावेळी राज ठाकरे यांनी केला.
कोणालाच माहीत नाही. सध्या मतदार चाढवा, मतदान करून घ्या, बाकीचे गेले
खड्ड्यात, असे चित्र आहे. आजपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेक विषयांवर अनेकदा आंदोलने केली. पदरी काय पडले? जे महाराष्ट्राचे नुकसान करतात अशा लोकांना तुम्ही निवडून देता? मला याचेच जास्त आश्चर्य वाटते, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.
मनसेच्या वतीने सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीत आंदोलन सुरू आहे. कार्यकत्यांना सांगितले आहे की, सगळ्या ठिकाणी तोडफोड करण्याची गरज नसते. लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. मात्र, आक्रमकपणे महाराष्ट्र सैनिक उतरणार हे स्वाभाविक आहे, असे स्पष्ट मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
=================================
------------------------------------------------
: - उप,संपादक-अवकाश म्हेत्रे-शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
------------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment