💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*शिर्डीऐवजी सिन्नर फाटा, नाशिक येथे*
*यावर्षी रुग्णांसाठी मोठी महापर्वणी*
*दमा रुग्णांवर मोफत उपचार - डॉ. तांबोळी हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरचा स्तुत्य उपक्रम*
अहमदनगर प्रतिनिधि वार्ता
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे अनेक वर्षांपासून कोजागरी पोर्णिमेला दमा (अस्थमा) रुग्णांसाठी महापर्वणी शिबीर आयोजित केले जात होते. मात्र या वर्षी नाशिक जिल्ह्यातील स्वागत लॉन्स एक़लहरे रोड, सिन्नर फाटा, नाशिकरोड, नाशिक येथे आयोजित केले असल्याची माहिती डॉ. युनुस तांबोळी यांनी दिली.
खिरितील आयुर्वेदांक औषधे डॉ. तांबोळी हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर यांच्या विद्यमाने शिर्डीला होणारे शिबीर यावर्षी कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी दि. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ ते रात्री १२ वाजेपर्येंत राहणार असून या शिबिरात दमा रुग्ण, बाल दमा, अॅलर्जिक सर्दी व फुफ्फुसाचे विकार असणार्यांसाठी कोजागिरी अमृत हे आयुर्वेदीक औषध सर्वांसाठी मोफत देण्यात येणार आहेत. सर्व रुग्णांसाठी तपासणी व मार्गदर्शन मोफत असून तज्ञ डॉक्टरांची व्याख्याने व मार्गदर्शंनाचे यावेळी आयोजन करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
सदरील शिबीराचा रुग्णांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होत लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. तांबोळी हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरच्यावतीने करण्यात आले आहे.
या शिबिराचा शुभारंभ शनिवार दि. २८ ऑक्टोबर रोजी होत असून रुग्णांनी त्याआधी सामनगाव, एक़लहरे, नाशिक येथील तांबोळी हॉस्पिटल अस्थमा रिसर्च सेंटर तसेच गोरेवाडी येथील डॉ. तांबोळी क्लिनिक, मोबाः ९८२२०९९६६२, डॉ. तांबोळी आयुर्वेद पंचकर्म व दातांचा दवाखाना, जेलरोड नाशिक, मोबाः ८७९३६८५८८७, डॉ. तांबोळी क्लिनिक पुणे बावदान, मोबाः ९०२८७१४६९५, डॉ. तांबोळी हॉस्पिटल, संगमनेर, मोबाः ९८२२३७२७२८, विहितगांव नाशिक, ९८९००१५८७७, अरिंगळे मळा सिन्नर फाटा, नाशिक रोड, मोबाः ९११२३५१११५, सिन्नर, मोबाः ९३७१५६६६४५, डॉ. तांबोळी क्लिनिक, सेंट फिलोमिना शाळेसमोर जेलरोड ९११२३५१११५, डॉ. राज हॉस्पिटल वार्ड नं. २ श्रीरामपूर ९८२२४३५६३६
अशा या आपल्या जवळच्या आणी सोयीच्या ठिकाणी संपर्क साधावा. ऐनवेळी येणार्या रुग्णांसाठी देखील तशी योग्य सोय केलेलीच आहे.
नाशिक जिल्ह्यातील एकलहरे येथील डॉ. तांबोळी हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरतर्फे कोजोगिरी पौर्णिमा निमित्त खिरितील आयुर्वेदांक औषध दमा रुग्ण, बाल दमा, अॅलर्जिक सर्दी व फुफ्फुसाचे विकार असणार्यांसाठी कोजागिरी अमृत हे आयुर्वेदीक औषध रुग्णांसाठी मोफत वाटपाची ७५ वर्षापासून परंपरा असल्याचे प्रतिपादन यावेळी डॉ. राज शेख यांनी केले.
या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. तांबोळी हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरचे डॉ. युनुस तांबोळी यांनी केले आहे.
===================================
---------------------------------------------------
*सहयोगी*
गुलामरसुलभाई जहागीरदार - अहमदनगर(GM)
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment