राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, October 7, 2023

*सिंधुदुर्ग सहकारी बँक मुंबईला* *बँको पुरस्कार २०२३ प्रदान !*🌹🥀🌺🌷🌸🙏❤️ ✅ 🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

*संचालक डॉ. श्रीकृष्ण परब*
 *यांनी स्वीकारला सन्मान*

*ज्येष्ठ पत्रकार नारायण सावंत - मुंबई*
सिंधुदुर्ग सहकारी बँक लिमिटेड मुंबईला आणखी एका मानाचा पुरस्कार  देण्यात आला आहे. देशभरातील १५०० हुन अधिक सहकारी बँकांमधून ग्राहकांची विश्वासार्हता जपत  सहकारी बँका गटात सभासद ठेवी गोळा करण्यामध्ये गुणवत्तापूर्वक काम केल्या बद्दल या बँकेला 'बँको ब्लु रिबन' पुरस्कार २०२३ ने सन्मानित करण्यात आले. रिझर्व बँकेचे माजी महाप्रबंधक पी. के. अरोरा यांच्या हस्ते यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत करणाऱ्या सिंधुदुर्ग सहकारी  बँकेचे संचालक व मसुरे गावचे सुपुत्र डॉ. श्रीकृष्ण द. परब यांनी दमण येथे सदर पुरस्कार स्वीकारला.
अविज पब्लिकेशन, कोल्हापूर या संस्थेमार्फत प्रतिवर्षी सहकार क्षेत्रात देशपातळीवर कार्यरत व उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना सदर पुरस्कार दिले जातात. देशातील सात राज्यांमधून  सहकारी बँकांच्या गटातून सिंधुदुर्ग सहकारी बँक मुंबईला "बँको ब्यू रिबन पुरस्कार २०२३" जाहीर करण्यात आला.  देशभरातील अग्रगण्य अश्या ९० हुन अधिक सहकारी/अर्बन बँकांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.पुरस्कार वितरण सोहळ्यापूर्वी पाच सत्रांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केले. बँकेचे सर्व संचालक,अधिकारी, कर्मचारी, ग्राहकांमुळेच हे यश साध्य झाल्याची  प्रतिक्रिया डॉ श्रीकृष्ण द. परब यांनी  व्यक्त केली.

*फोटो वृत्त*
दमण येथे बँको ब्लु रिबन' हा पुरस्कार रिझर्व बँकेचे माजी महाप्रबंधक पी. के. अरोरा यांच्या हस्ते स्वीकारताना सिंधुदुर्ग सहकारी बँक लिमिटेड मुंबईचे संचालक डॉ. श्रीकृष्ण द. परब बाजूला अन्य मान्यवर.

===================================
---------------------------------------------------
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================


No comments:

Post a Comment