राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, October 7, 2023

उप मुख्य मंत्री अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न कांदा-टोमॅटो फेकत शेतकऱ्यांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी


नाशिक - प्रतिनिधि - वार्ता -
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज एकदिवसीय नाशिक दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत कळवण येथे शेतकरी कृतज्ञता मेळाव्यासह विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर अजित पवार हे ओझर विमातळावरून दिंडोरीकडे.जात असताना दिंडोरी अवनखेड लखमापूर फाटा वणी येथे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. यानंतर अजित पवार वणी येथील सप्तशृंगी गडाकडे मार्गस्थ होत असताना वणी-कळवण चौफुलीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष शाम हिरे,विधानसभा अध्यक्ष संतोष रेहरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कांदा-टोमॅटो रस्त्यावर फेकत ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी अजित पवार यांना काळे झेंडेही दाखवण्यात आले.सकाळी ओझर विमातळावर  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन झाले. यावेळी त्यांचे ना.मंत्री छगन भुजबळ यांनी स्वागत केले.

या आंदोलनाच्या माध्यमातून कांदा व टोमॅटोच्या कोसळलेल्या भावा संदर्भात सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. याशिवाय शेतकऱ्यांनी कांदा निर्यात शुल्क मागे घ्यावी, टोमॅटोला चांगला भाव द्या, शेतकऱ्यांनीजगायचं कस, शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत निषेध नोंदविला. मात्र, वेळीच पोलिसांनी संबंधित शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर अजित पवार यांचा ताफा सप्तशृंगी गडाकडे रवाना झाला. यावेळी शेतकऱ्यांनी
दरम्यान, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष बांधणीसाठी अजित पवारांचा नाशिक दौरा महत्वाचा मानला जात असून यात त्यांनी विशेषत ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. तसेच अजित पवार यांच्या समवेत खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,आमदार दिलीप बनकर यांच्यासह आदी नेते उपस्थित आहेत.

===================================
---------------------------------------------------
: - उप, संपादक - अनिकेत निकम - संकलन ✍️✅🇮🇳...
---------------------------------------------------
===================================

No comments:

Post a Comment