नाशिक - प्रतिनिधि - वार्ता -
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज एकदिवसीय नाशिक दौऱ्यावर असून या दौऱ्यात त्यांचे नाशिक ग्रामीण भागात विशेष लक्ष असणार सल्याचे सांगितले जात आहे. नुकतेच त्यांचे ओझर विमानतळावर आगमन झाले असून राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ व मुंबई अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले
अजित पवार यांच्या उपस्थितीत आज कळवण येथे साडे अकरा वाजता शेतकरी कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांना अजित पवार संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमानंतर राष्ट्रवादीच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या घरी देखील ते भेट देणार आहेत. यावेळी अजित पवार यांच्यासोबत खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील उपस्थित आहेत.
त्यानंतर दुपारी ३ वाजता दिंडोरी तालुक्यातील सह्याद्री ऍग्रो फार्म हाऊस या ठिकाणी संवाद साधणार आहेत. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाशिक शहरात आगमन होणार असून राष्ट्रवादी भवन कार्यालयात कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर पुन्हा शासकीय वाहनाने ओझर विमानतळाकडे प्रस्थान करणार आहेत.
दरम्यान, यावेळी ओझर विमानतळावर अजित पवारांच्या स्वागतासाठी मंत्री भुजबळ यांच्यासह जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
===================================
---------------------------------------------------
: - उप, संपादक - एस के वाघ - संकलन...✍️✅🇮🇳वार्ता
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment