💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
श्रीरामपूर प्रतिनिधि वार्ता
गोवा येथे होणाऱ्या ३७ व्या नॅशनल गेम्समध्ये रोलबॉल या खेळाचा समावेश केला आहे. या स्पर्धेसाठी श्रीरामपूर तालक्यातील सेंट झेवियर्स शाळेचे माजी रोल बॉल खेळाडू हर्षल सोमनाथ घुगे व एलिना अजय तेजानी यांची महाराष्ट्र रोल बॉल संघात निवड झाली आहे. तसेच श्रीरामपूर तालुक्यातील स्केटिंग या खेळाचे जनक व रोल बॉल खेळाचे आंतरराष्ट्रीय पंच व राष्ट्रीय रोल बॉल प्रशिक्षक आनंद पटेकर यांची महाराष्ट्र रोल बॉलच्या महिला संघाचे व्यवस्थापक म्हणून निवड झाली आहे.
निवड झालेल्या खेळाडूंना क्रीडा शिक्षक आनंद पटेकर, नितीन तमनर,पुष्प कोळगे,प्रभाकर वडव्हराव यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व खेळाडूंना व महिला संघाचे नवनिर्वाचित व्यवस्थापक श्री. पटेकर यांना शाळेचे प्राचार्य फादर टायटस थंगराज, रोल बॉल खेळाचे जनक राजू दाभाडे सर, एशिया,भारतीय व महाराष्ट्र रोल बॉल संघटनेचे सचिव प्रताप पगार, चेतन भांडवळकर, आनंद यादव ,श्रीरामपूर तालुका रोल बॉल संघटनेचे अध्यक्ष राजेश अलग व प्रदीप पाटोळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
===================================
---------------------------------------------------
*सहयोगी:*
पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment