श्रीरामपूर- प्रतिनिधि - वार्ता
कॉंग्रेस सेवा दलाचे मुख्य जिल्हा समन्वयक मास्टर सरवरअली सय्यद यांनी कॉंग्रेस सेवा दलाचे राज्यस्तरीय तथा राष्ट्रीय प्रशिक्षण शिबीर (एस.टी.सी. व एन.टी.सी.) यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल अहमदनगर जिल्हा कॉंग्रेस चे मा.अध्यक्ष तथा एडीसीसी बैंकेचे विद्यमान संचालक करणदादा ससाणे आणी कॉंग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष सुरेश झावरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
श्री.सय्यद यांची कॉंग्रेस सेवा दलाच्या प्रती असलेली निष्ठा ही अनेकांना एकनिष्ठतेचे उदाहरण देवून जाते,त्यांनी कॉंग्रेस सेवा दलामध्ये आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले असून कधी कोणत्याच मोह आणी पदाला त्यांनी महत्व दिले नाही, एकनिष्ठतेने सेवादलाचे कामे करणे,जनसामान्यांच्या ज्वलंत प्रश्नांचा निपटारा करणेकामी पुढाकार घेणे ही त्यांची तशी दररोजचीच कामे,अशी समाजसेवा आणी समाजसेवक आजकाल फार क्वचितच बढावयास मिळतात त्यातीलच एक समाजसेवक म्हणजे मास्टर सरवरअली सय्यद होय.
म्हणून अशा आपल्या स्वर्तृत्व आणी परोपकारी पारदर्शी कार्यांच्या बळावर श्री.सय्यद हे केवळ श्रीरामपूर शहर किंवा तालुकाच नव्हेतर जिल्हा आणी राज्यात सर्वांना सुपरिचित आहेत.
त्यांच्या या सत्काराप्रसंगी
कॉंग्रेस सेवा दलाचे नुतन तालुकाध्यक्ष शब्बीरभाई शेख, शहराध्यक्ष रावसाहेब अल्हाट, शहर कार्याध्यक्ष रफिभाई शेख,
सामाजिक कार्यकर्ते जमीलभाई शहा आदि मान्यवरांसह कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
===================================
---------------------------------------------------
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment