अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा
विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे सर्व सचिव व मंडळ अधिकारी यांच्यासाठीचे ई हक्क प्रणाली ची ओळख व प्रशिक्षण अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली सहकार सभागृह अहमदनगर येथे संपन्न झाले.
यावेळी उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे साहेब, जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वर्षे , जिल्हा उपनिबंधक श्री पुरी उपस्थित होते.
शासकीय कार्यालयांमध्ये सर्व सेवा या ऑनलाईन, डिजिटल माध्यमातून देण्यात येतात. महसूल विभागातील सातबारा संगणीकरण झाल्यापासून सातबारा हा ऑनलाईन मिळतो व दुय्यम निबंधक कार्यालयातील सातबारासंबंधी व्यवहाराच्या नोंदी ऑनलाईन तलाठी कार्यालयात प्राप्त होतात.परंतु, उर्वरित ज्या काही नोंदी आहेत त्या करण्यासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करावा लागतो. त्या नोंदींसाठी शासनाने ई हक्क प्रणाली विकसित केली आहे.
या प्रणालीमध्ये ईकरार, बोजा चढविणे, गहाणखत, बोजा कमी करणे, वारस नोंद, मयताचे नाव कमी करणे, अपाक शेरा कमी करणे, ए. कु. मे. नोंद कमी करणे, विश्वस्तांचे नाव बदलणे, हस्तलिखित व संगणकीकृत ७/१२ मधील तफावत दुरस्त करणे या नोंदींचा समावेश करण्यात आला आहे.
या नोंदीमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना पीककर्जासाठी महत्वाची नोंदी म्हणजे इकरार, बोजा चढविणे, बोजा कमी करणे या आहेत. याबाबत विकास कार्यकारी सोसायटीचे सर्व सचिव व मंडळ अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. ई हक्क फेरफार प्रणालीसाठी https://pdeigr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
प्रशिक्षणास अहमदनगर, श्रीगोंदा, पारनेर, राहुरी, कर्जत, जामखेड, शेवगाव, व पाथर्डी या तालुक्यातील विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे सर्व सचिव व मंडळ अधिकारी उपस्थित होते.
===================================
---------------------------------------------------
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment