राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, October 6, 2023

*फातेमा कॉलनी, मिल्लतनगर भागात नवीन डीपी बसविण्याची अजहर शेख अध्यक्ष ABS यांची मागणी*


श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -
श्रीरामपूर - शहरातील नवीन उपनगर असलेल्या फातेमा कॉलनी मिल्लत नगर परिसरामध्ये वाढत्या वसाहतीमुळे सत्य असलेल्या डीपीवर ताण पडत असल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होतो त्यामुळे या भागांमध्ये जास्त क्षमतेची नवीन डीपी बसविण्याची मागणी परिसरातील नागरिकांच्या वतीने महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री भंगाळे यांच्याकडे करण्यात आली याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.
 या विभागातील दोन्ही डी. पी.100 केव्ही चे असल्यामुळे अतिरिक्त भार पेलू शकत नाहीत, म्हणून या विभागात आणखी स्वतंत्र डी. पी. वाढवावी,
 कमी क्षमतेच्या डीपी मुळे वीज पुरवठा कमी दाबाने होतो तसेच वारंवार खंडित देखील होतो त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जाव लागतं.याचा परिणाम या भागातील व्यवसायावर देखील झाला असून पाणीपुरवठा देखील वेळेत मिळत नाही. या सर्व कारणांमुळे या भागातील लोकांच्या प्रतिक्रिया संतप्त झालेल्या आहेत. वेळेत आपलं लाइट बिल भरुन ही ही समस्या कायमस्वरूपी अशीच असते.जनतेचे व्यवसाय हे वीजेवर अवलंबुन आहे.वारंवार लाईट जाण्यामुळे या व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून सकाळी पाणी येणे व लाईट जाणे हे तर रोजचं झाले आहे. त्यामुळे येथील महिला वर्गातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. दर रोज 300 रू खर्चून स्वतंत्र पाण्याची गाडी बोलवावी लागते. वारंवार लाईट जाण्यामुळे नागरिकांचे जनजीवन जिकीरीचे झाले आहे. डासांचे
 प्रमाण वाढले आहे. मच्छरामुळे डेंग्यू हा आजार ही होण्याची शकयता आहे. यासर्व प्रकारामुळे प्रभागातील या जनता खूप त्रस्त झाली आहे, तरी या समस्येला आपण लवकरात लवकर सोडवा व या विभागात अतिरिक्त भार ओढण्यासाठी आणखी डी पी बसवावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
सदर निवेदनाची तातडीने दखल घेत या विभागातील अभियंता विघे यांच्या यांना समक्ष बोलवून श्री भंगाळे यांनी चर्चा केली व तातडीने नवीन डीपीचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.
निवेदन देतेवेळी अजहर हनीफ शेख - फाउंडेक्शन - एबीएस, अध्यक्ष आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संरक्षण अँड अ‍ॅन्टी करप्शन (इंडीया),
सलिमखान पठाण, तनवीर शेख,अफरोज शाह, खालीद मोमीन, प्रमोद त्रिभुवन, अरबाज सय्यद, फैजान बागवान, कैफ सय्यद, शहजाद सय्यद, समीर काकर आदि उपस्थित होते.

===================================
---------------------------------------------------
: - अजहर हनीफ शेख...✍️✅🇮🇳...अध्यक्ष एबीएस,आंतरराष्ट्रीय मानवाधिकार...संरक्षण अँड अ‍ॅन्टी करप्शन (इंडीया),
---------------------------------------------------
===================================


No comments:

Post a Comment