राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, September 30, 2023

*अशोकनगर पोलीस चौकीच्या वतीने उत्कृष्ठ गणेश मंडळांचा सन्मान सोहळा संपन्न*🌹🥀🌺🌷🌸🙏❤️ ✅ 🇮🇳


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

*इम्रान शेख - श्रीरामपुर:*
येथील शहर पोलीस स्टेशन अंकीत अशोकनगर पोलीस चौकी हद्दीमध्ये निपाणी वडगांव, शिरसगांव, वडाळा महादेव, मातापुर, ब्राम्हणगांव वेताळ व अशोकनगर अशा गावांमध्ये सार्वजनिक गणेश उत्सवात एकुण ३४ गणेश मंडळानी सहभाग घेवुन गणेश स्थापना केली होती. सदर मंडळांना प्रोत्साहन देण्याकरीता पोलीस प्रशासन व गणेश मंडळ यांचेत समन्वय राहुन कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी. तसेच गणेश मंडळांच्या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत त्यांचे हातातून चांगले कार्य व्हावे.
या करीता अशोकनगर पोलीस चौकीकडुन प्रथम ०३ उत्कृष्ट मंडळ व ०३ उत्तेजनार्थ मंडळाची निवड करुन त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्याची संकल्पना राबविण्यात येते. तसेच ज्या गणपती मंडळानी प्रशासनाची परवानगी घेणे, तसेच शासनाच्या घालून दिलेल्या अटी शर्तीचे पालन करुन प्रशासनास सहकार्य केल्याबद्दल त्यांना देखील प्रमाणपत्र देण्यात येते.
सार्वजनिक गणेश उत्सव सन २०२३ मध्ये उत्कृष्ट सार्वजनिक काम केल्याबाबत त्यांचा सन्मान सोहळा दि. ३० (सप्टेंबर) रोजी अशोकनगर पोलीस चौकी हरेगांव फाटा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे व श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे शुभहस्ते उत्कृष्ट काम करणा-या गणेश मंडळांना पारितोषिके वितरण करण्यात आले. त्यामध्ये प्रथम क्रमांक जयदंबा माता मित्र मंडळ, अशोकनगर, द्वितीय क्रमांक लक्ष्मीमाता मित्र मंडळ, लक्ष्मीनगर, वडाळा महादेव, तृतीय क्रमांक शिलोदा मित्र मंडळ निपाणी वडगांव, उत्तेजनार्थ क्रमांक १ अष्टविनायक मित्र मंडळ शिरसगांव, उत्तेजनार्थ क्रमांक २ मंगलमुर्ती बाल गणेश मंडळ, मातापुर व उत्तेजनार्थ क्रमांक ३ राजे शिवछत्रपती मित्र मंडळ निपाणी वडगांव यांना सन्मानित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमास अशोकनगर बीट हद्दीतील सर्व गावांमधील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, सर्व गणपती मंडळाचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित राहीले आहेत. 
सदर मंडळांनी यापुढे देखील अशाच प्रकारे शासनाचे ठरवून दिलेल्या सुचना व नियमांचे काटेकोरपणे पालन करत धार्मिक कार्यक्रम साजरे करुत सार्वजनिक शांतता अबाधित ठेवण्याचे काम करेल, यांना पोलीस प्रशासनाकडुन अशाच प्रकारे सन्मानित करण्यात येईल असे यावेळी आश्वाशित केले.
सदर गणेश मंडळ सन्मान सोहळा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, यांचे प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली तसेच अशोकनगर पोलीस चौकीचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक दादाभाई मगरे, पोहेकॉ. संतोष परदेशी, पोना. मच्छिंद्र शेलार, पोना. किरण टेकाळे, पोकों. वसीम इनामदार, पोकों. प्रविण कांबळे, होमगार्ड राजेंद्र देसाई यांनी आजोजित केला होता. त्यास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

===================================
---------------------------------------------------
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

नवं व्यंगचित्र चर्चेत, राज ठाकरेंचं खास संदेश देत म्हणाले “'आम्ही जातीय विद्वेषात...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नवं व्यंगचित्र चर्चेत आलं आहे.
मुंबई - प्रतिनिधि - वार्ता -
मराठी असल्याने मुलुंडमध्ये तृप्ती देवरुखकर यांना जागा नाकारल्याच्या घटनेचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी या वादात उडी घेतली. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान, तृप्ती देवरुखकर यांनी गुरुवारी मध्यरात्री मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पिता-पुत्राविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यानंतर या दोघांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

या सर्व घडामोडीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढत मराठी अस्मितेला हात घातला आहे. मराठी अस्मिता कशी ठिगळं लावलेली आहे, हे व्यंगचित्रातून दाखवण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरेंनी व्यंगचित्रात तमिळ, पंजाबी, गुजराती, बंगाली अस्मिता दर्शवणाऱ्या महिलांचं चित्र रेखाटलं आहे. तर मराठी अस्मिता दर्शवणारी महिला मात्र ठिगळं जोडलेली साडी नेसल्याचं दाखवलं आहे. मराठी अस्मिता ब्राह्मण, आगरी, माळी, मराठा, दलित, मातंग, वंजारी आणि इतर जातींमध्ये कशी विभागली आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी केला आहे.
राज ठाकरेंचं व्यंगचित्र ‘एक्स’वर (ट्विटर) शेअर करत मनसेनं म्हटलं की, राजधानी हातातून गेली कि राज्य गेलं. आज महाराष्ट्राची राजधानी मराठी माणसांना जेरीस आणून हातातून हिसकावून घेतली जात आहे, पण तरीही आम्ही एकसंध मराठी समाज म्हणून लढायला तयार नाही. मराठीमाणूस आम्ही जातीय विद्वेषात गुरफटलो आहोत.

=================================
------------------------------------------------
: - सह, संपादक - रंजित बतरा - शब्द...✍️✅️🇮🇳... रचना संकलन वार्ता...
------------------------------------------------
=================================







Friday, September 29, 2023

*रेल्वे प्रशासनाने लोकांची घरे आणि दुकाने**काढल्यास सर्वपक्षीय रेल्वे रोको आंदोलन*


श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता

रेल्वे प्रशासनाने श्रीरामपूर शहरातील उत्तर आणि दक्षिण बाजूस गेली पन्नास वर्षापासून राहत असलेल्या लोकांना जागा खाली करण्याबाबत पी पी ई नुसार शोकेस नोटीस  बजावली आहे.
लोकांची घरे व दुकाने काढल्यास कुटुंबाचे कुटुंब बेघर होऊन रस्त्यावर येत देशोधडीला लागतील करीता याची सर्व राजकीय पक्ष, संघटनांनी गंभीर दखल घेऊन श्रीरामपूर रेल्वे स्टेशन प्रबंधक एम.पी.पांडे यांच्याकडे सोलापूर डिव्हिजन रेल्वे प्रशासला देण्यासाठी निवेदन दिले,याप्रसंगी रेल्वे पोलीस उपनिरीक्षक विद्याशूसिंह, कॉन्स्टेबल एम.बी. तायडे उपस्थित होते.
सदरील निवेदनात असे म्हटले आहे की, गेली पन्नास वर्षापासून अधीक काळापासून सदरील जागेत लोकांची घरे आणी दुकाने असुन काहींचे एन. ए. लेआऊट प्लॉट आहेत, तरी देखील रेल्वे प्रशासनाने त्यांना नोटिसा वाजवून घरे व दुकाने काढण्यास सांगितले आहे. सदरील लोकांवर अन्याय झाल्यास लवकरच सर्वपक्षीय मिटिंग घेवून सर्वपक्षीय रेल रोको आंदोलन करण्याचाइशारा देण्यात आला आहे.
तसेच लवकरच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव,अंबादास दानवे यांची सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेट घेऊन बेलापूर श्रीरामपूरच्या या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करणार आहे.
सदरील निवेदनावर रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर,शिवसेना (शिंदे गट)  युवा सेना जिल्हाध्यक्ष शुभम वाघ, भाजपा शहराध्यक्ष मारुती बिंगले, वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष चरण त्रिभुवन, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजीत लिपटे, बी.आर.एस. चे समन्वयक प्रवीण फरगडे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष मोकळ, अ.भा.लहुजी सेनेचे राष्ट्रीय महासचिव हनीफभाई पठाण, रिपाई (ए) चे युवक जिल्हाध्यक्ष रॉकी लोंढे ,बाळासाहेब बागुल, बसपाचे जिल्हाध्यक्ष सुनील मगर, शिवसेना (उबाठा) सचिन बडदे, आरपीआयचे कार्याध्यक्ष अंतोन शेळके, सामाजिक कार्यकर्ते योगेश जाधव,भीमशक्तीचे शहराध्यक्ष अंबादास निकाळजे, लकी सेठी, राजेश वाव्हळ , महादेव होवळ,अरुण सनी बारसे खंडीझोड आदि उपस्थित होते.

===================================
---------------------------------------------------
*सहयोगी:*
पत्रकार दीपक कदम -श्रीरामपूर 
*संकलन:* ✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

*अशोक आयडियल स्कूलची विद्यार्थिनी कु.ज्ञानश्री लांडगे राष्ट्रीय पातळीवरील आर्चरी स्पर्धेत प्रथम!*🌹🥀🌺🌷🌸🙏❤️ ✅ 🇮🇳


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता
अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले अशोक आयडियल स्कूलची (सी.बी.एस.ई.) विद्यार्थिनी कु.ज्ञानश्री नंदकुमार लांडगे हिने ३० मीटर आर्चरी प्रकारामध्ये यश मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच ४० मीटर अंतराच्या इंडियन बो या प्रकारात तिने देशात द्वितीय क्रमांक पटकावला. तिची आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेकरिता निवड झाल्याबद्दल माजी आ. भानुदास मुरकुटे यांचे हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.  
          राष्ट्रीय खेळ परिषद अंतर्गत राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, दिल्ली येथे सदर स्पर्धेचे आयोजन केले होते. यापूर्वीही कु.ज्ञानश्री लांडगे हिने राज्य पातळीवर पारितोषिके मिळवली आहेत. खेळाच्या माध्यमातून आपण आपले अस्तित्व निर्माण करू शकतो, अशी प्रेरणा श्री.मुरकुटे हे नेहमी विद्यार्थ्यांना देत असतात. हीच प्रेरणा घेऊन कु.ज्ञानश्री लांडगे ही विद्यार्थीनी आज राष्ट्रीय पातळीवर खेळत आहे. अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ. मंजुश्रीताई मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक आयडियल स्कूल नेहमी विद्यार्थ्यांच्या बाबतीत विविध खेळांमध्ये प्रयत्नशील राहून यश संपादन करत आहे.
          कु.ज्ञानश्री लांडगे हिचे यशाबद्दल अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे, व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे, उपाध्यक्ष योगेश विटनोर, सचिव सोपानराव राऊत, कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, ॲग्रो इंडस्ट्रीज एज्युकेशन व डेव्हलपमेंट फाउंडेशनचे उपाध्यक्ष बाबासाहेब आदिक, सचिव विरेश गलांडे, अशोक बँकेचे चेअरमन ॲड्.सुभाष चौधरी, व्हा. चेअरमन भाऊसाहेब हाळनोर, कारखान्याचे संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे. कु.ज्ञानश्री हिस स्कूलचे प्राचार्य रईस शेख व क्रीडा शिक्षक आसिफ पठाण यांचे मार्गदर्शन लाभले.

===================================
---------------------------------------------------
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

*जिल्ह्यात १२ ऑक्टोबरपर्यंत* *प्रतिबंधात्मक आदेश लागू*


अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:

जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३७ (१) व ३७(३) अन्वये १२ ऑक्टोबर २०२३ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
    या आदेशानुसार नमूद कालावधीत कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे.  
            शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणे. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, ध्वनीवर्धक किंवा ध्वनीक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो जसाच्या तसा ऐकवणारे उपकरण संच वापरणे किंवा वाजवणे, सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोचेल किंवा शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे, आवेशपुर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणने अगर तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे. सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्य कारणास्तव सभा घेण्यास, मिरवणुका काढण्यास व पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई केली आहे. 
  शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्य पूर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे, 
तसेच प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, धार्मिक मिरवणूका, लग्न समारंभ, लग्नाच्या मिरवणूका हे कार्यक्रम, सभा घेण्यास अथवा मिरवणूका काढण्यास ज्यांनी संबंधित प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची रितसर परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना हा आदेश लागु राहणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

===================================
---------------------------------------------------
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================


Thursday, September 28, 2023

*स्वाभिमानी संपादक सेवा संघाच्यावतीने ****राज्यभरातील लघु वर्तमानपत्र संपादकांची बैठक आणि पदवाटप समारंभाचे आयोजन*🌹🥀🌺🌷🌸🙏❤️ ✅ 🇮🇳...


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

*रविवार दि.२६ नोव्हेंबर २०२३ या संविधान दिनी संपादकांचा राज्यव्यापी महामेळावा*

*अजिजभाई शेख - राहाता*
स्वाभिमानी संपादक सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश या लघु वर्तमानपत्र संपादकांच्या नोंदणीकृत राज्यव्यापी संघटनेची संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक ३० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११,०० वाजता श्रीरामपूर येथील कॉलेज रोडवरील समता कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूट याठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे प्रदेश महासचिव ॲड. मोहसिन शौकत शेख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली.
या बैठकीत राज्यभरातील लघु वर्तमानपत्र संपादकांच्या विविध आडचणी आणी त्यावरील उपाय योजना,शासन दरबारी करण्यात येणारा कागदपत्रांचा योग्य पाठपुरावा यासह राज्याच्या प्रत्येक जिल्हा,तालुका,शहर आदि ठिकाणी स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष अशी पदे वाटप करण्यासंदर्भात सोबतच संपादक संघाच्यावतीने रविवार दि.२६ नोव्हेंबर २०२३ या संविधान दिनी घेण्यात येत असलेल्या राज्यव्यापी संपादक महामेळाव्याची रुपरेषा ठरवली जाणार आहे,तसेच ई-पेपर्स, नवीन वर्तमानपत्र,नवीन न्यूज पोर्टल,नवीन यूट्यूब चॅनल्स सुरु करु इच्छिणाऱ्या नवोदित पत्रकार /संपादकांसाठी त्यांच्या प्रसार माध्यमांकरीता *(वर्तमानपत्र अंक डीटीपी - कलर पीडीएफ / यूट्यूब न्यूज चॅनल्ससाठी निवेदकासह व्हिडिओ न्यूज एडिटिंग बातम्या / ई-पेपर्स / न्यूज पोर्टल्स आदि. सेवा)*
आवश्यक सेवा सुविधा सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, करीता बैठकीत नवोदित संपादक / वार्ताहरांनी जास्तीत जास्त संख्येने आपला सहभाग नोंदवावा असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
सदरील बैठकीसाठी उपस्थित राहु इच्छिणाऱ्या (स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे सभासद नसलेल्या) नवोदित संपादक / वार्ताहर यांनी प्रथमतः 9561174111 या व्हॅटसॲप क्रमांकावर आपले नांव,गांव,पत्ता मोबाईल क्रमांक/ ई- मेल आयडी आणी वर नमूद बाबत हवी असलेली समस्या/सेवा/ सुविधा/
कळविणे आवश्यक आहे.
तसेच स्वाभिमानी संपादक सेवा संघ या संस्थेच्या शहर/तालुका/ जिल्हास्तरीय पदाधिकारी निवडीत, नियमित प्रसारित होणाऱ्या प्रसार माध्यमांच्या संपादकांनाच स्थान मिळणार आहे,ज्यांचे प्रसार माध्यमे हे नियमितपणे प्रकाशित होत आहेत,अथवा ते आपली प्रसार माध्यमे नियमितपणे प्रकाशित करु इच्छितात त्यांच्यासाठीच या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले असल्याचेही शेवटी या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

===================================
---------------------------------------------------
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

*राष्ट्रभाषा हिंदी सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी भाषा आहे- डॉ.उत्तम येवले*🌹🥀🌺🌷🌸🙏❤️ ✅ 🇮🇳


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

बेलापूर - प्रतिनिधि - वार्ता -
राष्ट्रभाषा हिंदी ही सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजणारी भाषा आहे असे उद्गार कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कोल्हारचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. उत्तम येवले यांनी काढले.
हिंदी विभाग, वाणिज्य विभाग, वाड.मय विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रभाषा हिंदी दिवस, नाटिका सादरीकरण, मंडळ उद्घाटन आणि इंडक्शन प्रोग्राम या कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे असेही म्हणाले की हिंदी ही भारताची प्रमुख भाषा आहे.पुढे त्यांनी राष्ट्रभाषेचा प्रचार ,प्रसार आणि महत्त्व विषद केले. या भाषेने माध्यमातून कार्यालयीन कामकाज, प्रशासकीय कामकाज, मोबाईल व कॉम्प्युटरमध्ये आपला जम बसवला आहे.या भाषेत बैंक रेलवेच्या भरती परीक्षेचे आयोजन केले जाते, हे देखील सांगितले. हिंदी भाषा ही बहुप्रांतीय भाषा असून देखील या भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त आहे. परंतु बहुप्रांतीय लोक हिंदीतूनच व्यवहार करत असल्यामुळे ही भाषा राष्ट्रभाषा आहे. इतर भाषा संपूर्ण भारतात न बोलल्यामुळे त्यांचा विकास होऊ शकला नाही असे त्यांनी सांगितले.राष्ट्रभाषा हिंदी दिवसानिमित्त कॉलेज कट्ट्यावर "नारीशक्ती" नाटिका सादरीकरण केले.यात जया काळे, प्राजक्ता पुजारी, नेहा देवरे, वैष्णवी गाडे, तृप्ती म्हसे, अली शेख,साजेब बागवान, आकाश पारखे,तनुजा गाढे, रितेश जाधव यांनी अभिनय केला.सदर कार्यक्रमात वाड.मय मंडळ, वाणिज्य मंडळ, सांस्कृतिक मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच "बिल्वदल" या मराठी,हिंदी, इंग्रजी भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.याचे संपादन जया काळे,सिद्धाली नवले,अंकिता जगताप या विद्यार्थींनींनी केले. कार्यक्रमासाठी बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव अॅड.शरद सोमाणी, महाविद्यालयीन विकास समिती चेअरमन राजेश खटोड, विश्वस्त नंदुशेठ खटोड, मा. चंद्रशेखर डावरे, बापूसाहेब पुजारी ,भरत साळुंके,रविंद्र खटोड आदि उपस्थित होते .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो. डॉ. गुंफा कोकाटे यांनी भुषविले. या कार्यक्रमा अंतर्गत नंदुशेठ खटोड यांनी हिंदी भाषा ही प्रमुख भाषा असून या भाषे शिवाय पर्याय नाही असे सांगितले. चंद्रशेखर डावरे यांनी हिंदी भाषा ही अनेक राज्यामध्ये बोलली जाणारी एकमेव भाषा आहे असे उद्गार काढले . प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. बाळासाहेब बाचकर यांनी केला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सुनिता पठारे यांनी केले तर आभार प्रा.अमृता गायकवाड यांनी मानले.सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------------------------------------------
===================================
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561274111*
---------------------------------------------------
===================================

*विश्वनाथ निर्वाण यांनी शिर्डी लोकसभा किंवा* *श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करावी - गणपत घनदाट* 🌹🥀🌺🌷🌸 ❤️ ✅ 🇮🇳


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता 
माजी प्रशासकीय अधिकारी तथा कॅफो महावितरण श्री. विश्वनाथ निर्वाण यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघ अथवा श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करावी अशी जनसामान्यांतून मागणी होत असल्याचे गणपत घनदाट यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मागासवर्गीय, बहुजन समाज उच्चभू समाज त्यांच्या पाठीशी एकवटेल, सर्व समाजाचे सक्षमपणे नेतृत्व करून त्यांना न्याय देण्याचे काम करणारे तळमळीचे समाजसेवक असलेले श्री.विश्वनाथ निर्माण (उर्फ -व्ही.एस.) यांनी शिर्डी लोकसभा किंवा श्रीरामपूर विधानसभा मतदान संघातून आपली उमेदवारी करावी, त्यांचे पाठीशी सर्व समाज नक्कीच उभा राहणार आहे,अशी त्यांची कार्य आहेतच.
तसा त्यांना याबाबत सर्व समाजातील लोकांनी पाठिंबा दर्शविलेला आहे,असे सामाजिक कार्यकर्ते गणपत घनदाट यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ त्यांचे मत व्यक्त केले.
सर्व समाज त्यांना मानत असल्याने महावितरणच्या माध्यमातून त्यांनी तळागाळातील सर्व समाजातील संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील कामे केली आहे. अनेक बेरोजगारांना रोजगार दिलेला आहे. त्यांना कामाचा ३५ वर्ष प्रगत्ब अनुभव व सामाजिक बांधिलकीने त्यांनी केलेल्या कार्याचा सर्व बहुजन समाज साक्षीदार आहे. श्री. निर्वाण यांनी कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी करावी. त्यांच्या पाठीशी संपूर्ण समाज उभा राहणार आहे. शिर्डी मतदार संघात सक्षम उमेदवार अथवा श्रीरामपूर विधानसभेला सक्षम उमेदवार न मिळाल्याने सर्वांचा विकास थांबला आहे. सर्वांना घेऊन चालणारा एकमेव माणूस म्हणजे श्री.निर्वाण होय, केंद्रातील / राज्यातील लोकभिमुख योजना कशा आणाव्यात त्यांच्या कडून शिकावे. त्यांच्या कार्यास सलाम जिल्ह्यातील नव्हे. महाराष्ट्रातील बेरोजगारांना रोजगार दिले आहे. त्यांना कोणत्याही क्षेत्रातील काम सांगितले कोणत्याही माणसाचे तरी काम फत्ते होतेच असे स्वकर्तृत्व कार्यबळावरील अफलातून माणूस म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे,यासाठी त्यांनी आता राजकारणाच्या मैदानात उतरुन आपले कार्यांना अधीक गती द्यावी असेही घनघाट शेवटी म्हणाले.

===================================
---------------------------------------------------
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

*रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरीता ३० तारखेला होणाऱ्या मोर्च्यात बहुसंख्येने**उपस्थित राहण्याचे घर बचाव संघर्ष समितीचे आवाहन*


श्रीरामपूर -  प्रतिनिधि - वार्ता -

श्रीरामपूर शहराच्या मध्येभागातून रेल्वेलाईन गेलेली असल्याने रेल्वेलाईनमुळे शहर दोन भागात विखुरले गेले आहे,सध्या रेल्वेचे विकासकामे ही युद्धपातळीवर सुरु असुन रेल्वे रुळांचा विस्तार केला जात असल्याने रेल्वे खात्याने शहरातील रेल्वेलाईनच्या उत्तर आणि दक्षिणेस असलेल्या घर आणी दुकानांनी जागा मोकळी करण्याकामी (पी.पी.ई.नुसार) नोटीसा धाडल्या असल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत नुकतेच येथील व्हीआयपी रेस्ट हाऊसवर घर बचाव संघर्ष समिती आयोजित सर्वपक्षीय कार्यकर्ते, पत्रकार, समाजसेवक आणी संबंधीत घर/ दुकानदार यांची मिटिंग संपन्न झाली.त्यात ठरल्या प्रमाणे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरीता
येत्या ३० सप्टेंबर रोजी येथील रेल्वे स्टेशन जवळील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून भव्य मोर्चा काढला जाणार आहे,यासाठी घर बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी संबंधित परिसरातील घर,घर दुकाने,दुकाने जावून घर बचाव संघर्ष समितीची भुमिका आणी ३० तारखेच्या होणाऱ्या मोर्चा चे आयोजन याबाबत सविस्तर माहिती देत आहे. तथा या मोर्चात नागरीकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे घर बचाव संघर्ष समितीच्यावतीने अवाहनही करण्यात आले आहे.
घर बचाव संघर्ष समितीद्वारे रेल्वेच्या (उत्तर/दक्षिण) दोन्ही बाजूच्या नागरिकांना सूचित करण्यात येते की, रेल्वे प्रशासनाने उत्तर बाजू १२५ मिटर व दक्षिण बाजू ९१ मीटर अशी आपली हद्द दर्शविली व सांगितलेली आहे, त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून सूतगिरणी फाटका पासून ते डॉ. कुटे हॉस्पिटल (उड्डाणपूल) पर्यंत सर्वांना नोटिसा द्यायचे काम चालू आहे, डॉ. कुटे हॉस्पिटल परिसर आणि मार्केट कमिटी समोरील परिसर जरी काही लोकांना नोटीसा मिळाल्या नसल्यातरी त्या आज ना उद्या मिळणारच आहेत,त्यामुळे शनिवार दि. ३० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता होत असलेल्या या मोर्चात न चुकता हजर रहावे, येतानी नोटिसची झेरॉक्स प्रत सोबत आणावी, हा प्रश्न सर्व घरांचा आणि दुकानांचा व्यापाऱ्यांचा, खाजगीजागा मालकांचा आहे, तरी मोर्चासाठी सर्व नागरीकांनी आवर्जून उपस्थीत रहावे असेही घर बचाव संघर्ष समितीच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

===================================
---------------------------------------------------
*सहयोगी:*✍️✅🇮🇳...
जाफरभाई शाह - श्रीरामपूर 
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

*शिर्डी शहरात ना. राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटना, जनेश्वर प्रतिष्ठाणची भव्य गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न*🌹🥀🌺🌷🌸🙏❤️ ✅ 🇮🇳

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*राजेंद्र बनकर - शिर्डी*

ना.राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटना प्रणित जीप चालक मालक संघटना, जनेश्वर प्रतिष्ठाण शिर्डी च्या वतीने आयोजित गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
साईआश्रम धर्मशाळा एक हजार रुमसमोर यावेळी रथातुन गणरायाची मिरवणूक निघाली असताना डिजेच्या तालावर तरुणाईसह अबालवृद्ध आणि साईभक्तांनीही थिरकण्याचा मनमुराद आनंद यावेळी लुटला. गेल्या १३ वर्षापासून साईआश्रम धर्मशाळा परिसरात गणेशोत्सव साजरा करण्यात येत असुन या उत्सवानिमित्त शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या शुभहस्ते महाआरती तसेच सामाजिक उपक्रम घेतले जात असुन संघटनेच्या माध्यमातून साईभक्तांंची अविरत सेवा करण्याचे कार्य होत असल्याचे संघटनेचे संस्थापक प्रशांत कोते,अध्यक्ष रविंद्र शेळके यांनी सांगितले. तर प्रशांत कोते यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो युवकांचे संघटन झाले असुन शिर्डी शहरातील सामाजिक धार्मिक कार्यात रिक्षा संघटनेतील सदस्य तसेच जीप चालक मालक संघटनेतील सदस्य साईभक्तांची शक्य ती सेवा करण्याचे कार्य करत असुन आज गणेशोत्सवा निमित्त उपस्थित संख्या ही त्यांच्या कुशल नेतृत्वाची पावती असल्याचे प्रा.प्रसाद कोते यांनी स्पष्ट केले. हा गणेश विसर्जन सोहळा यशस्वी करण्यासाठी ना.राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटना,जीप चालक मालक संघटना,जनेश्वर प्रतिष्ठाण च्या कार्येकर्त्यांनी परिश्रम घेतले.
===================================
---------------------------------------------------
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================


*दि.२८ ते ३० सप्टेंबर जिल्ह्यात ऍलो अलर्ट**अहमदनगर जिल्ह्यात वीजेच्या कडकडाटांसह* *वादळ,वारे आणी मध्यम पावसाची शक्यता, नागरीकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे अवाहन*

अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:
दिनांक २८ ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत अहमदनगर जिल्ह्यात वीजांच्‍या कडकडाटांसह वादळी वारा व मध्‍यम स्‍वरुपाचा पाऊस होण्‍याची शक्‍यता वर्तविण्‍यात आलेली असून अहमदनगर जिल्‍ह्यासाठी ''येलो अलर्ट'' जारी करण्‍यात आलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्‍हा प्रशासनातर्फे जिल्‍ह्यातील तमाम नागरीकांना खालीलप्रमाणे दक्षता घेणेबाबत आवाहन करण्यात आले आहे.

अपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन प्रशासनातर्फे
अहमदनगर जिल्ह्यातील नागरीकांना कळविणेत येते की, भारतीय हवामान खात्‍याद्वारे निर्गमित संदेशानुसार अहमदनगर जिल्‍ह्यात दि. २८/०९/२०२ ते दि. ३०/०९/२०२३ या कालावधीत वीजांच्‍या कडकडाटांसह वादळी वारा व मध्‍यम स्‍वरुपाचा पाऊस होण्‍याची शक्‍यता वर्तविण्‍यात आलेली असून अहमदनगर जिल्‍ह्यासाठी ''येलो अलर्ट'' जारी करण्‍यात आलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्‍हा प्रशासनातर्फे जिल्‍ह्यातील तमाम नागरीकांना खालीलप्रमाणे दक्षता घेणेबाबत आवाहन करण्‍यात येत आहे.

१) मेघगर्जनेच्‍या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा.  

२) गडगडाटीच्‍या वादळादरम्‍यान व वीजा चमकतांना कोणत्‍याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्‍या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्‍टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/सायकल यांचेपासून दूर रहावे.

३) मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्‍वजांचे खांब, विद्युत / दिव्‍यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉंन्‍सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्‍या अधांतरी लटकणा-या / लोंबणा-या केबल्‍स् पासून दूर रहावे. 

४) वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्‍यास सुरक्षेसाठी गुडघ्‍यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्‍ही गुडघ्‍यांच्‍यामध्‍ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.

५) स्‍थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्‍या सुचनांचे पालन करावे. सखल भागात राहणा-या नागरीकांना तातडीने सुरक्षित स्‍थळी स्‍थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्‍याकाठच्‍या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्‍यास नागरिकांनी नदीपात्रातुन तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षित स्‍थळी स्‍थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्‍यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्‍यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्‍यासाठी गर्दी करू नये.

६) जुनाट/मोडकळीस आलेल्‍या व धोकादायक इमारतीमध्‍ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्‍टीमुळे भूस्‍खलन होण्‍याची व दरडी कोसळण्‍याची शक्‍यता असते. त्‍यादृष्‍टीने डोंगराच्‍या पायथ्‍याशी राहणा-या लोकांनी दक्षता घ्‍यावी. वेळीच सुरक्षित स्‍थळी स्‍थलांतर करावे. घाट रस्‍त्‍याने प्रवास करणे शक्‍यतो टाळावे.

७) धरण व नदीक्षेत्रामध्‍ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्‍यावी. नदीच्‍या पाण्‍याच्‍या प्रवाहामध्‍ये चढू अथवा उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्‍फी (Selfie) काढू नये.
सर्व नागरीकांनी वादळी वारे, वीज, गारपीट आणि पाऊस यापासून स्‍वत:सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्‍य ती दक्षता घ्‍यावी. आपत्‍कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्‍टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्‍हा नियंत्रण कक्ष, जिल्‍हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दुरध्‍वनी क्र.1077 (टोल फ्री), 0241-2323844 वा 2356940 वर संपर्क साधावा. असे अपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

===================================
---------------------------------------------------
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

*३० सप्टेंबर रोजी शिर्डी येथे अ.भा.मराठा महासंघाची वार्षिक सभा आणी मेळाव्याचे आयोजन*

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*मराठा समाजातील युवा उद्योजक, शेतकरी, विद्यार्थी व महिला भगिणींनी उपस्थित राहण्याचे आवाहन*

*अजिजभाई शेख - राहाता*
शनिवार, दि. ३० सप्टेंबर २०२३ रोजी शिर्डी येथे स्टेशन रोड साईनगर येथील सप्तपदी लॉन्स याठिकाणी अखिल भारतीय मराठा महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा, युवा उद्योजक, शेतकरी व विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश देशमुख यांनी दिली आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे २०२३ ची वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे तर मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील हे राहणार आहेत. तर कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष विनायक पवार, वसंतराव मुळीक, राष्ट्रीय खजिनदार प्रमोद जाधव, राष्ट्रीय चिटणीस गुलाब गायकवाड, युवा प्रतिनिधी आतिष गायकवाड, महिला प्रतिनिधी भारती पाटील यांच्यासह विभागीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या सभेसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व सारथी संस्थेच्या विविध योजनांचा युवा उद्योजक, शेतकरी व विद्यार्थी मार्गदर्शन मेळावा होईल. तसेच जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा मराठा भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल तसेच नवीन पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे. 
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने मराठा समाजातील युवा उद्योजक, शेतकरी, विद्यार्थी व महिला भगिणींनी उपस्थित राहण्याचे आवाहन लालूशेठ दळवी, उत्तर जिल्हाध्यक्ष प्रकाश निर्मळ, दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवाजी डौले, सरचिटणीस रमेश बोरूडे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भाऊसाहेब वाकचौरे आदींसह जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी केले आहे.

===================================
---------------------------------------------------
*सहयोगी:*
पत्रकार रमेशराव बोरुडे - राहुरी 
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर *-9561174111*
---------------------------------------------------
===================================

Wednesday, September 27, 2023

मानवता संदेश फाउंडेशन तर्फे राज्य शासनास धन्यवाद *ईद-ए-मिलाद ची सुट्टी जाहीर केल्याबद्दल 🌹🥀🌺🌷🌸🙏❤️ ✅ 🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर -  प्रतिनिधि - वार्ता -

 हिंदू धर्मियांची अनंत चतुर्दशी (गणेश विसर्जन) व मुस्लिम धर्मियांचा ईद-ए- मिलादुन्नबी (प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर जयंती) हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्यामुळे एकच सुट्टी देण्यात आली होती. दोन्ही सणाच्या मोठ्या मिरवणुका सर्वत्र निघतात. त्यामुळे यावर्षी अनंत चतुर्दशी ('गणेश विसर्जन) च्या दिवशी मिरवणूक न काढता दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढण्याचा निर्णय राज्यातील मुस्लिम समाजाने घेतला होता. प्रेषित हजरत पैगंबर जयंती निमित्त राज्यभर मिरवणूक काढल्या जातात. त्यामध्ये सर्व मुस्लिम बांधव व बालगोपाल मोठ्या संख्येने सामील होतात. परंतु दुसऱ्या दिवशी सुट्टी नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत ईद-ए-मिलाद ची सुट्टी शुक्रवारी देण्यात यावी अशी मागणी राज्यभरातील मुस्लिम संघटनांनी शासनाकडे केली होती. राज्यातील सौहार्दाचे वातावरण टिकविण्यासाठी मुस्लिम बांधवांनी ईद-ए- मिलादची मिरवणूक दुसऱ्या दिवशी शुक्रवारी काढण्याचा निर्णय घेतल्याबद्दल शासनाने देखील मुस्लिम समाजाला धन्यवाद दिले होते. मुस्लिम बांधवांच्या भावनांची दखल घेऊन राज्य शासनाने ईद-ए-मिलादची सुट्टी उद्या शुक्रवारी जाहीर केल्याबद्दल येथील मानवता संदेश फाउंडेशनने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व सर्व शासनाला मनःपूर्वक धन्यवाद दिले आहेत.
ज्याप्रमाणे मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांच्या भावनांची दखल घेत अनंत चतुर्दशी (गणेश विसर्जन) च्या दिवशी पैगंबर जयंतीची मिरवणूक पहिल्या दिवशी न काढता दुसऱ्या दिवशी काढण्याचा निर्णय घेतला होता व याबाबत शासनास देखील कळविले होते. तसेच हिंदू बांधवांनी देखील मुस्लिम समाजाच्या या निर्णयाचे व्यापक प्रमाणात स्वागत केले होते. राज्यातील धार्मिक सलोख्याचे वातावरण कायम राहण्यासाठी दोन्ही समाजाच्या प्रमुख घटकांनी समजूतदारीची भूमिका घेऊन दोन्ही उत्सव शांततेने साजरे करण्याबाबत पुढाकार घेतला होता. राज्य शासनाने देखील जन्मताचा कौल लक्षात घेऊन आज अनंत चतुर्दशी (गणेश विसर्जन) व उद्या पैगंबर जयंतीची सुट्टी जाहीर केल्याबद्दल मानवता संदेश फाउंडेशन चे प्रमुख सलीमखान पठाण, नजीरमामू शेख, तनवीर शेख, खालीद मोमीन, हाजी सय्यद युसूफ,सय्यद इमाम, तोफिक शेख, अहमदभाई जहागीरदार, साजिद मिर्झा, मुक्तारभाई शाह, अझहर शेख,जाकीर सय्यद, बबलूभाई शेख, हुजेबखान पठाण, डॉक्टर सलीम शेख, इकबाल काकर, आरिफ पटेल, फारुक पटेल, याकूब शाह, अँडवोकेट समीन बागवान,अँड शफी शेख, सलाउद्दीन शेख, युसुफ लाखानी, रज्जाक पठाण, अजिज शेख, समीर शेख आदींनी राज्य शासनास धन्यवाद दिले आहेत.
अनंत चतुर्दशी (गणेश विसर्जन) व ईद-ए-मिलादची मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन देखील मानवता संदेश फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे.

===================================
---------------------------------------------------
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9562174111*
---------------------------------------------------
===================================





*समतेचा क्रांतीदुत**प्रेषित मुहम्मद पैगंबर स्व.*🌹🥀🌺🌷🌸 ❤️

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
 "तेरावे सद्दीची पैगंबरी खुप ! दावीतो प्रमाण कुराणातं !!
 जगी स्री पुरुष सत्यधर्मी होती !
   आनंद वतनी ज्योती म्हणे !! " समतेचे पुरस्कर्ते " महात्मा ज्योतिरावजी फुले .
     " एक ही सफमें खडे हो गयै , मेहमूद और अयाज ..!
ना कोई बंदा रहा ,ना बंदा नवाज. .!!"
जगप्रसिद्ध साहित्यिक ऊर्दू कवी डॉ.मुहम्मद इक्बाल सहाब.
    इतिहासाच्या कित्येक महान व्यक्तींनी ज्या महामानवाच्या कार्या , जीवनाविषयी , सामाजिक एकता विषयावर , क्रांतिकारक निर्णयावर /कित्येकदा स्तुती केली ,ज्ञात -अज्ञातपणे आपल्या कार्यात त्यांच्या विचारांचा अंगिकार करून आदर्श घेतला.
आशा महामानवाची आज जयंती व पुण्यतिथी सुध्दा.
  मी लिहीताना स्वतः निरक्षर असून ,अनाथ , विधवा , महिलांसाठी संवेदनशील , साक्षरतेचे व समतेचा पुरोगामी प्रेषित मुहम्मद सल्लमांचां उल्लेख करतो.
त्याचप्रमाणें पुरोगामी विचारांचे धगधगत्या मशाली चे महामानव च करतो . त्यांच्या पुरोगामी विचारांनी प्रभावित होऊन कित्येक संत ,पीर , बादशहा ,महान विचारवंत , विद्वान , समाजसुधारक या महात्म्यांनी आप- आपल्या देशात समाजात ज्ञात , अज्ञात पणे क्रांती घडवून आणली .
       १५०० वर्षांपूर्वी पारंपरिक वादातून धर्माची सुटका करून लोकांना एक ईश्वर वअल्लाहा ची शिकवण देवून , फक्त " एकच अल्लाहा - ईश्वर समस्त ब्रम्हांडाचा नायक आहे ", एकाच अल्लाहा ची प्रार्थना-बंदंगी भक्ती करा , अल्लाहाची प्रार्थना करताना अनुयायींना थेट संपर्क साधण्यासाठी कोणत्याही प्रकारे मधे दलाल मुक्त धर्माची संकल्पना मांडली.सोबतच कोणत्याही प्रकारचे कर्मकांड करण्याची गरज नाही .
  इस्लामी संस्कृती नुसार कोणत्याही प्रकारची साधी अगरबत्ती सुद्धा लावण्याची गरज ठेवली नाही . 
   कोणही व्यक्ती ,मग शुद्र ही असेल ती सुध्दा इस्लामी ज्ञान घेवू शकते अलिम ,मौलाना , मुफ्ती , हाफीज होऊन शिक्षण घेवू शकतो,ठराविक जातीत जन्माला आला तरच तुम्ही शिकण घेवु शकतात आसा पारंपरिक वाद त्यांनी एकदम नाकारला. शिक्षण ज्ञान घेणाऱ्या व्यक्तींना प्रेषित मुहम्मद सल्लमांनी मोठे स्थान दिले आहे , एक विद्वान एका शहीदांपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे ,हा विचार त्यांनीच दिला आहे , ईस्लाम मधे एका शहीदांचे फार मोठं महत्त्व आहे , तरी सुद्धा त्यांनी विद्वानांना जास्त महत्त्व दिले , त्यावेळी भरपूर युद्ध होत होती युध्दातील बंदी केलेल्या शिक्षित सैनिकांना शिक्षा म्हणून समाजातील मुलांना शिक्षण देण्याची कामे शिक्षा म्हणून दिले होती. मग ते कोणत्याही प्रकारचे उदा. ज्ञान असणारा व्यक्ती म्हणजेच विद्वान फक्त धार्मिक ज्ञान असणं च हे ज्ञान ईस्लाम मानत नाही तर उदा. अर्थशास्त्र, रसायन, वैद्यकीय , क्रीडा , लष्कर ईत्यादी विविध क्षेत्रातील उपेक्षित वंचित समाजासाठी ज्ञानाची बंद कवाडे प्रेषित स्व.मांनी सर्व मानवजातीला कायमची अगदी खुली केली .
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

त्याकाळी चीन हा जगातील आजच्या प्रमाणेच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खुप प्रगत देश होता तेथील अतिप्रगत ज्ञान मिळवण्यासाठी " तुम्ही चीनला जावुन ज्ञान घ्यावं लागलं तरी तुम्ही ज्ञान घेण्यासाठी चीनलाही जा " त्याकाळी असा पुरोगामी दुर-दृष्टीकोनाबददल प्रेषित मुहम्मद सल्लमांचा अभिमान बाळगावा तितके थोडेच.
     श्री. गुरु नानक देवजी , आपल्या (जन्म साखी विलायत वाला ,पेज नंबर १६८) ) मधे म्हणतात की, " ले पैगंबरी आया , इस दुनिया माहे ! नाऊ .
                 मोहम्मद मुस्तफा ,हो आबे परवा हे !!!!)
( अर्थात , ज्यांचं नाव मुहम्मद आहे ,ते या जगात प्रेषित बनुन आलेले आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकाच्या शैतानी शक्तींची भिती व भय नाही .ते बिलकुलच निर्भय आहेत .)
  अल्लाह समोर सर्व मानव सम-समान, सारखेच आहेत हा पुरोगामी विचार मांडला .
 आपल्या ज्ञानाच्या जोरावर कोणी कितीही मोठा होवू शकतो , कोणीही राजा ,प्रधान बनू शकतो हा अत्यंत पुरोगामी विचार मांडला .राजा होण्यासाठी फक्त राजाच्याच पोटी जन्माला यावा लागतो हा विचारच नाहीसा करून टाकला व आपल्या कृतीतून दाखवून देत . याचे मुर्तीमंत उदा. म्हणजे महाराष्ट्रातील अहमदनगर व औरंगाबाद शहरांची ज्याने निर्मिती केली, शहर बसवले, चेहरा- मोहरा बदलला असे पंतप्रधान एक निग्रो गुलाम म्हणून विकत आणला होता व आपल्या कर्तृत्वाने मोठ्या पदावर गेले ते अर्थात मलिक अंबर होत .(उदा. त्यांच्या महानिर्वाण नंतर ७००-८०० वर्षानंतर चे आहेत ).
   समतेचा संदेश देणारे पहिले क्रांतिकारक व आचरणातून आणणारे प्रेषित मुहम्मद स्व.मच ,आपल्या २३ वर्षांच्या कालावधीत समतेवर आधारित समाजरचना निर्माण करून , अरब देशात काळा -गोरा हा भेदभाव खुप मोठ्या प्रमाणात होता , काळया गुलामांची खरेदी- विक्री खुप प्रमाणात केली जात होती ,ती गुलामगिरी नष्ट करून एका जैद नावाच्या काळया गुलामाचा आपल्या सख्ख्या आत्या बहीणाचा विवाह करून काळया -गोऱ्यांचा भेदभावच नष्ट केला .
ह.बिलाल नावाच्या तुच्छ समजले जाणारे गुलामगिरीतून मुक्त करून मक्का विजया दिवशी पवित्र काबागृहावर चढून " अजान " देण्याचा आदेश देऊन समस्त जगाला दाखवून दिले की , कोणीही अपवित्र नसते. समस्त मानव जात ही इस्लामी सिद्धांतानुसार एकाच अल्लाहाची संतान आहेत. सर्व रंगाचे , वर्णाचे , वंशाचे ,एकच आहेत .हा भेदभाव ईस्लाम मुळापासून नष्ट करतो. सर्वांना समान न्याय , हक्क , संधी आहेत , क्रांतिकारी विचार पहिल्यांदा प्रेषित मुहम्मद स्व.मानी जगाला दिला.
   स्वामी विवेकानंद म्हणतात ,""' प्रेषित मुहम्मद पैगंबर स्व.आपल्या आदर्शवत जीवनात असं काही धडा घालून गेले की , त्यांच्या अनुयायांनी , मुस्लिमांमध्ये संपूर्ण समता , बंधुभाव निरंतर नांदावयांस हवे , त्यांच्या मधे जातीचा , लिंगाचा , वर्णभेदाचा भेदभाव कदापी ही शिरू नये."
===================================
---------------------------------------------------
लेखन:-✍️✅🇮🇳 *डॉ. सलीम सिकंदर शेख*
बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर - *9271640014*

*संकलन:* 🌿☘️🍀🌵🌳🌱🌴🌿
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

Tuesday, September 26, 2023

खेल कराटे लीग मधील पदक विजेत्‍या खेळाडूंचा,मनपा आयुक्त पंकज जावळे यांच्या हस्ते गौरव... 🌹🥀🌺🌷🌸🙏❤️ ✅

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

*युथ कराटे फेडरेशन कडून खेळाडूंना स्पोर्ट्स स्कॉलरशिप प्रदान !*

अहमदनगर -प्रतिनिधि - वार्ता -
नुकत्याच राजस्थान या राज्यातील जयपूर येथे दि.८ ते ११ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या खेल कराटे लीग सिजन २ मध्ये, अहमदनगर शहरातील मुकुंदनगर भागातील युथ कराटे फेडरेशन मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या ८ खेळाडूंनी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आणि त्यात उल्लेखनीय कामगिरी करत ३ सुवर्ण १ रजत आणि ४ कांस्य पदकांची कमाई केली असल्याने त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेल कराटे मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा यावेळी मनपा आयुक्त पंकज जावळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या खेळाडूंना प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय कराटेपटू सबील सय्यद आणि साहील सय्यद यांनी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले होते. आंतररष्ट्रीय दर्जाच्या खेल कराटे लीग मध्ये नगरच्या खेळाडूंचा समावेश होणे ही नगरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. 
युथ कराटे फेडरेशन च्या , शुक्रवार दिनांक २२ सप्टेंबर २०२३ रोजी विजेत्या खेळाडूंचा सत्कार समरंभ मोठ्या उत्साहात मुकुंदनगर येथील एन. एम. गार्डन येथे संपन्न झाला. 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर महानगरपालिका आयुक्त पंकज जावळे तर प्रमुख उपस्थितीमध्ये सामाजिक कार्यकर्ते हाजी शाहबाज सय्यद , सी.आय.व्ही सोसायटी चे चेअरमन आरिफ सय्यद,माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक, गुलशन कंपनी चे जिशान शेख , सामाजिक कार्यकर्ते जुबेर सय्यद , पत्रकार अफझल सय्यद , डॉ. शबनम इम्रान शेख आदी मान्यवर उपस्थित होते. 
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेल कराटे मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा मनपा आयुक्त पंकज जावळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. 

यामध्ये खेल कराटे लीग मधील सुवर्ण पदक विजेते महेक मतीनखान पठाण,आरफा नियाजअहमद शेख , इब्राहिम तय्यब शेख यांना युथ कराटे फेडरेशन कडून मनपा आयुक्तांच्या हस्ते स्पोर्ट्स स्कॉलरशिप प्रदान करण्यात आली. 

रजत पदक विजेता याहया मुदस्सर सय्यद, कास्यपदक विजेते आलिया अफजल सय्यद, अशाज अर्शद शेख , अहमद ताहीर शेख, अरकम मोहसीन सय्यद यांना सामाजिक कार्यकर्ते हाजी शाहबाझ सय्यद यांच्या वतीने सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. 
कराटे खेळाचा दर्जा वाढविण्यासाठी नेहमीच प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी हाजी शाहबाज सय्यद यांनी यावेळी दिले. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अफजल सय्यद यांनी केले. तर आभार प्रदर्शन माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक यांनी केले. 
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी युथ कराटे फेडरेशनच्या सर्व सदस्यांनी तथा हाजी शाहबाज सय्यद यांनी विशेष परू घेतले.

===================================
---------------------------------------------------
*सहयोगी:*
गुलामरसुलभाई (GM) अहमदनगर
*संकलन:* ✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

Sunday, September 24, 2023

तीन सराईत गुन्हेगार जेरबंद सात्रळ माळेवाडी दरोड्यातील...

अहमदनगर - प्रतिनिधि - वार्ता -

 सात्रळ माळेवाडी येथील राहुरी तालुक्यातील दरोड्यातील आरोपींना मुद्देमालासह पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहमदनगर व राहुरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून आरोपी पकडण्यात पोलिसांना यश मिळविले आहे. यातील आरोपी आष्टी, जिल्हा बीड येथील आहेत. तसेच या प्रकरणात पाथर्डी येथील एका सुवर्ण व्यावसायिकालाही पोलिसांनी आरोपी केले असून तो फरार आहे.
सात्रळ माळवाडी येथे दरोड्याचा गुन्हा घडल्यानंतर गुन्ह्याचा प्राथमिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक धनंज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशल वाघ, पो . हवा, जयभाय, पो. ना. कोकाटे, दिपक फुंदे, यांनी सुरू केला होता. सदर गुन्ह्याच्या प्राथमिक तपासात गुन्ह्याच्या ठिकाणी आरोपींचे ठसे मिळाले होते ते ठसे चलाखीने, हुशारीने सुरक्षित करण्याची कामगिरी लोखंडे व त्यांच्या पथकाने केली होती. अंगुली मुद्रा शाखेकडील प्रशिक्षित तज्ञ पोलीस अंमलदार यांनी सदरचे ठसे डेव्हलप करून आरोपी निष्पन्न केले होते.

निष्पन्न केलेल्या आरोपींना आष्टी, बीड येथून शिताफीने अटक करण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व त्यांच्या पथकाने चोख बजावली. यामध्ये राम बाजीराव चव्हाण (वय- २२ वर्षे, रा. आष्टी, जि. बीड), तुषार हबाजी भोसले (वय- १९ वर्षे, रा. पिंपरखेड, जि. बीड), रियाज बशीर शेख (वय- ४९ वर्षे, रा- आष्टी, जि. बीड) या तिघा आरोपिंना अटक केली आहे. अटक केलेले आणि निष्पन्न झालेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगीतले आहे.

===================================
---------------------------------------------------
: - सह, संपादक - रंजित बतरा - शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
---------------------------------------------------
===================================



*कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेमुळे ग्रामीण भागात शैक्षणिक क्रांतीः माजी आ.मुरकुटे* 🌹🥀🌺🌷🌸🙏❤️ ✅️ 🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि -  वार्ता -
 रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामुळे ग्रामीण भागात शैक्षणिक परिवर्तन घडले. त्यांना स्व.भास्करराव गलांडे पाटील यांनी मोलाची साथ दिली. त्यामुळेच शेतकरी कुटुंबातील व गोरगरिबांची मुले शिक्षण घेवून स्वावलंबी बनली, असे प्रतिपादन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.
तालुक्यातील अशोकनगर येथील भास्करराव गलांडे पाटील विद्यालयामध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे तर प्रमुख अतिथी म्हणून त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष साहेबराव घाडगे होते.
प्रमुख अतिथी साहेबराव घाडगे आपल्या भाषणात कर्मवीर भाऊराव पाटलांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर उलगडत नेला. ते म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेमुळे माझे जीवन बदलले. रयत शिक्षण संस्थेच्या 'कमवा आणि शिका' मधून शिक्षण घेऊन उच्चपदस्थ अधिकारी होण्याचा बहुमान मला मिळाला. रयत शिक्षण संस्थेमुळेच मी घडलो. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर, 'प्रामाणिकपणे कष्ट करा' हा सल्ला विद्यार्थ्यांना त्यांनी दिला. स्पर्धा परीक्षेला पर्याय नाही, असे ते म्हणाले.
याप्रसंगी भास्करराव गलांडे पाटील वकृत्व स्पर्धा पारितोषिकाचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. वकृत्व स्पर्धा चषक रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल टाकळीभान विद्यालयास प्रदान करण्यात आला. कर्मवीर भाऊराव पाटील जयंती निमित्त लक्षवेधी मिरवणूक, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, या सर्व स्पर्धेतील बक्षिसांचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. डी. के. वडीतके यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.सूर्यकांत सराटे यांनी करुन दिला. 
या कार्यक्रम प्रसंगी भास्करराव गलांडे पाटील यांच्या कन्या श्रीमती सुनीता गलांडे यांनी विद्यार्थ्यांना ट्रॉफी उपलब्ध करून दिल्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी अन्नदान डॉ.लोखंडे परिवार अशोकनगर यांनी केले.
 याप्रसंगी अशोक कारखान्याचे माजी चेअरमन सोपानराव राऊत, माजी संचालक काशिनाथ गोराणे, अशोक महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य सौ.सुनिताताई गायकवाड, अनिल गायके, डॉ. मंगेश उंडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे सेवक, ग्रामस्थ, विद्यालयाचे पर्यवेक्षक दिलीप बनकर यांचे सहकार्य लाभले. आभार प्रा.गावित यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रामदास गायकवाड, प्रा. श्रीमती शिंदे, प्रा.श्रीमती बनसोड यांनी केले.

===================================
---------------------------------------------------
*संकलन:*✍️✅️🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

राज ठाकरेंकडून खंत महाराष्ट्रातील राजकीय वातावरण मनोगत व्यक्त...

ठाणे - प्रतिनिधि - वार्ता

मनसे अध्येक्ष राज ठाकरे यांचे हस्ते पुस्तक प्रकाशन करताना राजकारणावर विषयी स्पष्टी करण 
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण गढूळ झाले आहे. त्यामुळे साहित्यिक, कवी यांनी याबाबत बोलायला हवे. कवींनी याबाबत बोलायला सुरुवात केली तर त्यांचेही महत्व वाढेल. असलेल्या परिस्थितीवर भाष्य करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, आजची देशाची आणि महाराष्ट्राची परिस्थिती पाहता मी राजकारणी म्हणवत नसल्याचे राज ठाकरे  म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या असंग्रहित कथा, कवितांचे प्रकाशन करण्यात आले. ठाणे येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राज ठाकरे यांनी यावेळी कुसुमाग्रजांचे कौतुक केले. महाराष्ट्रात अनेक मोठ्या लोकांचा जन्म झाला आहे. पण, आपल्याच लोकांना आपण मोठं करत नाही, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मी इंग्लंडला गेल्यावर शेक्सपिअरचे घर पाहिले. ते जपून ठेवण्यात आले होते. आमची माणसे किती मोठी होती. ती किती मोठी होऊन गेली हे सतत दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तो आपला नसतो. आपल्याकडे संमेलन भरतात. लोक येऊन बोलतात. पण, पुढे काही होत नाही, असे ही ते म्हणाले.

दरम्यान राज ठाकरे यांनी यावेळी कुसुमाग्रज यांची कविता वाचली. त्यांची कविता राजकारणाला समजले नाही, ती निदान जनतेला तरी समजली पाहिजे. आपण कोणाला बोलून घेतो कोण माणसे त्यांची काय लायकी आहे, असा टोला त्यांनी राजकीय नेत्यांना लगावला

किशोरी आमोणकर यांचे पुस्तके प्रकाशन माझ्या हस्ते करण्यात येत होते. मी आमोणकरांना म्हटले तुम्ही चुकीच्या माणसाला बोलावताय. विचार करा की आमोणकरांचे पुस्तक माझ्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. आम्ही चुकीच्या जागी जांभळासारखे जाऊन टपकतो, असे राज ठाकरे म्हणाले.

===================================
---------------------------------------------------
:- सह, संपादक रंजित - बतरा -शब्द...✍️✅️🇮🇳... रचना संकलन वार्ता...
---------------------------------------------------
===================================







विमान धाव पट्टी देख भाल डाग डुजी काम निघाल्याने मुंबई विमानतळ १७ ऑक्टोबरला सहा तास राहणार बंद

मुंबई - प्रतिनिधि - वार्ता

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय
देशातील सर्वात व्यस्त असलेल्या आणि मोठ्या असलेल्या  विमानतळावर (CSMIA) विमानांची वाहतूक १७ ऑक्टोबर रोजी तब्बल सहा तास बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्यांची देखभाल-दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विमानांची ये-जा बंद राहणार आहे. त्यामुळे एक-दोन नव्हे तर तब्बल २५० विमानांचं उड्डाण रद्द होणार आहे. काही विमानांच्या वेळा बदलण्यात येणार आहेत.
मुंबईत व्यापाराच्या दृष्टीने येणाऱ्यांची आणि परदेशात जणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मुंबई विमानतळ देशातील सर्वात व्यस्त विमानतळ म्हणून ओळखले जाते. दिवसाला तब्बल ९०० हून अधिक उड्डाणे येथून होतात. त्यामुळे हे विमानतळ महत्वाचे मानले जाते. त्यामुळे येथील उड्डाणे सुरक्षित ठेवण्यासाठी पुढील पावसाळ्याआधी मे महिन्यात विमानतळाच्या धावपट्टीची डागडुजी व दुरुस्ती करण्यात आली होती. आता पुन्हा धावपट्टीच्या डागडुजीची मोहीम हाती घेतली जाणार आहे. १७ ऑक्टोबरला ही दुरुस्ती केली जाणार आहे.


या संदर्भात माहिती देतांना विमानतळाचे संचलन करणाऱ्या ‘मिआल’ कंपनीने या संदर्भात माहिती दिली आहे. विमानतळाच्या धावपट्टीची पावसाळ्याआधी आणि पावसाळ्यानंतर दरवर्षी डागडुजी आणि दुरुस्ती केली जाते. यामुळे विमानांचे उड्डाण हे सुरक्षित राहील याची काळजी घेतली जाते. या पूर्वी गेल्यावर्षी १८ ऑक्टोबरला ही दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर यावर्षी २ मे रोजीही धावपट्टीची दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर पुन्हा १७ ऑक्टोबरला दुरुस्ती केली जाणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान डागडुजी आणि दुरुस्तीसाठी ही धावपट्टी बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे जर १७ आणि १८ ऑक्टोबरला जर तुम्ही मुंबईहून विमान प्रवास करतांना प्रवाशांनी उड्डाणाच्या वेळा तपासून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

===================================
---------------------------------------------------
:- सह,संपादक - रंजित बतरा - शब्द... ✍️✅️🇮🇳... रचना संकलन वार्ता...
---------------------------------------------------
===================================


Saturday, September 23, 2023

*पंधराव्या शब्दगंध साहित्य संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन* 🌹🥀🌺🌷🌸🙏❤️ ✅️ 🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

औरंगाबाद - (प्रतिनिधी) - वार्ता -
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने ७ व ८ ऑक्टोंबर रोजी अहमदनगर येथे ज्येष्ठ साहित्यिक, माजी सनदी अधिकारी डॉ. पुरूषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात मान्यवरासह नवोदित साहित्यिकांना सामावून घेण्यात येणार असल्याने साहित्यिक व साहित्य रसिकांनी या संमेलनास उपस्थित रहावे असे आवाहन
शब्दगंध चे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी केले.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या औरंगाबाद जिल्ह्यातील सभासद व साहित्यिकांच्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्यालयांत बैठकीत ते बोलत होते. यावेळी संस्थेचे खजिनदार, लोककला अभ्यासक भगवान राऊत, प्रा.डॉ. गणी पटेल, डॉ.शेषराव पठाडे, डॉ संजय पाईकराव, तानाजी शेटे, सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी गोविंद पायघन,संयोजन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडूळे, कार्याध्यक्ष प्रा डॉ.अशोक कानडे, ठाणे जिल्हा समन्वयक भानुदास वाघमारे, नाशिक चे समन्वयक विलास कातकडे इ मान्यवर उपस्थित होते.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

वीस वर्षांपूर्वी नवोदित लेखकांसाठी सुरू झालेली ही साहित्यिक चळवळ आता सर्वदूर पोहचली असून या चळवळीच्या माध्यमातून अनेकांना लिहिते करण्याचे काम झालेले आहे. या चळवळीतील अनेक साहित्यिकांना वेगवेगळ्या विचार पिठावर संधी मिळत असून अनेकांची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.शब्दगंधने आतापर्यंत २५० पुस्तकांचे प्रकाशन केलेले असून त्यातील काही पुस्तके विद्यापीठस्तरावर अभ्यासक्रमात संदर्भ ग्रंथ म्हणून तर काही शासनाच्या ग्रंथ खरेदीत खरेदी झालेली आहेत.
       राज्यातील सर्व सभासदांना विचार मंथन करता यावे,एकत्र भेटता यावे यासाठी राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन सुरू झालेले असून यापूर्वीचे १४ संमेलने यशस्वीपणे पार पडलेली आहेत. बिनविरोध संमेलनाध्यक्ष निवडण्याची परंपरा याही वर्षी कायम ठेवली असून ज्येष्ठ सनदी अधिकारी, साहित्यिक, कवी, गीतकार डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या निवडीने यावर्षी संमेलन एका विशिष्ट उंचीवर पोहोचणार आहे. या संमेलनाचे पूर्वाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी प्रा. फ मु.शिंदे, इंद्रजीत भालेराव, चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर,ज्येष्ठ विचारवंत डॉ.कुमार सप्तर्षी, आमदार कविवर्य लहू कानडे, प्रशांत मोरे, प्रकाश घोडके, भारत सासणे यांच्यासारख्या दिग्गजांनी संमेलनाध्यक्ष म्हणून साहित्य सेवा केलेली आहे.
या संमेलनात उद्घाटन,लोककला, लोकजागर साहित्य यात्रा, ग्रंथ प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद,चर्चासत्र,कथाकथन, दोन काव्यसंमेलने,वाड्मय पुरस्कार वितरण, साहित्य स्पर्धा पारितोषिक वितरण व समारोप होणार असून एका सेलिब्रिटीची मुलाखतही होणार आहे, अशी माहिती भगवान राऊत यांनी दिली.
अहमदनगर शहराचे आमदार संग्रामभैय्या जगताप हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असुन या संमेलनाची पूर्वतयारी प्रगतीपथावर आहे. शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्यासह संयोजन समितीचे पदाधिकारी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.


*सोनेवाडीत आरोग्य मेळावा संपन्न*

*राजेंद्र दुनबळे - शिर्डी*
प्राथमिक आरोग्य केंद्र पोहेगांव अंतर्गत,कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी गावात आरोग्य मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून या आरोग्य मेळाव्यास जिल्हा क्षयरोग आरोग्य अधिकारी डॉ. आहेर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.घोलप,वैद्यकीय अधिकारी डॉ.खटकाळे यांनी भेट देत रुग्णांची तपासणी करुन आरोग्य विषयक उपस्थित
 नागरिकांना माहिती देऊन आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे कोपरगांव तालुका टी .बी पर्यवेक्षक श्रीमती सुनीता सहाने यांनी क्षयरोग विषयी उपस्थित नागरिकांना योग्य असे मार्गदर्शन केले.यावेळी सरपंच
 शकुंतला निरंजन गुडघे.. श्रीमती फटांगरे मॅडम.श्रीमती पवार, आरोग्य सेविका श्रीमती मोनाली बोरसे व सर्व आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागतपर सत्कार करण्यात आले.

===================================
---------------------------------------------------
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

*सदस्य केंद्रीय 👆 निगराणी समिती सामाजिक न्याय एंव अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार दौरा* दि.2/10/2023


नरोत्तमजी🙏 चव्हाण
जनसंपर्क प्रमुख

दि .02/10/2023 से 0 6/10/2023 तक
*शिर्डी,अ. नगर, शनिशिंगणापूर, पुणे,मुंम्बई*
स. मा. *रविंद्रजी प्रधान सहाब* सदस्य, केंद्रीय निगराणी समिती, सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय ,भारत सरकार द्वारा सफाई कर्मचारी तथा उनके अश्रितोंके पुनर्वास हेतू राज्य तथा केंद्रशासन द्वारा योजना का लाभ कितने प्रतिशत प्रत्यक्ष उन्हें मिला? नही मिला तो क्यू नही मिला? नही मिलने के लिए जबाबदार कोण? इन सभी मुद्दों की समीक्षा की जायेंगे, तथा सफाई कर्मचारीयों के समस्या के संदर्भ मे समीक्षा की जायेंगी तथा न्यायहक्क संबंध मे उचित निर्देश संबंधित अधिकारी तथा शासन को दिये जायेंगे! तथा समीक्षा अहवाल केंद्र शासन के समक्ष रखा जायेगा!

इस महत्वपूर्णदौरे मे विशेषत: औरंगाबाद नाशिक शिर्डी नगर शनिशिंगणापूर पुना मुंबई इन सभी क्षेत्र के सफाई कर्मचारी तथा उनके विविध कामगार संघटनाऍं, प्रतिनिधी, समाजसेवक, सामाजिक, धार्मिक, राजकीय नेता ,कार्यकर्ता गण आमंत्रित है! सभी से विनम्र निवेदन है कि, जो भी आपकी समस्या है, उसे लिखित निवेदन द्वारा तथा प्रत्यक्ष बैठक मे उपस्थित रहकर, या सदस्य जी को प्रत्यक्ष मिलकर दे सकते है !आप इस सुवर्णसंधी का अवश्य लाभ ले!

आपके स्नेही

नरोत्तमजी🙏 चव्हाण
जनसंपर्क प्रमुख

ऍड.कबीर 🙏बिवाल
महाराष्ट्र राज्य कॉर्डिनेटर 

 एँड. सागर 🙏चरण
 कॉर्डिनेटर

कुमार🙏 बिडलान
स्विय सहाय्यक महाराष्ट्र राज्य

साथ मे : *प्रोटोकॉल लेटर* दि. 22 'सप्टेंबर' 2023

पुणे, मुंबई, अहमदनगर, शिरडी,शिखर सिंगणापुर, सातारा, सांगली, कोल्हापुर,आदि, विभाग के सभी कार्यकर्ताओं से नम्र निवेदन है कि हमारे समाज की समस्या अनेक है। कार्यकर्ता के पास समस्याओं का ढेर लगा हुआ है। आने वाली निगरानी कमेटी के सदस्य श्रीमान रवीद्र जी प्रधान जी इन्होंने जो वक्त दिया है इसका हमें सही उपयोग करने के सही दिशा में कार्य करना होगा। हो सकता है सभी लोगों को समक्ष बातचीत करके अपना निवेदन सामने रखना असंभव हो सकता है। इसलिए सभी यूनियन के पदाधिकारी पंचायती कार्यकर्ता तथा संस्थाओं के कार्यकर्ता इन्हीं से विनंती है कि अपना निवेदन लिखित स्वरूप से हो, तो आपको आपका लेटर हेड पर लिखा हुआ निवेदन उनको देने पर उसका सही विचार विनिमय जरूर होगा। सौ बका एक लिखा यह पुरानी कहावत सबको याद होगी। (2)दूसरी महत्वपूर्ण बात यहां है कि एक निवेदन पर 10 समस्या लिखकर देना ठीक नहीं होगा। एक कागज पर या लेटर हेड पर एक ही समस्या लिखकर टाइप करके उससे संबंधित कागज पत्र पुरावेके साथ में जोड़कर वहां देने से उसे समस्या का हल ठीक से हो सकता है ।भले आपकी 10 समस्या हो तो 10 लेटर हेड या पत्र लिखकर टाइप करके वहां इस केंद्रीय निगरानी कमेटी के सुपुर्त करना, यहां हमारा समंजसपना बना रहेगा, और काम भी हम सही दिशा में कर सकोगे, ये आपके, सहकार्य की हमें बहुत-बहुत आशा है। महाराष्ट्र का यह पहला ही दौरा अच्छा सफल हो एक अच्छा इंप्रेशन निगरानी कमेटी के ऊपर रहे इसलिए आप सभी प्रयत्नशील रहे यही विनंती है। धन्यवाद। आपके विनीत...